Priya Jawane

Abstract

4  

Priya Jawane

Abstract

तो आणि ती - "ओढ....!

तो आणि ती - "ओढ....!

6 mins
212


कॉलेज पार्किंग मध्ये एकटीच बसले होते. नुकताच पाऊस बरसुन गेला होता. मात्र आभाळ चांगलचं भरलं होतं, अजुनही खुप बरसनं बाकी होतं. 


खरंतर यावेळी मी घरी निघायला हव होतं. लेक्चर संपले होते पण तरीही निघु वाटत नव्हत. हेडफोनमध्ये आवडते मिलिंद इंगळेचे गारवा गाणे चालु होते पण म‍ाझं लक्ष नव्हतं त्याकडे, मी माझ्यातच हरवलेली होती. काहीच भावना नव्हत्या त्यावेळी. खरतर खुप भुक लागली होती. सबमिशन्सच्या टेन्शनमध्ये आजचं जेवन मी कुरबान केलं होतं, मात्र एका मेसेज टोन ने माझी भुक कुठल्या कुठे पळाली. हो त्याचा मेसेज होता.

 

'वेळ असेल तर येऊ शकतेस घरी? आता?'

त्याने घरी बोलवलं होतं. पहिल्यांदा असा मेसेज करुन. आमच्यातले गैरसमज मागच्या वेळी झालेल्या अबोल संवादातुन आता कायमचे मिटले होते. मी बाकी काही विचार न करता गाडी चालु केली. त्याच्या घराकडचा रस्ता आता पुर्वीसारखा मला माझा वाटत होता. तो रस्ताच मला आता माझा वाटत होता.


'मंजिलसे भी ज्यादा प्यार अब इन रास्तोंसे होने लगा है।

मंजिल तो मिल हि जायेगी पर साथ बस इन रास्तो का है।

वो बिखरे सुके पत्ते आज भी मुस्कुराह कर हमे राह देते है।

हम तो मंजिल कि चाह में थे, हमराही तो ये रास्ते होते है।'


त्यावेळी सुचलेली असचं काहीसं होत. पण हो तो रस्ता आता माझा होता कारण तो मला त्याच्यापर्यंत पोहचवत होता. माझ्या आनंदात तो पाऊसही वरतून बरसु लागला. काहीवेळातच मी पुर्ण भिजले. मात्र मला पर्वा नव्हती. लवकरात लवकर त्याच्या घरी पोहचायच होतं.

अखेर त्याच्या घरी पोहचले. दरवाजा उघडा होता. मी पळत आत गेले. त्याच्या ओट्यावर उभं राहुन आधी बॅग काढली. ओढनी सोडुन तशीच उभी होते. पाऊस वाढतचं होता. माझा आवाज आल्यावर घाईतच बाहेर आला. कदाचित पावसाच्या आवाजामुळे त्याला मी गेटच्या आत आलेली कळाले नव्हते. मला पाहून तो परत आत पळाला आणि कोरडा टॉवेल घेऊन आला. मी हात तोंड पुसलं. 


'इथेच थांबनार आहेस आत चल आधी' 

तो थोडा चिडुनच बोलला.

'माझा ड्रेस ओला आहे. फरशी खराब होईल.' 

मी केविलवानं बोलले. 

तो जरा वैतागला. 

' मिच्च, ते पाहु नंतर. आत चल आधी.'

मी आत जाऊन दरवाज्यातच थांबले. त्याने माझ्या मागे दार बंद केलं. लाईट नव्हतीच, बाहेरचा प्रकाश ना मात्र होता. हॉलमध्ये एक ईनव्हटर वर चालनारा लॅम्प होता, म्हणून अंधाराचा प्रश्न निकाली लागला होता. मी थंडीने अक्षरक्षा मरत होते. 


(अरेच्चा, हा कुठे गेला? तो वर गेला होता पण कशासाठी?)

मी विचारात असताना तो मऊमऊ दुलई घेऊन आला. माझ्याभोवती लपेटून त्याने मला सोफ्यावर बसवले. सोफा ओला झाला होता त्याची दुलईही. मी पुर्ण पॅक होऊन फक्त तोंड उघड ठेऊन बसले होते. मला तस पाहून तो खुप गोड हसला, आणि किचनमध्ये गेला. थोड्याच वेळात गरम चहा आणि भजे घेऊन अवतरला.

(म्हणजे तो माझ्यासाठी भजे बनवत होता. तस किचनमध्ये त्याला जवळ जवळ सगळ बनवता येत पण तो कधी स्वतःसाठी बनवत नाही. मागे एकदा त्याने माझ्यासाठी असेच पोहे बनवले होते. शपत सांगते असे उत्कृष्ट पोहे आयुष्यात कधी खाल्ले नव्हते. असो आज त्याने भजे बनवले होते. आणि मला बोलावलं होतं म्हनजे माझ्यासाठीच बनवले असनार.)


'हात बाहेर काढु वाटत नाहीये.' 

मी कुडकुडत बोलले. त्याने हसुन मान खाली घातली.

'का आलीस?' 

त्याने वर पाहत भुवई उडवत विचारलं.

मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहील. त्याने चहाचा गरम मग माझ्या हातात दिला, मी थोडी सावरले.

'तुच बोलावलं होतसं ना'

 माझा बालिशपणाचा युक्तीवाद.


 (कारण अशा पावसात मी यावं असं त्याला कधीच वाटनार नाही. माझी काळजी करन हा त्याचा पार्ट टाईम उद्योग जो आहे. एकदा त्याला मी असाच त्याच्या इन्कमबद्दल विचारलं होतं. तर त्याने कोनाचं तरी स्थळ मी आणलं म्हणून चार दिवस माझा फोन घेतला नव्हता. भिती लग्नाची अजुन काय. तसा तो फार समंजस, संयमी पण कधी कधी अगदी लहान, बालिश, निरागस बाळासारखा वागतो.असो)


'पाऊस पाहीलास ना, तु घरी जायला हवं होतं. माझचं चुकलं. बाहेरचा अंदाज न घेता तुला मेसेज केला.' 

तो खिन्न होत बोलला.

'चालेल तुला इथं मी नकोय तर निघते मी घरी लगेच' 

मी सोफ्यावरुन उठायचं नाटक करत बोलले.

'पिऊ'

तो वैतागुन बोलला.

एव्हाना चहा आणि भजे संपले होते.

'तु मला बोलावलं ना तर हा पाऊस काय वादळ जरी असेल तरी मी येईल.' 

मी शांततेने त्याच्या डोळ्यात पाहत बोलले.

त्याने स्मित करत पुन्हा खाली पाहील.

'बरं आता सांग ना का बोलावलयं. भजे खाण्यासाठी तर बोलावनार नाहीस फक्त... नवीन व्यक्ती??' 

मी आनंदाने विचारलं.

'हो' 

तो सुस्कारा टाकत बोलला.


डॉ. स्निग्धा, केबिनमध्ये बसुन केस हिस्टरी पाहत होती. पेशंट २५ वर्षाची मुलगी, रुपाली. लग्नानंतर अगदी १० दिवसात नवर्‍याने कायमची माहेरी पाठवली. कारण आम्हाला जशी हवी तशी नाहीये रुपाली म्हणून. एवढी गोड संस्कारी मुलगी पण केवळ मुर्खपणा करुन तिच्या नवर्‍याने तिचं आयुष्य बरबाद केलं. 

१० दिवसापुर्वी असलेल्या नव्या नवरीचा साज केव्हाच रुपालीसाठी पोरका झाला होता. हातावरचा मेहंदीचा रंग अजुन उतरलाही नव्हता तेच रुपालीच्या नवर्‍याने तिला सामाजिक भाषेत टाकलं होतं. 

काय चुक होती तिची केवळ ती विरोध करत नव्हती एवढी. जे झालं ते मान्य करुन नशीब समजुन ती माहेरी आली, मात्र वडिलांनी इज्जतीच्या नावाखाली तिला रुममध्ये बंद केलं. शेजार्‍यांना, लोकांना कळू नये म्हणून रुपालीची अवस्था एका कैदेतल्या पक्ष्यासारखी झाली. आधीच नव्या आयुष्याकडून असनार्‍या अपेक्षा संपुष्टात आल्या होत्या त्यात ही विनाअपराधाची शिक्षा. 


ती एकलकोंडी होऊ लागली. संयमाची जागा राग घेऊ लागला. रोज रोज होनारा अपमान, अवहेलना याचाच त्रागा करुन तिने एके रात्री तिच्या आईवडलांवर जिवघेना हल्ला केला. ते दोघे वाचले मात्र पोलिसांनी तिला अटक केली. मानसिक आजाराने ती भयंकर त्रस्त होती त्यामुळे तिला लवकरच मानसिक उपचारासाठी इस्पितळात हलवले. 

ती आजही शांत असते. बोलत नाही. तिचे आईवडील आता ठिक आहे पण तिला जवळ ठेवत नाहीत. ती तर भेटतही नाही त्यांना. तिच्या नवर्‍याने केव्हाच घटस्फोट मंजुर करुन घेतलाय.

 'रुपाली मात्र आजही झुरतिये. तिला गरज आहे फक्त.....'

'प्रेमाची!!!'

 मी त्याचं अर्धवट वाक्य पुर्ण केलं.

'कधी भेटायचं तिला? काळजी नको करुस आपण काढू तिला या कोशातुन बाहेर' 

मी आत्मविश्वासाने बोलले.

त्याच्या चेहर्‍यावर हसु उमटले. कदाचित माझं उत्तर त्याला माहीत होतं पण तरीही तो त्याचं मन मोकळं करत होता. 


रुपाली ती गुन्हेगार नव्हती. हो तिने तिच्या आईवडलांवर हल्ला केला होता पण त्यात गुन्हेगारी प्रवृत्ती नव्हती. ती ग्रसित होती अपेक्षाभंगामुळे, प्रेमभंगामुळे. तिला गरज होती समजुन घेण्याची. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिने भोगली होती. एकांतवासापेक्षा भयानक नक्कीच कोणती शिक्षा नाही. पण आम्ही देनार होतो तिला हवा असनारा एक हात... जो तिच्या कोशातुन बाहेर काढण्याचा प्रयत्न करनार होता, त्या उजेडाशी तिच नातं पुन्हा जोडु पाहनार होता. मी माझा निर्णय ऐकवला. त्याने थंड सुस्कारा सोडला. कदाचित त्याच्या मनावरचं आेझं हलकं झालं होतं. आम्ही लवकरचं रुपाली ला भेटनार होतो. तिला ठिक करण्याचा निदान प्रयत्न तरी करनार होतो.

बाहेर पाऊस बरसत होता. संध्याकाळ उलटुन गेली होती. त्याने माझी गाडी आत लावत त्याची brezza बाहेर काढली. काय जादु आहे पावसाची आज हे सर स्वतः मला घरी सोडायला निघाले होते.


 रुपालीबद्दल ऐकुन खरंतर मी खुप हादरले होते. पण तिला यातुन बाहेर काढणं हा च या भितीवर तोडगा होता. अंधार चांगला पडला होता. पाऊस बरसतच होता. त्याच्या गाडीतही गारवाचे गाणे सुरु होते.

'पिऊ. . .'

बाहेरचा पाऊस आवाज करणं माझ्यासाठी थांबला होता. तो बोलत होता, त्याने स्टेअरिंग वर हात सैल ठेवले होते.

'तुझ्यातलं प्रेम तुझं सगळ्यात मोठं यश आहे. कधी गमावू नको. दुसर्‍याविषयी असणारं तुझी आत्मियता तुला अजुनच सुंदर बनवतो. आयुष्यात अनेक संकटं येतील याच प्रेमाने, संयमाने त्याचा सामना कर.' 

'तु असशिल ना त्यावेळी माझ्यासोबत?' 

मी खुप जड अंतकरणाने प्रश्न केला. खरतर मी सोडून दिलेला प्रश्न मी पुनः त्याला केला होता.

'कायम..... !'

त्याने दिर्घ श्वास घेत उत्तर दिलं.

माझे डोळे आनंदाश्रू ने भरले. त्याने दिलेले एवढा शब्द माझ्यासाठी पुरेसा होता. घराजवळ आल्यावर त्याने गाडी थांबवली. छत्री माझ्या हातात देऊन त्याने आतुनच दरवाजा उघडला. मी घरात येण्यासाठी त्याला आग्रह केला. पण येईल पुन्हा कधी म्हणुन त्याने हसुन मला जायला सांगितले.


मी घराच्या आत जाईपर्यंत तो पाहत होता. ऐन दारात गेल्यावर मी मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहर्‍यावर हसु तराळलं मी असं हसताना त्याला कधीच पाहीलं नव्हतं. असो तो आनंदी म्हणजे माझ्यासाठी आयुष्य.

क्यु रुकना चाहता हैं ये दिल

जब सब आगे निकलते जा रहें हैं, 

क्यु आज भी लगता हैं कुछ छुट तो रहा हैं, 

फिर भी ये रुकना चाहता हैं एक सुकुन के लिये।


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract