प्रेरणा
प्रेरणा


अमावस्येची रात्र. सगळीकडे काळाकुट्ट अंधार. रस्ता निर्मनुष्य. अशा सुनसान रस्त्यावर प्रेरणा धावत होती ओरडत होती “वाचवा वाचवा”. आजूबाजूने जंगलात जाणाऱ्या पायवाटा होत्या. तिला सुचेना कुठे लपावे एक मोठा जमाव तिच्या मागावर होता. जर ती सापडली तर वाचणार नव्हती. तिने अखेर जंगलाची पायवाट धरली पण तिला अजूनही धाकधुक होती. ती चालत होती दगडाला ठेचाळत होती. चालता चालता दूर अंतरावर तिला मिणमिणता दिवा दिसला तसा तिने दीर्घ श्वास घेतला. ती त्या दिव्याजवळ पोहोचली त्याला लागूनच एक छोटी झोपडी होती. तिने झोपडीच दार वाजवल आतून आवाज आला कौन है| ती गोंधळली. क्षणभर तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ती थांबली. काही कळायच्या आतच तिच्या हातावर राकट पंजा पडला आणि ती आत ओढली गेली. तिच्या कानावर आवाज आला “बैठो”. मोबाईलच्या प्रकाशात तिला दिसला एक उंच धिप्पाड फौजी. रंगाने गोरा लांब सडक नाक आणि पिळदार मिशीचा फौजी. हळू आवाजात तो म्हणाला, मै सुमित. मुझे आपका दोस्त समझो| सुमित म्हणाला “सांग इकडे कस काय आली”. त्याने अस म्हणताच तिला रडू कोसळल. डोळे पुसतच ती म्हणाली “अहो ते गावातले लोक मला मारायला निघाले. त्यांना माझा सुखी संसार पाहवला जात नाही. या गावात मोठा वाडा आहे माझ्या सासू सासऱ्यांचा दादासाहेबांचा आणि माईचा. त्यांचा लहान मुलगा अभयशी माझ लग्न झाल. अभय सिव्हील इंजीनियर. मोठे तिन्ही मुल अपघातात गेले त्याचा धसका दादासाहेब आणि माईनी घेतला. घराची जबाबदारी अभयने सांभाळली. पण नशिबी भोग असतात ते भोगावेच लागतात. मध्यंतरी अशा काही घटना घडल्या की त्याची कल्पनाच न केलेली बरी”.
दोन्ही मुल लहान असतांनाच अभयच अचानक हार्टफेलने निधन झाल जीवाची खूप परवड झाली. राहत्या वाडयावर सावकाराची जप्ती आली. लहान लेकरांना घेवून बाहेर पडले पदरी पैसा नव्हता. वाडयातला नोकर रामूने बहिणीसारखी राखण केली. पुढे मुलांचे पालनपोषण करण्यासाठी चार घरची धुणी भांडी करू लागले”. ती क्षणभर थांबली तिने आवंढा गिळला सुमितने तिच्याकडे पाहिलं ती खूप थकली होती. सुमित तिला म्हणाला “तू जेवण कर आणि झोप”. तिलाही आश्चर्य वाटल की आपली काही ओळख नसताना हा परका माणूस आपली एव्हडी काळजी घेतोय ती म्हणाली “अहो नको तुम्ही जेवून घ्या”.तोपर्यंत सुमित पाय ओढत चुलीजवळ गेला आणि चुलीवरच खिचडीच पातेलं घेवून आला. दोन ताटात त्याने खिचडी वाढली आणि तिला तो म्हणाला “उपाशी राहाण चांगल नाही”. एव्हाना तिच्या लक्षात आल होत की सुमितच्या पायाला काहीतरी लागल आहे. तो म्हणाला “अग माझ्या पायाला गोळी लागली आहे. आम्ही फौजी माणस आमच जगण देशासाठी”. तिने दोन घास खाल्ले. सुमीतने चटई अंथरली. एका बाजूने तो झोपला. तिला कधी झोप लागली ते कळलच नाही सकाळी उठली तेव्हा तिच्या अंगावर पांघरूण होत.
झोपडीच्या झरोक्यातून सूर्याची कोवळी किरण तिच्या अंगावर पडली होती. तिला उठायला उशीर झाला होता तिने अंथरूण आवरलं तोपर्यंत सुमित म्हणाला “तुझ आवरून घे”. तिने पाहिलं झोपडी स्वछ झाडलेली होती. चुलीवर चहा उकळत होता तिने आवरलं तोपर्यंत सुमितने दोन काचेच्या ग्लासात चहा गाळून आणला. स्मितहास्य करून तो तिला म्हणाला,“अग काय हा योगायोग, परिस्थितीने आपल्या दोघानाही झोपडीत आणून सोडलंय”. ती चहा पीत होती आणि चहाचे झुरके घेत घेत मधेच सुमित तिला न्याहाळत होता. दिसायला अतिशय सुंदर, काहीसे निळसर डोळे आणि केसावरच्या बटा गालावर आलेल्या. तो मंद गालात हसला. काय हा नियतीचा डाव. एव्हडी सुंदर तरुणी आणि तिला घर सोडून पळाव लागतंय. प्रेरणाच लक्ष सुमितकडे गेल दोघांची नजरानजर झाली तिला खूप ओशाळल्यासारख झाल. तिने पदर सावरला. सुमित म्हणाला “मी गावातून भाजी घेवून येतो”. सुमीत गेल्यावर तिने कडी लावली. काही वेळाने सुमितने कडी वाजवताच तिने भीत भीतच दरवाजा उघडला. तिला धीर देत तो म्हणाला “तू इथे कशी पोहोचली ते सांग”. ती म्हणाली “अरे माझी रामकथा कधीही न संपणारी आहे. माझी मुल हुशार मुलगी स्वाती आणि मुलगा प्रसाद. त्यांच्या शिक्षणासाठी मोलमजुरी करत होते पण जेव्हापासून मी वाडा सोडला तेव्हापासून गावातल्या सरपंचाची नजर माझ्यावर. त्याने माझ जिण हराम केल. विधवा बाईकडे पाहण्याची पुरुषांची नजर वाईट असते. रामूने सहारा दिला ते ही त्या सावकाराला आवडल नाही अनेक वेळा त्याने मला एकट गाठण्याचा प्रयत्न केला पण रामूने वाचवल. काल वेगळीच घटना घडली. घरी कोणी नव्हत. एकटी पाहून त्याने घराचे दरवाजे लावले आणि मागून घट्ट पकडलं. तो राक्षस जास्तच चवताळला होता. मग मीच हिम्मत केली. पायानेच सरकत मांडणीवरचा खलबत्ता उचलून टाकला त्याच्या डोक्यात. डोक्यातून बरच रक्त जमिनीवरून वाहत होत आणि डोळेही विस्फारलेले होते तो शैतान मेला होता. घाबरलेल्या अवस्थेतच घराच्या मागे लपले आणि अंधाराची वाट पाहू लागले. स्वाती, प्रसाद आणि रामूही घरी आले ते माझा तपास करू लागले. सावकाराचे मित्रही त्याला शोधू लागले शेवटी ते घरापर्यंत आले त्यांना सावकार रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.
थोडा अंधार झाला. मी पळत होते जीवाच्या आकांताने त्यांना चुकवत अंधाराचा फायदा घेत पोहोचले तुमच्या झोपडीपर्यंत”. तिला दम लागला होता सुमितने पाण्याचा ग्लास तिच्यासमोर केला आणि तो म्हणाला शाब्बास ! काही वेळाने तीच म्हणाली “पण तुम्ही इथे कसे! तेव्हा सुमित म्हणाला “अग जवळच्या शहरात माझ पोस्टिंग असतांना अतिरेक्यांनी केलेल्या हल्यात पायाला गोळी लागली तसच लपत लपत पाय ओढत शहराबाहेर आलो तेव्हा सुनसान रस्त्यावर ही झोपडी दिसली. गावकऱ्यांनी मला दवाखान्यात नेल आणि पायातली गोळी काढली पण अजून जखम भरलेली नाही”. सुमितने मुलांना आणताच आई भेटल्याचा आनंद मुलांना झाला. सुमितच्या पायाला झालेली जखम भरण जरूरीच होत पण जवळ पैसा नव्हता. रात्री मुल आणि सुमित झोपल्यानंतर तिने जंगलातून काही फळ फुल, काही वाळलेल्या झाडांचं सरपणही गोळा केल दुसऱ्या दिवशी अंधारलेल्या पहाटेच गावाकडे निघाली. रात्री गोळा केलेली फळ, फुल आणि सरपणाची सहजच विक्री झाली. मिळालेल्या पैशातूनच तिने सुमितची डॉक्टरकडे तपासणी केली. सुमितने पाय बरा होताच दोघांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. सुमितला वॉचमनची नोकरी मिळाली. प्रेरणाही आंगणवाडीत खिचडी बनवायला जावू लागली. दोघांनी मिळून कुटुंब सावरल. स्वाती इंजिनियर तर प्रसाद नामवंत डॉक्टर झाला. स्वातीच लग्न झाल तर प्रसादनेही पुण्यात एक मोठ हॉस्पिटल टाकल आणि तोही विवाहबद्ध झाला. घरटयातली दोन पाखर दोन्ही दिशांना उडून गेली. सुमितच्या आयुष्याला जगण्याची प्रेरणा मिळाली.