सूड
सूड


सूड
बंगल्यातल्या तळघराच्या अंधारया खोलीतून जोरजोरात किंचाळण्याचा आवाज आला तसा रावसाहेबन फोन फिरवला.अवघ्या पाच मिनिटात डॉक्टर आणि दोन कंपाउंडर तळघरात पोहोचले. डॉक्टरांना बघून सखी ओरडली “नका नका मला मारू नका, मला जगायचंय.” रावसाहेबांच्या डोळ्यातल्या अंगाराण डॉक्टरांना इशारा केला. डॉक्टरांनी सिरिंग्ज भरली अन खाचकन सखीला टोचली. दोन मिनिटात सार शांत झाल. सखी डोळे मिटून निपचित पडली. अंगावरून घामाच्या धारा वाहत होत्या पण तिच भान हरपल होत.रात्री दोन वाजेच्या सुमाराला सखीला जाग आली. काळ्याकुट्ट अंधारात सखी ओरडू लागली, “चांडाळा सोड मला”, पण सखीला बांधलेला साखळदंड एव्हढा दणकट होता कि हाताला हिसका बसल्याने तिला जखम झाली अन हातातून भळभळ रक्त वाहू लागल. सखीला ग्लानी आली.ती शुद्धीवर येपर्यंत बराच रक्तस्राव झाला होता.
सखी ही विमलबाई आणि नानासाहेबांची एकुलती एक लेक. मुलगा पाहिजे या हट्टापायी सखीनंतर दोन वर्षांनी विमलबाईनी रावसाहेबाला जन्म दिला. रावसाहेब लहानपणापासूनच हटटी, चिडखोर अन संतापी होता. असूयेपोटी सखीला वाढलेल्या ताटातूनही तो घास हिसकावून घ्यायचा. विमलबाईनी त्याच्या द्वेष प्रवृतीला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. मोठा झाल्यावर रावसाहेब सखीचा दुस्वास करू लागला. नानासाहेबांच्या तीक्ष्ण नजरेला हे रुचले नाही. त्यांनी रावसाहेबाला मिलिटरी शाळेत टाकला पण रावसाहेब अधिकच बंडखोर झाला.
सखीच पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल. आता तिचे हात पिवळे करण्याची वेळ आली होती. विमलबाई आणि नानासाहेबांनी एका चालून आलेल्या स्थळाला होकार दिला. मातब्बर देशमुखाच स्थळ गर्भश्रीमंत.सखी देखील हरखून गेली. जीवनाला मिळणाऱ्या नवीन वाटचालीन. सखीच लग्न प्रेमशी धुमधडाक्यात झाल. सखी देशमुख घराण्याची सून झाली. सार वैभव आपसूकच चालून आल होत पण नियतीच्या मनात वेगळच होत.
प्रेम देशमुखांचा एकुलता एक मुलगा. लाडाकोडात वाढलेला. घरची गर्भश्रीमंती म्हणून नोकरी करण्याची वेळ आली नाही पण माठातलं पाणी किती दिवस पुरणार. प्रेमला व्यसन लागल दारूच. दररोज पिऊन यायचं आणि बायकोला झोडायच असा प्रेमचा नित्यक्रम सुरु झाला. शिकली सवरलेली सखी मुकाट्याने छळ सोसत होती.काही दिवसातच दारूच्या अतिसेवनापायी प्रेमच निधन झाल आणि देशमुख घराण्यान तिला करंटी ठरवत बाहेर काढल.सखी माहेरी आली अंगावरच्या साडीनिशी. वृद्ध मातापित्यांच्या केविलवाण्या नजरा सखीच दु:ख बघत होत्या.पण रावसाहेबाला मात्र असूया आनंद झाला होता. लेकीच पांढर कपाळ पाहून विमलबाई मनातल्या मनात आक्रोश करीत होत्या पण रावसाहेब मात्र दात ओठ खात होता. अन बहिणीच्या नशिबावर क्रूरपणे हसत होता.
रावसाहेब वाट बघत होता. वृद्ध मातापित्याच्या मरणाची. नानासाहेबांनी सरकारी नोकरीत कमावलेला पैसा त्याला शांत झोपू देत नव्हता. एक दिवस अचानक विमलबाईना मूर्च्छा आली. हॉलमधल्या जमिनीवर विमलबाई पडल्या होत्या.नानासाहेब घाबरले त्यांनी ताबडतोब विमलबाईना हॉस्पिटलमध्ये हलवले. डॉक्टरांनी विमलबाईची रक्ततपासणी केली. तासाभरातच रिपोर्ट मिळणार होता पण नानासाहेब अधिकच घाबरलेले होते. रात्री उशिरा विमलबाई शुद्धीवर आल्या तेव्हा डॉक्टर नानासाहेबांना सांगत होते. घाबरू नका पण आता अधिक काळजी घ्यायला हवी. विमलबाईच्या कानावर शब्द पडत होते. त्यांना ब्लड कॅन्सर झालाय विमलबाईनी डोळे घट्ट मिटून घेतले. पण सत्य कुठे लपणार होत. दोन महिन्यांचा कालावधी डॉक्टरांनी दिला नानासाहेबांनी उपचारासाठी विमलबाईना मुंबईला हलवले. नानासाहेबांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला पण काही उपयोग झाला नाही.अवघ्या पंधरा दिवसातच विमलबाईचे निधन झाले. पत्नीच्या विरहानंतर नानासाहेबांनी हाय खाल्ली अन एक दिवस झोपेतच नानासाहेबांना हार्टअटक आला. विमलबाई आणि नानासाहेबांच्या निधनानंतर रावसाहेबाला रान मोकळ झाल पण अडसर होता तो फक्त सखीचा.
एक दिवस गोड बोलून रावसाहेबान सखीला शेतात जाण्याची गळ घातली.भोळी सखी भावाच्या पावलावर पावूल टाकून शेताकडे निघाली. रावसाहेबान बोलत बोलत सखीला विहिरीजवळ नेल.सखी पाठमोरी झाली तोवर रावसाहेबान त्याच्या राकट पंजान तिला विहिरीत ढकललं. सखी क्षणभर घाबरली अन ओरडू लागली वाचवा वाचवा पण दुष्ट
रावसाहेबान भला मोठा दगड तिच्या दिशेने विहिरीत फेकला. सखीच्या डोक्याला भली मोठी खोच पडली पण जीव वाचवण्यासाठी ती हात पाय हलवत राहिली. रावसाहेब केव्हाच दिसेनासा झाला होता. आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना सखीच्या ओरडण्याचा आवाज आला. एकाने विहिरीत उडी मारून सखीला बाहेर काढल पण एव्हाना सखी बेशुद्ध झाली होती.दुसरया दिवशी भल्या पहाटे गावकर्यांनी सखीला घरी आणून सोडलं. सखीला पाहताच रावसाहेबान दात ओठ आवळले पण तो करणार काय? सखी भेदरलेल्या अवस्थेत घरात शिरली. रावसाहेबान घराचे दरवाजे बंद केले तिला बळजबरी ओढत तळघरात नेल साखळदंडानी जखडल आणि वर चाबकाचे फटके मारले. सखीला मूर्च्छा आली.
सखीसाठी आता इकडे आड तिकडे विहीर असा प्रकार झाला होता जगण्यासाठी माहेरची साडी चोळी पाहिजे एव्हढाच सखीचा आग्रह होता पण रावसाहेब नानासाहेबांच्या इस्टेटीतून काही दयायला तयार नव्हता. सखीचा अट्टाहास वाढत होता. सखी काही केल्या वारसपत्रावर सह्या करायला तयार नव्हती. रावसाहेबांला प्रश्न पडला.त्याच्या डोक्यात एक असुरी कल्पना शिरली सखीला वेड करण्याची. दिवसभर साखळदंडाचा फास आणि चाबकाचे फटके सोसन्यापुढे सखीजवळ काही इलाज नव्हता पण रावसाहेबाच सैतानी मन एव्हढयावर शांत बसल नाही. त्याने वेड्यांच्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना बोलवलं अन सखीला शौक देण सुरु केल. सखीच्या किंचाळन्याला आजूबाजूचे कान देवू लागले मग मात्र रावसाहेबन इंजेक्शन ची नामी योजना काढली सखीला बळजबरीने इंजेक्शन दिले जाऊ लागले. सखी "वाचवा वाचवा", ओरडत राहिली पण काळयाकुट्ट अंधाराशिवाय तिच्या सोबतीला कोणी नव्हत. काळयाकुट्ट अंधाराला भेदत सखीची किंकाळी ऐकू येत होती “मी वेडी नाही हो मी वेडी नाही.”
दररोजच्या छळ आणि उपासमारीनी सखी कंटाळली होती तिच्या मनात अंगार फुलात होता. आईवडिलांच्या आठवनीन तीच मन व्याकूळ होत होत पण रावसाहेब बद्दल मात्र द्वेषाची जागा सुडाने घेतली होती. काय करावे या विचारात असताना तिला नामी युक्ती सुचली तिने ठरवलं रावसाहेबाचा कट करायचा तळघरातल्या अंधारात तिला एक दोर सापडला दोर गुंडाळून तिने एक फास तयार केला. अंधारात चाचपडत तिने टेबलाचा अंधार घेतला. टेबलावर चढून तिने फास डोक्यावरच्या पंख्याला अडकवला तयारी पूर्ण झाली आणि ती वाट पाहू लागली रावसाहेबची.
रावसाहेबाच्या डोक्यात संचारला होता सैतान. वारसपत्राचे कागद घेवूनच तो तळघरात आला. आल्याबरोबर त्याने कागद सखीच्या दिशेने भिरकावले.त्याने सखीला जोरात दरडावले. सखी थरथर करत होती. सखीला दंडाला धरून त्याने जोरात ओढले. दारू पिलेल्या रावसाहेबाला स्वतःचेही भान नव्हते. सखीने संधी साधून टेबलाकडे ढकलले. भान हरपलेला रावसाहेब टेबलावर चढला अन नाचू लागला जोरजोरात हसू लागला सखी घाबरत घाबरत एका कोपर्यात उभी राहिली अन काही क्षणातच सखीला किंकाळी ऐकू आली "मेलो मेलो", रावसाहेबाच्याच्या गळ्यात फास अडकला होता. सखीने अंधाराचा फायदा घेत टेबल बाजूला ओढला. एव्हाना रावसाहेबाच्या गळ्याभोवती फास आवळला गेला होता.
सखीने धाडकन तळघराचे दार बंद केले अन भीतभीतच ती दिवाणखान्यात येवून बसली. दिवाणखान्यातल्या लोडवर डोके ठेवून ती जोरजोरात रडू कागली. विमलबाई नानासाबांच्या फोटोकडे पाहून तिने हात जोडले. तोंडातल्या तोंडात पुटपुटत ती म्हणाली “बाबा मला माफ करा”. रावसाहेबाचा भेसूर चेहरा तिच्या डोळ्यासमोर तरळत होता पण जिव्हाळ्याच्या नात्याचा असा क्लेशदायक अंत झाला होता. स्त्रीत्वाची लढाई सखी जिंकली होती पण अन्यायासमोर झुकायच नाही असा आदर्श तिने महिला जगताला घालून दिला.