Prof. Dr.Sadhana Nikam

Drama Others

4.4  

Prof. Dr.Sadhana Nikam

Drama Others

ट्रेकिंग

ट्रेकिंग

4 mins
1.0K



        आज ट्रेकिंगचा तिसरा दिवस होता. सगळेजण सकाळीच महाबळेश्वरच्या एका डोंगराच्या पायथ्याशी येवून पोहोचले होते. निलेशची नजर इकडे तिकडे भिरभिरत होती. त्याला एव्हड्या गर्दीत विशाखा कुठेच दिसत नव्हती. त्याने सगळ्यांना एकत्र बोलावले तो म्हणाला “चला मित्रानो कोण राहीलं आहे बघा”, तेव्हढ्यात सगळ्यात लहान सोनू बोलला “थांबना दादा अजून विशाखा दीदी नाही आली”. तेव्हड्यात दुरून विशाखा येत असल्याची म्हातारया नानांना दिसली ते ओरडले “अरे निल्या थांब की जरा ती बघ विशी येते आहे”. निलेश म्हणाला “नाना हिला दररोजच उशीर होतो आपण सगळे बघा राईट टाईम पोहोचलो”. तेव्हड्यात हेमंत म्हणाला “अरे निल्या एवढी काय घाई तुला”. तोवर विशाखा तिथपर्यंत येवून पोहोचली व म्हणाली “सॉरी, मला यायला थोडा वेळ लागला”. लगेच निलेश म्हणाला चला “आता उशीर नको”. एकूण पंचवीस जण होते. सगळे ट्रेकिंग साठी तयार झाले एकमेकांमध्ये जणू स्पर्धा लागली होती. विशाखा बरेच पुढे होती तसे निलेशचे मित्र त्याला चिडवू लागले “निल्या बघ शेवटी येवून विशाखा तुझ्या पुढेच आहे”. तसा निलेश तावातावाने बोलला “थांबा जरा पाहू आपण कोण आधी पोहोचत”. एव्हाना विशाखा डोंगरावर पोहोचली सुद्धा होती. तिच्यानंतर दहा मिनिटाने सगळे पोहोचले. निलेशचे मित्र मात्र त्याला चिडवतच होते तसा निलेशचा राग अनावर झाला तो पुढे येवून विशाखाला म्हणाला “एवढा काय तीर मारला, स्वतःला काय झाशीची राणी समजतेस की काय”. तशी विशाखा हळूच म्हणाली “अरे निलेश इतका चिडतोस काय मला सवय आहे ट्रेकिंगची”. तसा निलेशला आणखी राग आला “मग आता लाव पैज”. या मोठ्या डोंगरावरून खाली दरीत कोण आधी उडी मारत ते. निलेशचे मित्रही त्याला साथ देवू लागले “हो हो विशाखा आता लाव की पैज आता का बर मागे”. मागून ट्रेकिंगला आलेले नाना, लहानगा सोनू ओरडले “नको दीदी यांच ऐकू नको मागे सरक”. विशाखाला कळेना काय कराव. तोवर निलेश व त्याचे मित्र तिला अधिकच डिवचू लागले. विशाखालाही स्फुरण चढल होत. ती म्हणाली “ठीक आहे लावली पैज”. कोणी काही म्हणायच्या आतच विशाखाने दरीत उडी घेतली. क्षणभर सगळेच घाबरले निलेश ओरडला अग विशाखा! विशाखा खोलपर्यंत दिसत नव्हती. बराच वेळ झाला पण विशाखाचा कुठे थांगपत्ता लागत नव्हता.

         निलेश आणि त्याच्या मित्रांनी ठरवलं विशाखाला शोधायचं सगळ्यांनी कंबरेला दोर बांधले आणि उड्या घेतल्या बऱ्याच वेळेनंतर निलेशला कन्ह्ण्याचा आवाज आला. त्याची नजर आवाजाच्या दिशेने शोधू लागली तेव्हा दरीपासून काही उंचीवर एका झाडावर विशाखा पालथी पडलेली त्याला दिसली तो हळूहळू तिथपर्यंत पोहोचला दरीच्या खडकावरून चालण सोप नव्हत त्याने मित्रांना आवाज दिला सगळे तिथपर्यंत पोहोचले त्यांनी विशाखाला काढायचा प्रयत्न केला पण बाभळीच्या झाडाचे काटे तिला खोलवर रुतले होते दोन्ही पायाचे पंजे व हात रक्तबंबाळ झाले होते. निलेश पुढे झाला त्याने एका हाताने विशाखाला डोक्याच्या बाजूने तर त्याच्या दोन मित्रांनी पायाच्या बाजूने धरल आणि बाभळीच्या काटयापासून अलगद बाहेर काढल आणि हळूहळू डोंगर चढत वर आणल. रक्तबंबाळ विशाखा बेशुद्धच होती. निलेशने तिच्या तोडावर पाणी मारलं तरी ती शुद्धीवर आली नाही तसच तिला उचलून हॉस्पिटलला नेल. डॉक्टरनी विशाखाला तपासलं जखमा पुसल्या. सर्जरीसाठी ऑपरेशन थियेटरमध्ये तिला नेल. तीन तासाच्या सर्जरीनंतर डॉक्टर बाहेर आले. ते बाहेर येताच निलेश आणि त्याच्या मित्रांनी विशाखाविषयी डॉक्टरांना विचारलं तेव्हा डॉक्टरांनी विशाखा पूर्ण बरी होईपर्यंत महिना तरी लागेल असे सांगितले. निलेशने आत जाण्याची परवानगी मागितली पण डॉक्टरांनी अठ्ठेचाळीस तासापर्यंत विशाखाला भेटता येणार नाही असे सांगितल्यानंतर निलेश हिरमुसला.

हताश होवून तो बाहेर बाकावर बसला आणि ओक्साबोक्शी रडू लागला त्याला त्याच मन खात होत आपण कुठून पैज लावली आणि हे काय घडून गेल. त्याच्या मित्रांनी त्याला समजावलं पण काही समजण्याच्या मनस्थितीत तो नव्हता. दोन दिवस तो एकटाच हॉस्पिटलच्या बाहेर घुटमळत होता. अठ्ठेचाळीस तासानंतर विशाखाला शुद्ध आली तसा निलेश आत गेला. विशाखाने पाणी, पाणी असे म्हणताच त्याने ग्लासमध्ये पाणी घेवून तिला अलगद उठवून पाणी पाजल. विशाखा काही बोलणार तोच तिच्या तोंडावर हात ठेवून तो म्हणाला “काही बोलू नको”. त्याने अलगद मांडीवर तिच डोक ठेवलं तेव्हा दोघांच्याही डोळ्यातून अश्रू अखंड वाहत होते. अस कोणत अनामिक नात होत की दोघानाही त्यांचे अश्रू आवरता येत नव्हते. काही वेळाने डॉक्टर आले त्यांनी विशाखाला तब्येतीबद्दल विचारलं विशाखाने स्मितहास्य केल पण तिच्या चेहऱ्यावर करूण भाव होते. डॉक्टरानी सलाईनमधून इंजेक्शन दिले. काही वेळातच विशाखा गाढ झोपली. त्याला वाटल होते विशाखा काही बोलेल तो उठला त्याने तिच्या पायावरच अंथरून नीट केल तेव्हा त्याला समजल की तिच्या दोन्ही पायांना बांधलेलं होते. निलेश डॉक्टरच्या केबिन मध्ये गेला तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की विशाखाच्या दोन्ही पायाच्या पंजांचे अक्षरशः तुकडे झाले आहेत. त्याची सर्जरी करावी लागेल. निलेशला चिंता वाटायला लागली होती. विशाखा एक सुंदर, हुशार सोज्वळ मुलगी. एम.डी करण्यासाठी पुण्यात आली होती. एका सामाजिक कार्यक्रमात तिने निलेशच भाषण ऐकल होत एव्हडीच ओळख. निलेशच्या ट्रेकिंगच्या कार्यक्रमात तिच्या मैत्रिणीच्या आग्रहावरून ती आली होती. पायाची सर्जरी नाही झाली तर तिला चालता येणार नव्हत. तो बाहेर बाकावर बसला आणि केव्हा त्याला झोप लागली ते कळलच नाही. सकाळी तो उठला. हॉस्पिटलच्याच नळाच्या पाण्याने फ्रेश होवून विशाखाच्या रूममध्ये गेला.विशाखा गाढ झोपेत होती त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं एव्हड्या वेदना असतानाही चेहरा हसरा होता. निलेशने तिच्या डोक्याला हात लावला तशी तिला जाग आली. प्रत्यक्षात काय झाल आहे याची तिला जाणीव नव्हती. निलेशने तिच्या तब्येतीची चौकशी केली आणि हळूच तिच्या आईवडिलांचा पत्ता विचारला तेव्हा तिच्या डोळ्यातून झरझर अश्रुधारा वाहत होत्या. त्याने रुमालाने अलगद अश्रू टिपले ती एका अनाथ आश्रमातून आलेली मुलगी होती. तिच सर्व शिक्षण शिष्यवृत्तीने झाल होत आणि एम.डी शेवटच सेम बाकी होत. तिच ऐकून झाल्यावर निलेशने तिचा हात हातात घेवून तिला आश्वासन दिल की काही काळजी करू नको. निलेशच्या घरची परिस्थितीही जेमतेम होती त्याने त्याच्या मित्रांना सांगितले. अनेक सामाजिक संघटना कडून त्याने आर्थिक मदत मिळवली. विशाखाच्या पायाच ऑपरेशन केल. विशाखा एम.डी उत्तीर्ण झाली. तिला एक सुखदुखाचा सोबती मिळाला होता. विशाखाने निलेशशी लग्न केल. पुढे विशाखाच हॉस्पिटल बांधण्याचही स्वप्न निलेशने पूर्ण केल आणि तो विशाखाच्या हॉस्पिटलच सर्व व्यवस्थापन पाहू लागला. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama