Sangieta Devkar

Drama

5.0  

Sangieta Devkar

Drama

तुझं माझं जमेना

तुझं माझं जमेना

5 mins
972


निशांत आज जरा लवकर ये ना घरी, मीरा त्याचा डबा पॅक करत म्हणाली.


निशांत म्हणाला, कशाला मीरा मला खूप काम आहेत.


अरे निशी सौम्यासाठी गॅदरींगचा ड्रेस आणायला जायचे आहे, अजून थोडी फार खरेदी पण आहे, तू ये ना थोडा वेळ काढून.


मीरा असल्या छोट्या छोट्या कामासाठी मी कशाला हवा? तू जा ना सोमुला घेऊन.


मी कायमच जाते निशी, सगळं मीच तर आणत असते! तुला मात्र कायम काम असते. मी नोकरी करून घर पण सांभाळते, तू मात्र काम एकी काम बस.


निशांत चिडला आणि म्हणाला, मीरा सकाळी सकाळी कटकट नको यार. तू करतेस सगळं, घर सांभाळतेस मग हे बोलून का दाखवतेस. मी पण तुमच्यासाठीच कष्ट करतो ना?


हो निशी करतोस पण त्यातला किती वेळ आम्हाला देतोस? कधी कधी वीकएंडला पण तुझ्या मीटिंग्स असतात.


मीरा मला जमणार नाही उगाच वाद घालू नकोस. सारखं कटकट करायची नुसती, असे म्हणत रागातच निशांत ऑफिसला निघून गेला.


मीराचे डोळे भरून आले. घर आणि नोकरी सांभाळून ती सौम्याकडे पण पहायची. तिला शाळेत सोडून मग ऑफिसला जायची, येताना परत तिला पाळणाघरातून आणायची, येताना भाजी-किराणा काहीबाही असायचं ते वेगळे. पण निमूटपणे करायची सगळं घरासाठी. मात्र, अलीकडे निशांत अजिबात त्या दोघींना वेळ देत नव्हता. त्याचं काम, मिटींग यातच तो व्यस्त होता. रात्री यायचा तेव्हा सौम्या झोपलेली असायची. सकाळी थोडाच वेळ तिला तिचा बाबा भेटायचा. आज मात्र मीराला राहवले नाही त्यामुळे ती रागात बोलली. तिलाही निशीचा राग आला होता.


मीरा स्वत:चे आवरून ऑफिसला आली पण आज कामात तिचा मूडच नव्हता. सकाळी निशांत जे बोलला ते तिच्या मनातून जातच नव्हते. दिवसभर ती निशांतच्या मेसेजची वाट पाहत होती. तिला वाटले की राग शांत झाल्यावर निशांत तिला ‘सॉरी’ म्हणेल पण तसे काही झाले नाही. त्यामुळे मीरा अजूनच अपसेट झाली. संध्याकाळी सोमुला घेऊन ती एकटीच बाजारात गेली. सर्व खरेदी करून बाहेरच खाऊन आली. घरी आल्यावर निशांत पुरतेच जेवण तिने बनवले. रात्री खूप उशिरा निशांत आला. आणि न जेवताच बेडरूममध्ये आला. मीरा जागीच होती. त्याने कपडे बदलले आणि बेडवर आला. मीरा त्याला पाठमोरी झोपली होती, त्याने आपला हात तिच्या अंगावर टाकला आणि तिला जवळ ओढले पण मीराने त्याचा हात दूर केला. निशांतला अजूनच राग आला.


उलट तो सकाळचा वाद विसरून तिच्या जवळ आला होता पण मीरा अजून चिडलेलीच होती. मग तो ही तोंड फिरवून झोपी गेला. सकाळी नेहमीप्रमाणे मीरा उठली, सगळं काम करत राहिली. सौम्या स्वत:ला जमेल तसे स्वत:चे आवरत होती. ती 4 th मध्ये होती सो बऱ्यापैकी स्वत:चं आवरत असे. निशांत उठला होता आणि सोमुशी गप्पा मारत होता. तिने काल आणलेला ड्रेस त्याला दाखवला निशीही, ‘खूप छान आहे’ असे म्हणाला.


तशी सोमु म्हणाली, डॅडा तू माझ्या गॅदरिंगला येणार आहेस ना?


हो पिल्लू मी नक्की येणार.


बघ हा डॅडा आता येतो म्हणशील आणि त्याच दिवशी काम असेल तुला, सोमु म्हणाली तसा निशी म्हणाला, नो बेटा मी तुझ्या प्रोग्रामसाठी खास सुट्टी घेतली आहे, खुश आता.


लव यु डॅडा, ती आनंदाने म्हणाली.


तसा निशी ही म्हणाला, लव यु बेटा!


मीरा किचन मधून हे बापलेकीचे संभाषण ऐकत होती. निशी त्याचं आवरत होता. मीराने नाश्ता टेबलवर ठेवला. निशांतने गुपचूप तो संपवला आणि डबा घेऊन निघाला. रात्रीच्या मिराच्या वागण्याने निशी अजून हर्ट झाला होता. आणि मीरा निशीचे रुड बोलणे विसरत नव्हती. ती ही ऑफिसला गेली.


संध्याकाळी निशी घरी येत होता आज नेहमीपेक्षा थोडा लवकर निघाला होता. कार सुरू करत त्याने एफएम सुरू केले. संध्याकाळी पुण्यात ट्रॅफिक विचारायलाच नको. सो त्या कंटाळवाण्या ट्रॅफिकमध्ये निशीला रेडिओची सोबत छान वाटायची. ट्रॅफिकचे अपडेटही समजायचे.


आरजे श्रुती बोलत होती, मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का डिसेंबरचा फर्स्ट वीक हा ‘थँक्स गिविंग वीक’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. या निमित्ताने आपल्याला जर कोणाला थँक्स म्हणायचे असेल तर नक्की त्याचे आभार मानू शकता. जसे तुमचे मित्र-मैत्रिणी, आई-बाबा, बायको-नवरा कोणालाही तुम्हाला थँक्यू म्हणावेसे वाटत असेल तर मला लगेचच त्या व्यक्तीचा नंबर सेंड करा आणि तुमचा प्रेमाचा मेसेज किंवा त्या व्यक्तीबद्दलच्या तुमच्या भावना, काहीही जे तुमच्या मनात आहे पटकन मला सांगा! आम्ही तुमच्या भावना त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहचवू, सो मला कॉल करा या नंबर वर 98...... आणि एक सुंदर गाणे लागले...


दिल मांग रहा है मोहलत

तेरे साथ धड़कने की

तेरे नाम से जीने की

तेरे नाम से मरने की

तेरे संग चलूं हरदम

बनकर के परछाई

एक बार इजाज़त दे

मुझे तुझमें ढलने की

देखा है जबसे तुमको

मैंने ये जाना है

मेरे ख्वाहिश के शहर में

बस तेरा ठिकाना है

मैं भूल गया खुद को भी

बस याद रहा अब तू

आ तेरी हथेली पे

इस दिल को मैं रख दूँ

दिल मांग रहा है मोहलत

तेरे साथ धड़कने की

तेरे नाम से जीने की

तेरे नाम से मरने की.!!


निशांत हे गाणं मनापासून ऐकत होता आणि त्याला उमजले की आपण काल मीराशी खूप रुड बोललो. ती खरंच मनापासून घर संभाळते सोमुचं सगळं करते. आपली काळजी घेते. हे ती आपल्यावरील प्रेमा पोटीच तर करते आणि मी फक्त ऑफिस आणि काम यातच मग्न असतो, थोड़ा वेळच तर मागते मीरा. तोही मी अलीकडे देत नाही. निशी विचार करु लागला आणि त्याला गिल्टी फिल होवू लागले. त्याने पटकन पुन्हा श्रुतीचा तो संदेश आल्यावर तिचा नंबर टाइप केला आणि मीरा बद्दल त्याला वाटणारं गिल्ट आणि तिला मनापासुन सॉरी आणि थॅंक्यू अशा आशयाचा मेसेज आणि मीराचा नंबर त्याने आरजे श्रुतीला सेंड केला.


मीरा घरी आली होती फ्रेश होऊन चहा घेत होती. तिला एक फोन आला, अननोन नंबर होता. तिने तो घेतला आणि हॅलो कोण बोलत आहे, असे विचारले तसे श्रुती म्हणाली, मी आरजे श्रुती एफएमवरुन बोलत आहे. मीरा तुला माहित आहे का की, डिसेंबरचा 1st वीक हा ‘थॅंक्स गिविंग वीक’ म्हणून साजरा केला जातो. सो यासाठी आम्ही लोकांकडून काही मेसेज मागवले होते. सो तुझा हबी निशांत याने मला मेसेज पाठवला आहे, जो तुझ्यासाठी खास आहे. आता ऐक निशांतचा मेसेज, मीरा ऐकू लागली.


हॅलो मीरा, फर्स्ट आय से आय एम रिअली सॉरी. मी काल जे बोललो ते रागात बोललो, तुला हर्ट नव्हते करायचे मला. मी कामाच्या स्ट्रेसमुळे तसे बोललो. तू मनापासून माझं, सोमुचं सगळं करतेस, आपले घर संभाळतेस, पण मी मात्र तुला काहीही मदत नाही करु शकत, सो आय फील सो गिल्टी मीरा. माझे चुकले, प्लीज मला माफ कर आणि थँक्यू सो मच डार्लिंग.


सो मीरा आता तुझा राग गेला असेल इतका सुंदर मेसेज ऐकून, श्रुती तिला विचारत होती.


मीरा म्हणाली हो नक्की.. बाय ऍण्ड लिव हॅपी. फोन बंद झाला. मीराच्या डोळयात पाणी आले ती तशीच बसून रडू लागली ती स्वत: बोलू लागली, निशी मी समजून नाही घेतले तुला. तू रागात बोलला आणि मी रुसून बसले. इतक्यात निशी लैच उघडून आत आला तसे मीराने क्षणाचाही विलंब न लावता पळत जाऊन निशीला मिठी मारली आणि रडत म्हणाली, निशी माझेच चुकलं आय एम सॉरी.


त्याने तिचे डोळे पुसले म्हणाला, अगं आपल्यात वाद-भांडण होणारच. पण ती किती काळ ताणायची की लवकर संपवायची हे आपल्याच हातात आहे ना! तू आणि मी वेगळे नाहीच आहोत गं. आपण एकच आहोत, तुझ्याशिवाय किंवा माझ्याशिवाय आपलं घर अपूर्ण आहे, कितीही भांडलो तरी आपल्याला एकमेकांशिवाय करमणार आहे का? आपण दोघंच आहोत एकमेकाला.


आणि सोमूला कोण आहे आपल्या शिवाय, मीरा हसत म्हणाली, निशी आय लव यू...!


तसा निशांत म्हणाला, आय लव यू टू मॅडू मिरु. आणि दोघांची मीठी अजुनच घट्ट झाली...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama