Untitled
Untitled
पप्पू ,समता नगर मध्ये राहत होता .दहावी नापास झाल्यावर M I D C मध्ये कामाला लागला .तेव्हा आठराचा पूर्ण झाला होता .रोज सकाळी दहा वाजता त्याला कामावर जावे लागे .कामावर जाण्याआधी मोहल्ल्यातील मित्रांसमोर गप्पा करायला ,राजुच्या दुकानावर time pass करायचा .
कधी कधी आवश्यक समान घ्यायचा. त्याच दुकानात बरेचदा राणी यायची .कधी दूध घ्यायला तर कधी,
पावभर साखर तर कधी ,एखादा बिस्कीट चा पुडा घ्यायला .तर कधी गोळ्या ,चॉकलेट. राणीचेही
पप्पू सारखेच - - ! दहावीत जेमतेम पास झाली . अन पुढचे शिक्षण सोडून दिले .
राणी आणि पप्पूचे इशारे इशारो मे लव्ह सुरू झाले .त्यात जवळ पास एक वर्ष गेले .त्यानंतर सैराट
टाईप ,चिठ्या देणे सुरू झाले .असे करता करता प्रेमप्रकरण आणखी पुढे गेले. दोघांचे एका गार्डन
मध्ये भेटायचे ठरले .त्यासाठी मग जय्यत तयारी करणे सुरू झाले .पहिली भेट ठरली होती ना - - ?
पप्पूने झक्कास शर्ट विकत घेतला. त्याला नवीन जीन्स पण घ्यायचा होता पण बजेट आडवे आले - -
मस्त पैकी डार्क फर्फ्यूम लावला .नवीन शर्ट ला चार वेळा प्रेस करून झाली .शेवटी खरेदी झाली ती
गॉगलची -- - -
इकडे राणीने ,दारावर विकायला येणाऱ्या कडून मस्त पैकी तिच्या आवडीच्या मोरपंखी कलरचा
पंजाबी ड्रेस चे कापड घेतले होते. त्यावर डार्क राणी कलरची ओढणी .तिला आवडतो तसा छान फिटिंगचा ड्रेस शिवुन घेतला होता .त्याला मॅचिंग बांगडया, नेलपेंट लावले. केसांना मस्तपैकी शाम्पू केला होता . दोन्ही साईड ने क्लिप लावून केस मोकळे सोडले होते .चेहऱ्याला क्रीम ,पावडर टिकली सर्व तयारी झाली होती . ठरल्याप्रमाणे राणी घरी खोटेच सांगुन सायकलने पुढे निघाली .पप्पू मागून त्याच्या मित्राच्या बाईक वर येणार होता .
जुन महिन्याचे दिवस होते .आकाशात ,एक दोन ढग काळे दिसत होते .पण पाऊस येईल असे
कोणतेच चिन्ह दिसत नव्हते .राणी ,पप्पूला भेटीच्या ओढीने सायकल पिटाळत होती .राणी
निघाली ,हे पप्पुने बघितले .त्याची फुल तयारी झालीच होती .तो फक्त तिच्या निघण्याची वाट
पाहत होता.
मित्राला म्हणाला, चल ना ,रे ,लवकर ,पहा ती गेली पुढे निघून ."
"अरे ,थांब जरा ,तिला सायकलने पोहचायला वेळ लागेल ,आपण ,पाच मिनिटात पोहचू .घाई करू नको." हरी
राणी पुढच्या वळणावर पोहचत नाही तोच ,काळ्या ढगांनी अचानक आभाळ भरून आले .राणीला, घरी परत जाऊ की गार्डन मध्ये जाऊ काही सुचत नव्हते . पप्पूला भेटायच्या ओढीने ती पुढे निघाली . बघता बघता त्या ,काळ्या दृष्ट ढगातून पावसाचे मोठे मोठे
थेंब पडू लागले .राणीने सायकल एका झाडाखाली थांबविली .थेंबांचे रूपांतर सरीत झाले .सरींनी मग
मुसळधार पावसाचा अवतार धारण केला .राणी अक्षरशः चिंब चिंब त्या पावसात भिजली. तिच्या
कॉटन च्या ड्रेसचा रंग गेला .ती चेहरा पुसायला गेली तर ओढणीचा रंग चेहऱ्यावर लागून तो लालेलाल
झाला .
इकडे पावसाचा जोर बघुन पप्पू आणि हरी घरातून निघेलच नाहीत .पप्पूने केलेली सर्व तयारी
वाया गेल्यामुळे त्याने पावसाला शिव्या दिल्या. हरीच्या घरात चकरा मारू लागला . दहा पंधरा मिनिटात
पाऊस थाम्बला .राणी ओल्या कपड्यानिशी
घरी आली .पप्पू तिची वाटच पाहत होता. ती दिसताच त्याला हायसे वाटले .पण तिचा लाला चेहरा
बघून त्याला हसू आले. पण हसणार कसे - - ?
राणीला राग आला असता ना - -?
दोघांच्या पहिल्या भेटीचा फज्जा उडवला होता पावसाने . प्रेमी जीवांना हवाहवासा वाटणारा पावसाने मात्र राणी आणि पप्पूची पहिली भेटच विस्कटून टाकली होती .
