AnjalI Butley

Abstract Children Stories

4.0  

AnjalI Butley

Abstract Children Stories

टप... टप...

टप... टप...

2 mins
167


टप.. टप.. चा आवाज कानात आला की गरम मातीवर पडलेले ते थेंब! छान एक सुगंधी वास नाकातुन आत ओढला जातो, तेंव्हा डोळे मिटलेले असतात! अस अत्तर कुठे विकत मिळणार नाही... आधी खिडकीतुन बाहेर बघायच, थेंबांचा आकार, जमिनीवर पडला की हळुहळु ओली होणार, झाडांना नाहु माखु घालणार... 


अरे तारेवर कपडे वाळत टाकले आहे ते ओले होणार हे मनात येताच शर्यतीत आपला पहिला नंबर अशा दिमाखात अंगणात पळायच व तारेवरचे कपडे काढण्याचा प्रयत्न करायचा, त्यात हातात सगळे कपडे मावत नसे मग काही खाली पडत! ओले होत! ओरडा ठरलेलाच, एक काम धड करता येत नाही...

खरच, पाऊस पडतांना त्याच टप टप करत एक एक थेंब आकाशातुन खाली पडतांना हातात तो थेंब पकडण्याचा प्रयत्न! हाताला झालेला तो ओला स्पर्श... वा! मस्त! 


हळु पडणाऱ्या पावसाच्या सरी आंगावर घेणे ते ही फिरकी मारून , ओल चिंब झाल्यावर घरात जावुन हुडहुड करण, मग आईने आपल्या साडीच्या पदराने पुसून देणे, त्या वेळेस सांगितलेल्या काही गोष्टी!


जा आंघोळ करून घे गरम पाण्याने.. हो जाते... हो जाते करत पावसाकडे पाहत राहण, त्यामुळे नाहुन निघालेले झाडे फुले, ते तारेवर लटकलेले पाण्याचे थेंब, हीर्या मोत्या च्या हारा सारखी वाटायची ती तार! त्या लटकत्या थेंबात आपल रूप पाहायचा प्रयत्न! काय तो बालिशपणा!!!

एकदा डोक्यात खुळ गेल, कोणाच तरी ऐकले पैशांच झाड लावायच पावसात मग छान खूप पैसे येतात त्याला, मग काय आपण ही प्रयत्न करू म्हणून जवळचा एक रूपया अंगतात पेरूच्या झाडाजवळ खड्याकरून लावला! पुरला माती नाही म्हणायच हं!


काय थोड्या वेळाने हळुवार पडणारा पाऊस धो धो पडू लागला, अंगणात पाणी साठल! घरात येणार म्हणून आमची धावपळ, वस्तू इकडच्या तिकडे वर ठेव. जवळपास ३-४ तास पाऊस धोधो पडतच होता, मी पण घाबरली, आपण पैशाचे झाड लावले व जोरात धोधो पाऊस पडला, मी नाही बोलवल पावसाला करत जोर जोरात रडायला लागली, एवढा जोरात पाऊस पडत असून ही आई हसत होती माझ्या बोलण्यावर गाल्यातल्या गालात! 

मुसळधार पाऊस आला त्यात तो वाहुन गेला!


अरे असे पैशाचे झाड वैगरे नसत लावत, पैसे पुरून झाड तयार होत नाही! ते तसे म्हणतात उपरोधक म्हणून! असा कोणावर विश्वास ठेवायचा नाही! 

थेंबे थेंबे तळे साचे तसे थोडे थोडे पैश्याची बचत करायची असते व अडीअडचणीला या बचत केलेल्या पैशाचा वापर करायचा असतो!!

प्रत्येक पावसात ही माझी वेडी आठवण आठवत रहाते व छान निरागस हसु गालांवर येत!


सध्या पाऊस कोणत्याही ऋतूत पडतो व जे नुकसान करतो शेतकऱ्यांचे, नदी, समुद्र किनारी राहणाऱ्यांचे त्यावरून राजकारणी लोकांमध्ये चढाओढ, पॅकेज किती द्यायचे नुकसान झालेल्यांना! पैशाचे झाड!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract