Prof. Dr.Sadhana Nikam

Inspirational Others

3.2  

Prof. Dr.Sadhana Nikam

Inspirational Others

ध्येयवेडा

ध्येयवेडा

4 mins
1.0K


        नोकरीच्या शोधात रोशन हिंडत होता. पेपरमध्ये येणाऱ्या जाहिराती पाहून तो दररोजच नोकरीच्या शोधात निघायचा. रात्री दमून थकून रूम वर यायचा. गेले कित्येक वर्ष त्याचा हा कार्यक्रम चालू होता पण अजून त्याला नोकरी मिळत नव्हती. जिथे त्याला नोकरी मिळेल अशी खात्री वाटायची तिथे आधीच कोणी वशिल्याचा पोहोचायचा. रोशन एम.फार्म झालेला होता. रोशनच्या आईवडिलांना वाटत होते की रोशनने घराची जबाबदारी घ्यावी. रोशनच्या दोन मोठया बहिणी लग्नाच्या होत्या. त्या ही पदव्युत्तर शिक्षण झालेल्या होत्या. रोशन मुंबईत रहात होता. त्याने ठरवलं की आता स्वतःच बिझिनेस करायचा. त्याने नजीकच्या बँकेत जाऊन तपास केला पण त्याला नोकरी नसल्याने कोणी कर्ज दयायला तयार नव्हते. रोशनने मित्रांची मदत घेण्याच ठरवल. सुरवातीला भांडवल कमी होत पण रोशनने ठरवल सुरवात करायची. त्याने मित्रांच्या मदतीने पेपर इंडस्ट्रीज टाकली. अनेक ठिकाणाहून वेगवेगळा कच्चा माल त्यानी गोळा केला. सुपेरियर क्वालिटीचा कागद तयार होऊ लागला. रफ कागदापासून कागदी द्रोण पत्रावळी अशा अनेक वस्तू तयार होऊ लागल्या. जवळच्या मार्केटमध्ये त्या वस्तूची विक्री होऊ लागली. जवळच्या मार्केटमध्ये तेथील स्थानिक लोकाना काम मिळाल. रोशनने हाय क्वालिटी कागद तयार करायला सुरवात केली. त्या कागदालाही जास्त मागणी मिळू लागली. रोशनच्या इंडस्ट्रीजची भरभराट होऊ लागली.

        काही वर्षातच रोशनची ओळख मोठा उदयोगपती म्हणून झाली.रोशनने आंतरराष्टीय बिझनेसला पण सुरवात केली. विविध देशांमधून त्याच्या कागदाला मागणी वाढू लागली त्याच्या कागदाला आर.एस ब्रांड म्हणून ओळखले जाऊ लागले. या आर.एस ब्रांड चा नावलौकिक इतका वाढला की पेपर मध्ये तसेच सोशल मिडिया वर सुद्धा रोशनला आर.एस या नावानेच ओळखले जाऊ लागले. रोशनला आता खूप कमी वेळ मिळायचा पण तरी सुद्धा आठवड्यातून एक दिवस रविवार त्याने सुट्टीचा ठेवला. इंडस्ट्रीज मध्ये काम करणाऱ्या कामगारांना त्या दिवशी सुट्टी असायची. रोशन रविवारी मित्रांना भेटायचा. त्यांच्याशी विचार विनिमय करायचा मित्रांनी त्याला पेपर इंडस्ट्रीजच्या आणखी ब्रांचेस काढण्याचा सल्ला दिला. रोशनला आणखी आर्थिक मदत मित्रांनी केली आणि रोशनने पुणे नासिक नगर अशा शहरात आर. एस इंडस्ट्रीज टाकल्या. प्रत्येक शाखांवर त्याने नवीन अधिकारी नेमले. त्यामुळे त्याच्या इंडस्ट्रीत अनेक तरुणांना व त्याच्या मित्रांनाही रोजगार मिळाला.

        रोशनवर आता जबाबदारी होती बहिणींच्या लग्नाची. वडील रिटायर झाले होते त्याच्या दोन्ही बहिणी नीता आणि गीताचे लग्न झाले. रोशनने आईवडिलांना मुंबईत राहण्यास बोलून घेतले. एकदा त्याच्या नाशीकच्या ब्रांचला एक आंतरराष्ट्रीय सेमिनार घ्यायचं ठरले. अनेक देशातील तरुणांना त्यात आमंत्रित करण्यात आले. दोन दिवसीय सेमिनारची भव्य तयारी करण्यात आली. सेमिनारचा दिवस उजाडला. विविध शाखांमधले अधिकारी,स्टाफ या सेमिनारला आले होते. रोशनने त्याच्या आईवडिलांच्या हातून सेमिनारचे उद्घाटन करण्याचे ठरवले होते. सेमिनार हॉलमध्ये सगळे जमले सेमिनार हॉल डेकोरेट केलेला होता डेकोरेशनसाठी सुद्धा आर.एस ब्रांड कागद वापरण्यात आला होता. सगळे हॉलमध्ये बसले. काही मिनिटात कार्यक्रम सुरु होणार तेव्हढ्यात एक अतिशय सुंदर तरुणी स्टेजवर आली आणि तिने सुरवात केली “लेडीज आणि जेन्टलमन, आय एम मिस स्वप्ना, वेलकम टू ऑल ऑफ यु हिअर”. तीच फ्लुएन्ट इंग्लिश ऐकून सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. तिने आता मराठीत सुरवात केली ती म्हणाली “मी सेमिनारचे उद्घाटन करण्यसाठी आर.एस ब्रांड चे मालक मिस्टर रोशन आणि त्याचे आई पप्पा यांना सेमिनारचे उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित करते. रोशन त्याच्या आईवडिलांना घेवून आला आणि रिबन कापून त्यांनी उद्घाटन केले. उद्घाटन करत असताना रोशन आणि स्वप्ना यांची नजरभेट झाली. तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होत. पहिल्यांदाच त्याने स्वप्नाला पाहिलं होते. त्याच्या नासिक ब्रांचची ती बॉस होती. उद्घाटनानंतर सेमिनार चालू झाला. मध्यंतरी जेवणाची सोय पण केलेली होती त्या वेळेस स्वप्ना रोशन आणि त्याच्या आईवडिलांना बोलवायला आली. एका राउंड टेबलवर जेवणाची व्यवस्था केलेली होती जेवताना त्यांना काय लागेल याचीही चौकशी ती करत होती रोशनही तिच्याशी बोलत होता तिच्या मधुर वाणीने आईवडीलही मंत्रमुग्ध झाले त्यांनी रोशनला तिच्याविषयी विचारले पण त्याला ही फारसे काही माहिती नव्हते.

          स्वप्ना नाशीकच्या जवळ भगुरची राहणारी होती. एका सामान्य परिस्थितीतल्या कुटुंबातील ती होती एम.कॉम झालेली असल्यामुळे नाशीक ब्रांचच पूर्ण व्यवस्थापन अतिशय चांगल्या प्रकारे ती पाहत होती. रोशनला ती आवडली होती त्याने तिच्याशी ओळख केली ओळखीच रुपांतर प्रेमात झाल. रोशन मुंबईला तर ती नाशिकला  म्हणून रोशन तिला भेटण्यासाठी मुंबईहून यायला लागला ही गोष्ट त्याच्या आईवडिलांच्या लक्षात आली त्यांनी स्वप्नाच्या आईवडिलांची भेट घेतली आणि स्वप्नाला मागणी घातली. स्वप्नाला खूप आनंद झाला होता पण तिला एक भीती होती की रोशनची परिस्थिती आणि तिची परिस्थिती यात प्रचंड तफावत होती तिने तस रोशनला बोलून पण दाखवले. रोशनने तिला समजावलं. मुंबईत लग्न करण्याच ठरल आर.एस ब्रांड मालकाच लग्न म्हणजे मुंबईकरासाठी मेजवानीच होती रोशनने त्याच्या सर्व शाखांना तसेच विदेशातील त्याच्या ओळखीच्या मित्रांना, नातेवाईकांना लग्नासाठी बोलावले. लग्नासाठी भव्य मंडप टाकून डेकोरेशन करण्यात आले. त्याच सुद्धा व्यवस्थापन स्वप्नाने केल रोशन आणि स्वप्नाच्या लग्नाचा दिवस उजाडला गोरज मुहूर्ताच लग्न होत. मंडपात गर्दी मावत नव्हती हेलिकॉप्टर मधून नवरदेव नवरी स्टेज वर आले त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. भटजीच्या मधुर मंगलाष्टकाने फटाक्यांच्या रोशनाईत आणि डीजेच्या दणक्यात मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला.

        रोशन एकुलता एक होता त्यामुळे आई वडिलांना सांभाळायची जबाबदारी त्याच्यावर होती त्याने स्वप्नाला तसे सांगितले नासिकला त्याने मोठा बंगला बांधला आईवडीलांसोबत ते नासिकला राहू लागले. आईवडीलही कृतार्थ झाले. रोशनच स्वप्न पूर्ण झाल होते नोकरीसाठी वणवण फिरणारा एक ध्येयवेडा तरुण उदयोगपती झाला होता. आजच्या युवा पिढीसाठी रोशन एक आदर्श होता.Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational