त्या चांदण्या रात्री
त्या चांदण्या रात्री
आज ज्योतीचे मन खूप चलबिचल करत होते, काही सुचत नव्हते. वाटलं कोणाजवळ तरी मन मोकळं करावं पण जवळचं असं कोणीच नव्हतं. घरात इनमीन चार माणसं. दिपक सकाळी गेला की रात्रीच उगवत होता. सासू पण शाळेत नोकरी करायच्या सासरे एक वर्ष झाले रिटायर्ड झाले. ते पण अबोल. पदरी काहीच मुलबाळ नव्हतं.
आमचे अॅरेंज पद्धतीने लग्न झाले. खरंच मनात आलेलं कोणाजवळ बोलावं असं कोणीही नव्हतं.
दिवस निघून गेला रात्र आली दिपकला यायला वेळ होता म्हणून खिडकीत बाहेर आकाशाकडे बघत होती आणि कधी भूतकाळात गेले मला स्वतःलाच समजले नाही.
घरात मी खोडकर खूप होते. तोंडाचा पट्टा चालू झाला की बंद होत नव्हता.
आई मी कॉलेजला चालले गं म्हणून गाडीला किक मारली अन् निघाले. आधीच खूप उशीर झालेला. पिरियड सुरू झाला अन् मी क्लासमध्ये हजर. रमेश माझी वाट बघत होता.
किती गं उशीर...
क्लास संपला तसा मी आणि रमेश कॉलेज कट्ट्यावर गप्पा करायला बसलो. असं आमचं रोजचं रूटीन
आणि मी कधी रमेशच्या प्रेमात पडले मला कळलंच नाही. तो पण माझ्या प्रेमात पडला.
रोज आमचे भेटणे वाढले घरी काही सांगितले नाही. कारण आधी करीयर सेट करायचं मग लग्नाबद्दल आपापल्या घरी बोलायचं.
रमेश माझ्यापेक्षा एक वर्षानी मोठा होता. त्याचं शेवटचं वर्ष. त्याचा कॉल आला, ज्योती मला जॉब लागला... इतका खुश होता. आम्ही भेटून पार्टी ठरवली.
आता आपण लग्न करू. आम्ही वेळ ठरवली. मी सकाळी लवकर उठले. आणि आई मी निघते म्हणून आईला आवाज दिला. आणि निघाले रमेशपण निघाला. आम्ही पार्टी करून निघालो. खूप आनंदात होतो. रमेश जाम खुश आणि त्या खुशीत गाडीचा स्पीड इतका वाढला की त्याला कंट्रोल करणे आवाक्याबाहेर होते. त्याने आपला हेल्मेट ज्योतीच्या डोक्यावर दिला आणि अपघात झालं आणि त्यात रमेशचा मृत्यू झाला.
माझ्या मनावर खोल परिणाम झाला.
अचानक दचकून भानावर आले. दीपक मला आवाज देत होता. आणि खरंच त्या चांदण्या रात्री भूतकाळातील वर्तमानात आले आणि पुन्हा माझं रोजचं रूटीन सुरू झालं.
खरंच कधीकधी काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात त्या नियतीवर सोडून द्याव्या हेच खरं.