Prof. Dr.Sadhana Nikam

Others

3.7  

Prof. Dr.Sadhana Nikam

Others

त्या चौघी

त्या चौघी

4 mins
846



          पोर्णिमेची रात्र. आकाशात चंद्र डोकावत होता. सगळीकडे निरव शांतता. रात्रीचे बारा वाजले होते. घरातली मंडळी झोपली असताना त्या चौघी निघाल्या भरधाव वेगाने दोन बुलेटवर. थंडीचे दिवस असल्याने अंगात जॅकेट तर डोळ्यावर गॉगल लावले होते. बरेच अंतर चालून आल्यावर त्यांनी मागे वळून पाहिले. रस्त्यावर अंधार होता. रात्रीचे दोन वाजले होते. अंधारात कुत्रे जोरजोरात भुंकत होते. अजून बराच पल्ला गाठायचा होता. पहाट झाली. रस्त्याच्या कडेला बुलेट थांबल्या. डोक्यावरच हेल्मेट काढत त्या गाडीवरून उतरल्या पाण्याची बॉटल काढून घटाघटा घशाखाली ओतत एकमेकांना टाळ्या देत त्या चौघी उतरल्या. एका झाडाखाली बसत त्या एकमेकीना म्हणाल्या “दमलो यार”. विनी, मिनी, रिनी आणि सिमी या चौघी लहान पणापासूनच्या मैत्रिणी. डोंबिवलीला एका चाळीत राहायच्या. चौघी एकाच शाळेत एकाच वर्गात होत्या. अभ्यास बरोबर खेळणे बरोबर. अशा या चौघी बारावी नंतर विभक्त झाल्या. विनी व रिनी एमबीबीएस तर मिनी व सिमी एम.एस्सी झाल्या होत्या. शेतकरी कुटुंबातील असल्याने चौघीच्या घरची परिस्थिती जेमतेम होती. विनी व रिनी एमबीबीएस झाल्या पण पुढे एम.डी करण्यासारखी घरची परिस्थिती नव्हती. पुढे काय कराव हा चौघीसमोर प्रश्न होता. आईवडिलांना मदत करण, घरचे काम सांभाळणे हे त्या करत होत्या पण घरच्यांकडून एक वेगळी वागणूक त्यांना मिळायला लागली होती. ती त्यांना खटकत होती. आई वडील लग्न करून द्यायच्या मागे होते पण त्या चौघींनी घरी सांगितले होते की जोवर त्या स्वतःच्या पायावर उभ्या रहात नाही तोपर्यंत लग्न करणार नाही.

        घरातून निघून त्यांना आठवडा झाला होता. चौघीकडे जेमतेम पैसे होते. त्यांनी ठरवलं. एखाद्या कंपनीत काम करू या. त्या चौघींनी नासिकला जायचं ठरवलं. एका औषधी कंपनीत त्यांनी नोकरी धरली त्या चौघींचा प्रामाणिकपणा पाहून तेथील अधिकाऱ्यांनी त्यांना कायम केल. बऱ्यापैकी पैसा आता मिळू लागला होता या पेक्षा काही वेगळ कराव अस त्यांच्या मनात होते. संध्याकाळी घरी आल्यावर घरीच त्या स्वयंपाक बनवत. जेवण झाल्यावर फिरायला जात. त्यानंतर रात्री बारा पर्यंत नौदलाच्या परीक्षेचा अभ्यास करत. इकडे त्यांच्या घरी मुली घरातून निघून गेल्यामुळे चौघींचे आईवडील चिंतेत होते.

       त्या चौघीनीही ठरवलं होते की जोपर्यंत त्या मोठया पदावर नोकरी करत नाहीत तोपर्यंत घरी काहीही कळवायचे नाही. चौघींचा संघर्ष सुरु होता पण त्यांना ध्येय गाठायचे होते. परीक्षेला पंधरा दिवस राहिले होते. नौदलात त्यांना जायचं होत त्या दृष्टीने त्यांनी तयारी सुरु केली. अखेर परीक्षेचा दिवस उजाडला. त्या चौघींना पेपर चांगला गेला. त्यांचा इंटरव्ह्यू झाला. त्यांच व्यक्तिमत्व आणि शारीरिक क्षमता योग्य असल्यामुळे त्यांचं नौदलात कमांडो म्हणून सिलेक्शन झाल. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये फोटोसही बातमी झळकली. डोंबिवलीला सुद्धा त्या चौघींच्या घरी ही बातमी समजली आईवडिलांचा आनंद गगनात मावेना. त्या चौघींचे आईवडील एकत्र आले, त्यांनी ठरवले मुलीना घरी आणायचे आणि वाजत गाजत गावातून हत्तीवरून मिरवणूक काढायची. मुलींचा तपास करण्यासाठी ते निघाले नासिकला ते पोहोचले त्या चौघी नेहमीप्रमाणे कंपनीत निघाल्या होत्या. कंपनीत राजीनामा देवून त्यांना नौदलात हजर व्हायचं होते. त्या घरातून निघणार तोवर त्या बिल्डींगखाली कार थांबली. त्या चौघींचे आईवडील उतरले आणि जिना चढून वर गेले आईवडिलांना पाहून त्या चौघींच्या आनंदाला पारावार राहिला नाही. दोन दिवस त्यांनी सोबत घालवले. तिसऱ्या दिवशी आईवडिलांनी त्यांना बरोबर येण्याचा आग्रह केला पण त्या चौघींही गेल्या नाही.

       त्या नौदलात हजर झाल्या. नौदलात सर्व पुरुष होते त्यांना पाहून साऱ्यांचे डोळे विस्फारले. तेथील अधिकाऱ्यांनी त्या चौघींना बोलावून घेतले. त्यांना मोहीम समजावून सांगितली. थोडया दिवसात त्यांना एका मिशन फत्ते मोहिमेवर पाठवण्यात आले. काश्मीर जवळच्या एका छोटया गावात अतिरेक्यांनी तीन कुटुंबाना ओलीस ठेवले होते. त्यात लहान मुल आणि वृध्दही होते. त्यांची सुटका करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. एक मोठ आव्हान होते त्या तयारीनिशी गेल्या. इमारतीभोवती अतिरेक्यांनी पहारा कडक केला होता. एक दिवस रात्री बेसावध असताना त्या चौघींनी बेधुंद गोळीबार केला तिकडून अतिरेक्यांनी पण प्रतिकार केला पण अतिरेकी मारले गेले. ओलीस ठेवलेल्या कुटुंबाची सुटका झाली. त्या कुटुंबातील मोठया माणसांनी त्यांचे आभार मानले. सतत अठ्ठेचाळीस तासाच्या मोहिमेनंतर त्यांना यश आले होते. दुसऱ्या दिवशी न्यूज पेपर आणि सोशल मिडियावर ह्या मोहिमेची न्यूज गाजली. मोहीम पार करून त्या क्वारटरला पोहोचल्या तसे अभिनंदनाचे फोन वाजू लागले. जीवाशी खेळून एक फार मोठा विक्रम त्यांनी केला होता. त्या खूप थकल्या होत्या पण कौतुकाच्या वर्षावाने चौघींच्या डोळ्यात पाणी होत. मुली म्हणून जन्माला आलो हा काय आमचा दोष आहे का? घरी दारी समाजाकडून हेटाळणी सहन करावी लागली, घरातून निघालो तेव्हाही कोणालाही न सांगता बाहेर पडलो समाजाच्या दृष्टीने तो एक मोठा अपराध होता त्यासाठी आईवडिलांना नातेवाईकांकडून समाजाकडून बोचरे प्रश्न ऐकायला मिळाले. डोक्यात विचार होते पण हा जन्म सार्थक झाल्याच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होते. आता मात्र आईवडिलांचा आग्रह त्यांना टाळता आला नाही त्या गावी गेल्या. मोठया संख्येने रेल्वेस्टेशनवर त्यांच्या स्वागतासाठी नातेवाईक उभे होते. चार हत्ती मागवण्यात आले व सजवण्यात आले. दारोदारी रांगोळ्या काढण्यात आल्या. सुवासिनींनी त्या चौघींना ओवाळले हत्तीवरून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. गावभर मिठाई वाटण्यात आली. आईवडिल आणि नातेवाईकांचा आनंद तर गगनात मावत नव्हता. पंधरा दिवसाच्या सुट्टीवर त्या आल्या होत्या. सुट्टी संपून जायची वेळ झाली तशी आईवडिलांनी मुलीना जवळ बसवले समजावले आणि आता करीयर बाजूला ठेवून लग्न करावे असा आग्रह धरला. नौदलातच कार्यरत असलेले अधिकारी डयुटीच्या निमित्ताने त्यांच्याबरोबरच राहत होते त्यातील नवीन रुजू झालेल्या अधिकाऱ्यांशी त्यांची चांगली ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि चौघींनी आईवडिलांच्या संमतीने संसार थाटले.


Rate this content
Log in