टाकलेला..
टाकलेला..
संदीप घरी आला. अलीकडे त्याला सारखा लेट होत असे. त्यामुळे शामल सतत चीड चीड करत असे आज ही तो घरी यायला आणि तिची बडबड सुरू झाली. संदीप काय चाललय तुझं रोजच कसा उशीर होतो तुला? आणि घरी येऊन पण त्या फोन मध्ये डोकं खुपसलेलं. शामल किती कटकट करतेस कामासाठी च जातो मी बाहेर . तुझ्या या कटकटी मूळे घरी यायची पण इच्छा होत नाही मला. हो का नको ना येऊ मग रहा त्या ऑफिस मधयेच. मी माझ्या मुली राहतो आमचे आम्ही. संदीप फ्रेश होऊन बेडवर झोपायला गेला. शामल आणि संदीप 14 वर्षाची रितू सोळा वयाची हर्षु असे चौकोनी कुटुंब .छान मजेत जगत होते पण अलीकडे संदीप कामाच्या नावा खाली सतत उशिरा येत असे ना शामल ला वेळ देत असे ना मुलींना. तो फक्त काम आणि मोबाईल यातच रमलेला असायचा.
सकाळी संदीप ऑफिसला आला. संध्याकाळी आज लवकर घरी जावे असा विचार करत होता. सँडी चल ना लवकर आज मस्त ड्रिंक करायचा मूड आहे माझा. अनन्या त्याला म्हणाली. अनु आज नको मी आज घरी जातो लवकर रोजच शामल कटकट करते ग. अलीकडे मी तिला वेळ पण देत नाही. ओहह मी पण एकटीच असते संदीप गेली तीन वर्ष हेच तर करत आहेस ना तू. थोडा वेळ मला द्यायचा स्वतः रिफ्रेश व्हायचं आणि घरी जायचं कारण तुझी फॅमिली वाट बघते माझं काय ना. मी मात्र एकटी जा तू म्हणत रागाने अनन्या ऑफिस मधून बाहेर पडली. अनु लिसन प्लिज संदीप इतकं बोले पर्यंत ती बाहेर ही पडली. संदीप लगेचच तिच्या मागेमागे तिच्या घरी आला. त्याच्या कडे ही तिच्या घराची लैच की होती. त्याने दार उघडले. अनन्या सोफयावर बसली होती . संदीपने तिला आपल्या मिठीत घेतले म्हणाला,सॉरी अनु यु आर माय वर्ल्ड ,आय कान्ट हर्ट यु . तू एकटी नाही आहेस मी आहे ना कायम सोबत तुझ्या. आय एम युवर वर्ल्ड ना सँडी देन टोल्ड युवर वाईफ अबाउट आवर अफेअर. हो अनु वेळ आली की सांगेनच ग पण तू नको ना नाराज होऊस? ती त्याच्या मिठीतुन बाजूला झाली. हॅव अ ड्रिक सँडी? नो अनु आय विल गो नाऊ प्लिज. ओके जा ती म्हणाली.
संदीप घरी आला. तो फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला. शामल काम आवरत होती. त्याचे प्रेस करून आलेले कपडे ठेवायला ती बेडरूम मध्ये आली. त्याच्या फोन वर मेसेज आला. तिने दुर्लक्ष केले पुन्हा मेसेज टोन वाजला मग कुतूहलाने तिने फोन पहिला. स्क्रीनवर मेसेज आला होता कोणा अनु नावाने मेसेज आला होता लव यु टू सँडी. फोन लॉक होता त्यामुळे तेवढा मेसेज फ्लॅश झाला ते शामलला दिसला. संदिप बाथरूममधून बाहेर आला. तसे शामल फोन त्याच्या समोर धरत म्हणाली, कोण आहे ही संदीप? तुला लव यु म्हणते? कधीपासून हे सुरु आहे तुझं? शामल गेली तीन वर्षांपासून मी आणि अनन्या एकत्र आहोत मी तुला हे सांगणारच होतो. वा संदीप गेली तीन वर्ष तू मला आपल्या मुलींना फसवत होतास तर म्हणून रोज उशिरा येणं, सतत त्या फोन मध्ये गुंतन. अरे वीस वर्षे झाली आपल्या लग्नाला आणि आता तू अफेअर करतोस काय कमी केले मी तुज्यासाठी कुठे कमी पडले मी सांग? शामल मला तुला हर्ट करायचे नव्हते पण झाले प्रेम अनन्यावर ते का ठरवून होते का इव्हन आता ही मी तुला माझ्यापासून दूर नाही करणार आहे आय अल्सो लव यु. मी तुला आणि आपल्या मुलींना काही ही कमी पडू देणार नाही. जे जसे चाललय तसे चालू राहील मी फक्त इतकेच सांगतो की जसे तू मला हवी आहेस तशी अनन्यापण मला हवी आहे. आम्ही खूप प्रेम करतो एकमेकांवर पण म्हणून तुला इग्नोर नाही करणार मी.
शामल खूप हर्ट झाली होती रडत होती. संदीप तुला काय वाटले मी माझं प्रेम माझा नवरा कोणा दुसऱ्या बाईसोबत शेयर करायचे का? हॉऊ मिन यु आर? तुला नसेल पण मला माझा स्वाभिमान आहे. त्यांचा आवाज ऐकून रितू आणि हर्षु बेडरूम बाहेर येऊन उभ्या राहिल्या होत्या. रितू आत आली म्हणाली, बाबा तुम्ही आईला चिट केले आहात. तुमचे बाहेर अफेअर आय कान्ट बिलिव्ह! रितू तू आमच्यामध्ये बोलू नकोस बाहेर जा. का बाबा मी लहान नाही आता मला समजते सगळं. शामल बोलली रितू तू जा बाहेर प्लिज. मग ती बाहेर गेली. शामल ऐक ना माझे मी तुला टाकून वगैरे देणार नाही गं डिओर्सपण नाही देणार मला तुझी मुलींची काळजी आहे. संदीप बास आता तुला काय वाटले मी तुझ्या कडे रडत भीक मागेन की मला या घरातून काढू नकोस म्हणून नो मी माझ्या मुलींना सांभाळायला समर्थ आहे त्याची काळजी नको करू तू फसवलेस मला तरी मी तुझ्याजवळ राहू अशी अपेक्षा पण करू नकोस. प्रतारणा ती प्रतारणाच असते. मी तुझ्या जागी असते तर तू मला माफ केले असतेस का? आणि तू कोण मला टाकून देणारा मीच तुला टाकते. हे घर माझ्या ही मालकीचे आहे तेव्हा संदीप तू या घरातून चालता हो. जस्ट गेट आऊट. मी माझ्या मुलींसाठी आई बाप दोन्ही भूमिका निभवायला सक्षम आहे. संदीपसमोर कोणताच पर्याय उरला नव्हता.
अशा कितीतरी शामल आहेत ज्या परिस्थितीपुढे हार मानत नाहीत. खंबीरपणे त्या परिस्थितीवर मात करतात. तिच्यासमोर अनेक अडचणी, प्रश्न आहेत तरीही ती लढा देतच आहे न डगमगता! या पुरुषसत्ताक समाजाविरुद्ध ती आज ही दोन हात करत आहे. तिची लढाई अजून संपलेलीच नाही. ती लढते आहे कारण ती सक्षम आहे