Prof. Dr.Sadhana Nikam

Inspirational

3  

Prof. Dr.Sadhana Nikam

Inspirational

एका जिद्दीची गगनभरारी

एका जिद्दीची गगनभरारी

4 mins
437


काकासाहेब आणि माई यांना चार मुली आणि दोन मुल असा मोठा परिवार. सानवी चार बहिणींमध्ये सर्वांत लहान. तीन बहिणी आणि दोन भावानंतर सानवी जन्माला आली. सानवीच्या जन्माच स्वागत घरात जोरात झाल. काकासाहेब तलाठी होते तर माई गृहिणी. काकासाहेबांचा पगार कमी पण तरी कुटुंब समाधानी होत. काकासाहेबांनी कोणाला कधी कमी पडू दिल नाही. सानवीच्या तिघी बहिणी व भाऊ शाळेत जाऊ लागले. मुलाचं आवरण्यातच माईचा बराच वेळ जायचा सगळे शाळेत गेल्यावर माई सानवीकडे लक्ष दयायच्या. सानवी नऊ महिन्याची झाली. काका आणि माईना वाटल की सानवी आता चालेल पण सानवी पायच धरत नव्हती. काकासाहेबाना आणि माईला चिंता वाटू लागली. काकासाहेबांनी सानवीला मुंबईला मोठया हॉस्पिटलमध्ये दाखवलं अनेक दिवस डॉक्टरांचा इलाज चालू होता पण सानवीच्या पायांचे स्नायू खूप अशक्त असल्याने तिला जन्मभर अपंगावस्थेतच राहावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. सानवी पाच वर्षाची झाली तिच्या बहिणी आणि भाऊ सगळीकडे हिंडू फिरू शकत होते पण सानवीला कुठे न्यायचं म्हणजे आधाराची गरज भासत होती. सानवीने शाळेत जायची इच्छा व्यक्त केली पण काकासाहेब आणि माईना प्रश्न पडला नातेवाईकही हिणवू लागले की सानवी शाळा शिकून काय करणार. सानवीच्या हट्टापुढे कोणाचे चालले नाही.


माई कंटाळा न करता सानवीला शाळेत घेवून जाऊ लागल्या. सगळ्या भावंडात सानवी सुंदर देखणी हुशार आणि बुद्धिमान होती पण अपंगत्व असल्यामुळे तिच सगळ तिच्या आई आणि बहिणींवर अवलंबून होत. सानवी बारावीला मेरीटने उत्तीर्ण झाली. तिची कॉलेजला जाण्याची इच्छा होती. तिघी बहिणींचे लग्न होवून गेले होते आणि दोन्ही भाऊ शिक्षणासाठी बाहेरगावी होते पण माईने कंटाळा केला नाही. व्हीलचेअरवर सानवीला बसवून त्या तिला कॉलेजमध्ये पोहोचवत होत्या. एक आशा काकासाहेब आणि माईच्या मनात होती की आपली ही गुणी मुलगी कोणाचाही आधार न घेता चालावी त्यासाठी त्यांनी सर्व नामांकित डॉक्टरना दाखवले, देवाला नवस झाले पण त्यांना यश आले नाही. शेवटी सानवीला बोज न मानता तिच्या मनाप्रमाणे ते करू लागले. अनेक प्रश्न त्यांच्या समोर होते सानवीलाही आता कळून चुकले होते की हे आयुष्य आपल्याला एकटेच जगावे लागणार आहे. अपंगत्व असल्याने सगळ्याच गोष्टीना मर्यादा होत्या आईवडिलांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तिने अनेक इच्छांना मुरड घातली. खाण्यावर सुद्धा तिने बंधन घातले त्याचा परिणाम तिच्या प्रकृतीवर झाला.

    

   बराच काळ लोटला सानवीची चिंता काकासाहेब आणि माईला वाटत होती. सानवीच एम.ए पर्यंत शिक्षण झालं होतं. पुढे करावं काय हा तिच्यासमोर प्रश्न होता.आईवडिलांना बोज बनून राहायचे नाही असे तिने ठरवले. एक दिवस दुपारी माई झोपल्या असताना ती स्वतः व्हीलचेअर ढकलत गरीब वस्तीत राहणाऱ्या महिलांकडे गेली. तिथे राहणाऱ्या चार पाच महिला एकत्र आल्यावर तिने त्यांना शिकवायला सुरवात केली. सुरवातीला त्या महिलांना ते जमेना. पण तिच हसमुख व्यक्तिमत्व. सगळ्यांशी गोड बोलण आणि समजून सांगण त्यांना आवडल आणि बघता बघता पाचाच्या पंचवीस महिला झाल्या. माईनी तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण तिने स्वतःच हा प्रौढ वर्ग चालवायचे ठरवले. तिचा हा वर्ग चालू होता पण चांगल होत असेल तर तिथे विरोध होतोच. ज्या महिला तिच्याकडे शिकायला येत होत्या त्यांना घरातूनच विरोध व्हायला लागला. तिला कळल तेव्हा तिने त्या महिलांच्या घरी जायचं ठरवलं अनेक ठिकाणी तर तिला शिव्याच ऐकाव्या लागल्या. तिला आश्चर्य वाटल. शिक्षणामुळे चांगला बदल होतो आहे मग हा विरोध कशासाठी. तपासांती तिला कळल की त्या महिला घरातील व्यवहारात लक्ष घालू लागल्या होत्या. स्वतःचे मत व्यक्त करायला लागल्या होत्या म्हणून घरातील पुरुषांना ते आवडले नाही.


सानवीने हार मानली नाही ती परत त्या वस्तीत गेली तिने त्या घरातील तरुण मुलांना एकत्र केल त्यातल्या नितीन, मंगेश, शिरीषला तिच्या गोष्टी पटल्या. तिचा प्रौढ वर्ग परत सुरु झाला. प्रौढ वर्गाचा व्याप वाढायला लागला तिच्या कार्याची नोंद आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचली तिला अमेरिकेत एका मोठया कार्यक्रमात “चला शिकू या” या शिक्षण प्रसाराच्या अभियानासाठी बोलावण्यात आल होत. वस्तीतल्या तिच्या सर्व मित्रांनी तिला अमेरिकेत जाण्यासाठी मदत केली. सोबत नितीन,शिरीष मंगेश आणि माई गेल्या. कार्यक्रमाचा दिवस उजाडला. एव्हडया मोठया स्टेजवर बोलण्याची तिला सवय नव्हती पण माई आणि तिच्या मित्रांनी तिला धीर दिला. व्यासपीठावर अनेक नामांकित मोठमोठया व्यक्ती होत्या एक मोठा गुरुगौरव पुरस्कार देवून तिचा भव्य सत्कार करण्यात आला तिने मराठीत सुरवात केली “चला शिकू या”. टाळ्यांचा गजर झाला. तिच्या या अभियानाला अमेरिकेतही दाद मिळाली. आता ती एक प्रतिष्ठीत व्यक्ती झाली होती. अनेक ठिकाणी तिचे सत्कार होत होते.


काकासाहेब रिटायर झाले होते आणि थकलेही होते. त्यांना सानवीच कस होईल याची चिंता लागून राहिली होती. माईना त्यांनी तस बोलून दाखवलं. माईनी सानवीला लग्न करण्याचा आग्रह धरला. सानवी मात्र वेगळ्या विचारांची होती. सहानभूतीने कोणी तिच्याकडे पाहू नये असे तिला वाटत होते. तिच्या मित्रांमध्ये नितीन तिच्याशी नेहमीच आदराने बोलत होता. काकासाहेब आणि माई तिला कोणी अपंग व्यक्ती स्वीकारेल असे स्थळ पाहू लागले. नितीनला ते समजल त्याने त्याच्या घरी आईवडिलांना सानवी त्याला पसंत असल्याचे सांगितले. नितीन पण एम.ए झालेला होता आणि एका सरकारी ऑफिसमध्ये क्लार्क म्हणून नोकरी करत होता. नितीनच्या आईवडिलांनी प्रथम त्याला विरोध केला पण नितीनच्या हट्टापुढे त्यांच काही चालल नाही. नितीनने सानवीला विचारलं. सानवीने नितीनला खूप समजावलं पण नितीनने तिच्याशीच लग्नाचा आग्रह धरला. तिची संमती मिळवली. सानवीचा संसार सुरु झाला आणि दोघांनीही प्रौढ शिक्षणाच काम पुढे चालू ठेवण्याच ठरवलं. आणि एक दिवस तिला “चला शिकू या” अभियानाच अम्बेसेडर म्हणून नेमण्यात आलं आणि तिचा प्रवास

 सुरूच राहिला “चला शिकू या” अभियानाच्या दिशेने...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational