Prashant Shinde

Drama

4.2  

Prashant Shinde

Drama

ती....!

ती....!

8 mins
969


खरं म्हणाल तर ती म्हणजे न सुटलेलं कोडं किंव्हा न सुटणार कोडं किंव्हा न सुटणार गणित म्हंटल तरी चालेल..!अस का याला काही उत्तर नाही.आहे हे असंच आहे इतकं मात्र नक्की.

अंगण वाडी ,बाल वाडी वगैरे आमच्या वेळी नव्हती ,डायरेक्ट पहिलीला प्रवेश ते पण मोठ्या भावाने प्रार्थनेच्या रांगेत सोडलेला.ना शाळेच कौतुक ना शिक्षणाच कौतुक.पूर्वी पोर व्हायची म्हणून व्हायची त्यामुळे सर्वांच्या वाट्याला जन्माच्या आंनदा पेक्षा जन्माला का आला याचा विचार ,मग त्यावर विचार मंथन होत रहायचं आणि पाठोपाठ परत पाळणा हलायचा.एक भावंड संगतीला अवतरायच.जन्माला यायचं म्हणायचं नाही कारण ते आपोआपच आवतरायच जणू परमेश्वराचा वरदहस्त असावा असा अविर्भाव चेहऱ्यावर झलकायचा.आणि कारण मिमौन्सा त्याच्या कृपेने इतकीच असायची.त्यामुळे संसाराच्या गाडीला डब्यांची कमतरता नसायची.एका पाठोपाठ एक करीत चांगली सहा सात डब्यांची गाडी सहज तयार व्हायची.

झालं पहिली दुसरी तिसरी करीत गाडी शिक्षणाची मजल दरमजल करीत करीत बारावीच्या उंबरठ्यावर येऊन पोहचली. या प्रवासात अनेक कडू गोड अनुभव आले.शाळेतल्या गृहपठाच्या वही वाटपा पासून ते पुस्तकांच्या चाळणी भांडणा पर्यन्त सार सार भेदभाव न पळता पार पडलं.कधी चीनचा अवळ्यांची देवान घेवाण तर कधी पेरुचिबचिमन्या दातांची वाटणी तर कधी कधी झाकून झाकून गोळ्या,चिक्की, चिनमुरे फुटाणे यांची खादगी नाहीतर गारेगारची कांडी मोड सार कसं मस्त मजेत पाट पडलं.

 ठिगळ लावलेली चड्डी,दोरी कंबरेला बांधून केलेला इनशर्ट ते टापटीप पट्टा, कोंबडा भांग, थोडी पावडर करीत करीत बुडाला ढिली फुल पॅन्ट कधीआली ते कळलंच नाही.

केंव्हाही निकालाच कौतुक झालं नाही की गाजावाजा झाला नाही.पोरग पास होतंय हे मोठ्ठ अप्रूप.पहिला नंबर कायमचा ठरलेला.अभ्यास करा अथवा न करा

नंबर काही चुकला नाही .प्रत्येक वेळेस चित्रकला गोळाबेरीज करण्यासाठी धावून आली.त्यामुळे याची अक्षर छान,हात छान करीत थोडं मिरवायला मिळालं.

सणासुदीला रांगोळ्या काढणे,आकाश कंदील तयार करणे,गणपती आरास करणे असे तत्सम प्रकार लीलया पार पडायचे,नाव ही व्हायचे.गावातून फिरताना बरे वाटायचे.

त्या काळात मुली सुद्धा चार हातावर कुजबुजायच्या.

अग तो बघ कसा दिसतो,कसा अवतार करून आलाय,याला काय दुसरे कपडे नाहीत काय?पायात चप्पल घालायला काय होतंय अशी अनेक वाक्य कानावर पडायची,जणू विरोधी पक्षात काळजी वाहू सरकार वाटायचं.

त्यातून याला कस जमत,तो मुळातच हुशार,तो मुळातच कोडगा,मुळातच गच्च्याळ,अक्कल शून्य,बावळट,विचित्र वल्ली,मुर्ख ,जरा आगावूच अशी अनेक बिरुद पण पाठोपाठ येऊन आदळायची.

अशा बऱ्याच शब्द सामर्थ्याची शिदोरी कनवटीला बांधून छान पैकी हसत खेळत बारावी पर्यंतच शिक्षण तालुक्याचे ठिकाणी पूर्ण झाले आणि रस्ते फुटायच्या वेळेने जीवनाच्या उंबरठ्यावर दस्तकं दिली.

घरात काय करणार ते काय कर याची चर्चा रंगली.आमच्या घरात लोकशाही,अगदी हमरीतुमरीवर चालायची.लोकशाहीच झुकत माप

माझ्या एकट्याच्या विरोधात मजबूत व्हायला काहीवेळा लागला नाही.

तरी पण मी जिद्द सोडली नाही आणि सातवी पासून ठरवून ठेवलेल्या ध्येया साठी खिंड लढविली.आमच्या कडे शेवटचा निर्णायक शब्द मसणात जा आणि माझी architecture च्या कोर्स साठी पुण्यास पाठवणी झाली.

आधी मोठा भाऊ पुण्यात होता त्याच्या कडून थोडे पत्ते घेतले आणि रात्री अकाराची कोल्हापूर पुणे एसटी गाठली.थोरल्या भावाने(जयंतदादा)हातातले घड्याळ देऊन निरोप दिला आणि इतकंच म्हणाला"विद्येच्या माहेरात जातोयस प्रत्येक क्षणी काही तरी शिकतोय या भावनेने रहा.झाले दुसरे दिवशी पुणे आले आणि जीवनाचा दुसरा अध्याय चालू झाला.

खेड्यातून शहरात एकटाच म्हणजे दिव्य त्यात रिक्षा म्हणजे त्या काळी विमानाचाच प्रवास.त्यात भरीस भर पुणे भामट्यांचे गाव,रिक्षा वाले फसवतात वगैरे ठासून ज्ञान भरलेलं.

चहा घेतला आणि बॅग(पत्र्याची ट्रॅक)उघडली तर पत्त्याची वही गायब,घरीच तिने साथ सोडलेली.आणखीन एक पोटात भीतीचा बॉम्ब फुटला.रडावे तर रडणे पहाणार कोण.सरळ कॉलेजचा पत्ता विचारला आणि कॉलेज नावाचे गेस्ट हाऊस चालतच गाठले.आमच्या कॉलेजला कॉलेज म्हणण्या सारखे काही नव्हते हे सत्य.पहिले दोन दिवस कॉलेजवर काढले आणि नशिबाने साथ दिली.

अरुण फडणीस माझ्या थोरल्या भावाचा मित्र(हेमंत दादाचा)बजाज स्कुटर वरून जाताना रस्त्याने जाताना दिसला आणि बेंबीच्या देठापासून मी हाक मारली.स्वर्गीय सुख म्हणजे काय हे कळाले.बुडत्याला काडीचा आधार मिळाला.मग मुक्काम उंबऱ्या गणपती चौकात लक्ष्मी रोडवरच्या रमवर हालवला.आणि मग तेथून पुढे मग पुणे विद्यार्थी वसतिगृह जनवाडी ते नन्तर १७५३सदाशिव पेठ पुणे या पत्त्यावर स्थिर झालो.

चार पाच दिवसच झाले असतील पुण्यात पाऊल टाकून ,कॉलेज वरून बाजीराव रोडने कॉलेज करून घरी परतत होतो आणि एक रिक्षात आईबरोबर बसताना माझी आणि तिची नजरा नजर झाली.

मी गावंढळ, काय झाले कळालेच नाही.मला ओआहुन ती हसली आणि माझी व्हीकेत पडली.झाल जीवनाला पूर्ण विराम मिळाला आणि तिसरा अध्याय सुरू झाला.

बेचैनी वाढली आणि ओरमात जे जे होत ते होत गेलं,होतच राहील.माग काढला,कोपऱ्या कोपऱ्यावर जागा ठरल्या.आडोसा बुक केला.त्यावेळी सायकल एकच साठी दारीण. तिचीही मग किंमत वाढली,काळजी घेणे सुरू झाले, पुसणे स्वच्छ ठेवणे सार सार पार उडू लागलं.अंगावर स्वच्छ कपडे येऊ लागले,केसांचा कोंबडा झाला,गालावर पावडर उडू लागली, रोज आंघोळ पण होऊ लागली.स्लीपर चप्पल गेले पायात बूट आले आणि सोबतीने कॉलेजच्या दांड्या वाढू लागल्या.

शाळेचा पत्ता कळला, ती गणिताच्या क्लासला जायची तोही पत्ता लागला.तेंव्हा ती सातवीत होती.नन्तर तिची शाळा मात्र बुलेट ट्रेन प्रमाणे नंबरात पार पडत होती आणि आमची पॅसेंजर गचके खात खात स्टेशनचा पत्ताच लागू देईनाशी झाली.वाटायचं प्रेमात पडल की कोणीतरी करणी चेटूक करत की काय?पण चिकाटी कायम टिकून राहिली.

एक दिवस मग काढतांना तिने घरी गोष्ट कानावर घातली.तिचे वडील दबा धरून उभेच होते,जशी ती घरात गेली तसे बाबा सामोरे आले आणि तुम्ही कोण? का मागे लागताय?वगैरे जुजबी विचारणा झाली आणि पुणेरी गोड सल्ला पण फुकटात मिळाला.तुमचं ही शिक्षण व्हायच आहे तिचंही शिक्षण व्हायचं आहे.आधी शिक्षण पूर्ण करा वगैरे झाले आणि मला थोडा आनन्द झाला,ग्रीन सिग्नलच जणू मिळाला.स्फुर्ती अंगात संचारली,पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.आपुलकी वाढली आणि ध्येय निश्चितीचा आनन्द मिळाला.रोज कॉलेज एकीकडे आणि मी एकीकडे घडू लागले.

वाटेत आडवणे,शिव्या खाणे अंगवळणी पडले.थोडे धाडस आल्यावर मग चिट्ठी ठेवण्याचा मनात विचार आला.एकदा क्लास सुटण्याची वेळ साधली आणि धाडस केले.तिचीही सायकल होती BSA लाल रंगांची अठरा इंची जुनी.पण मला ती ही आवडायची कारण ती तिची होती इतकंच.ती क्लास मध्ये गेल्यावर राजा केळकर म्युझियमच्या बोळात सायकलच्या पायडलं जवळच्या बेचक्यात चिट्ठी ठेवली.चिठ्ठीत काय लिहिलं अस तुम्हाला वाटणार.जास्त काही नाही.तुला पाहिलं की तुझ्या सारखाच माझ्या पोटात पण धस्स होत.तुझाच बावळट.तीन पहिली शिव घातली ती बावळट म्हणून आणि तेच माझं तिच्या लेखी नाव पडलं.

तिचा क्लास सुटे पर्यन्त डबा धरून कोपऱ्यावर उभा राहिलो, मित्र सोबतीला होता.काय काय होत होत आणि कसा वेळ जात होता देवच जाणे.अजूनही अंगावर काटा येतो.जीवनातल्या सर्वात महत्त्वाच्या प्रसंगला सामोरा जात होतो. ती परिस्थितीच त्या काळात मोठ्या लढाई सारखी होती.

ती आली तसे हृदयाचे ठोके वाढले,इकडे तिकडे तिने पाहिले जणू तिला पूर्व कल्पना आली असावी.पटकन खाली वाकून तिने चिट्ठी घेतली, मैत्रिणीला कळायच्या आत वाचून खिशात टाकली.आणि चेहल बदलला.गोरी मोरी झाली,तिचाही तो पहिलाच आणि शेवटचा प्रसंग.

पुढे मग प्रेमाच्या खात्रीच्या परीक्षा ओआर उडू लागल्या,न सांगता ,न बोलता,न निरोप देता,न फोन करता टेलिपॅथीच्या माध्यमातून संदेश वहन होऊ लागले,नजर नजर होऊ लागली.

 तिचे शिक्षण Bsc पूर्ण करून ती वडिलांच्याच कारखान्यात नोकरी वजा अनुभव घेऊ लागली आणि आमची गाडी गचक्यावर गचके खात अडकून पडली. पण शब्द म्हणजे शब्द डिग्री मिळाल्या शिवाय पाय उचलायचा नाही.ती मस्त मजेत नोकरी करीत ,पैसे कमवित मित्रमंडलीत रमत जीवन जगत होती आणि मी झुरत झुरत ध्येयासाठी झटत होतो.

एक दिवस भाग्याचा उगवला आणि माझा निकाल लागला. निकाल लागला म्हणजे खरोखरच निकाल लागला.पाच वर्षांच्या कोर्सची दहा वर्षें उरण झाली आणि शारदेने माझी अब्रूच काढली,गुरुबळाची बोंब म्हणजे काय हे अनुभवले.डिझाईन सारख्या विषयात शून्य मार्कांवर बोळवण झाली आणि ओआर ध्येयाची राख रांगोळी झाली.पण नशीब पण कधी कधी फिनिक्स पक्षाची आठवण योग्य वेळी करून देत.मी हरलो नाही एक शिक्षकांनी टिंगल केली म्हणाले "शून्य मार्क्स म्हणजे पुन्हा पहिल्या पाडून सुरुवात.मनास खूप लागले, पण धीर निश्चय दृढ होता.सहज मुखातून प्रत्युत्तर गेले.म्हंटले सर मला आर्किटेक्ट होण्यासाठी इथे पाठवलंय ..!शून्य मार्क्स पडले हा माझा कमी पणा नाही उलट दहा वर्षांत एक मुलाला तुम्ही शिक्षक असून आर्किटेक्ट बनवू शकत नाही याचीच तुम्हाला खंत वाटली पाहिजे.आता मी तुम्हाला आर्किटेक्ट कसा होऊन दाखवितो बघा म्हंटले आणि आव्हान स्वीकारले. विद्यापीठात केस केली आणि लढाई सुरू झाली.शेवटी कुलगुरूंनी सहा महिने कॉलेजसाठी वाढवून दिले आणि एकदाचे पदवी प्रमाणपत्र हाती पडले.लढाई जिद्दीने जिंकल्याचा आनंद झाला.वेगळीच झळाळी प्रमाणपत्राची जाणवली.आजही वडिलांचा पाठीवरून फिरलेल्या हाताचा स्पर्श जाणवतो.

   आता मनाने उचल खाल्ली आणि दुसरी जीवनाची लढाई सुरू झाली. असेच ऑफिस वर काम जरीत बसलो होतो ,मला एक आठवण आठवली आणि अंगावर शहारा आला टिळक रोडवर चहाच्या अमृततुल्य टपरीवर आम्ही पाच शाबजन चहा घ्या साठी उभे होतो.सकाळचे सात वाजले होते आणि तिची शाळेला जाण्याची वेळ ही झाली होती.त्या काळी मित्रांच्यात चेष्टा मस्करी ,पैंज लावणे व एक मेकांच्या लफडयांची काळजी घेणे चालायचे.माझा मित्र म्हणाला आज काय तो सोक्षमोक्ष लावायचा. उगाच वासावर रहायचं नाही.ठरलं,सारेच वाट पहात रस्त्यावर टपरी समोर उभे.हातात चहाची कप बशी.सगळ्यांच्या नजरा तिच्या वाटे कडे,ती त्या वेळी नववीत वगैरे असावी.सायकलवरून मैत्रिणी सोबत ती गप्पा मारत येताना दिसली आणि पोटात भीतीचा गोळा उठला.तिथे धाडस वगैरे काही चालत नाही कळले.

आधीच ठरलं होतं,ती माझ्या कडे थोडे जरी पाहिले तरी सर्वांनी मदत करायची नाहीतर नादच सोडायचा.अगदी आर या पार.आणि काय आश्चर्य ती आली ,तीन पाहिलं,नजरा नजर झाली आणि चक्क तिने जीभ काढली.आणि अशी काही लाजली की बस,साऱ्यांच्या हातातील कपबशा खळकन खाली पडल्या. काय झाले समजलेच नाही आणि लेकांनी घट्ट मिठीच मारली.क्षणभर वाटले स्वयंवरच पार पडले.सगळे आनंदात सामील आणि पुढे खर्चाचे

बजेट फुगणे चालू झाले.

माझ्या अजून ही लक्षात आहे ती तारीख आणि ती वेळ.माझ्या मित्राने रशियन फेस्टिव्हल ची दोन तिकिटे आणली होती. बारा डिसेम्बर एकोणीसशेहे एकोनव्वद (12/12/1989)संध्याकाळी सहाचा कार्यक्रम होता आणि जाता जाता विषय रंगला,म्हंटले बघ मी काहीही बोलत नाही पण ती नक्की कार्यक्रमाला येणार आणि फक्त तीन फोनच्या रिंग देऊन आम्ही बालगंधर्व नाट्य गृहात येऊन बसलो,पुढून बारवा किंव्हा तेरावा नंबरची रांक मिळाली आणि आम्ही बसलो.आणि मित्राला इतकेच म्हंटले मागे बघ बहुतेक ती आली. आणि इच्छा शक्ती इतकी प्रबळ ती खरोखरच मैत्रिणीला घेऊन कार्यक्रमाला आली होती.

कार्यक्रम सम्पला आणि आम्ही बाहेर पडलो,मी पोर्च मधल्या पिलर जवळ थोडी पाहणी केली,नजरा नजर झाली आणि नजरेत नजर घालून पाहता माझया दोन्ही भुवया वर झाल्या.थोक्यात खुणावले,धाडस बिडस काही असले प्रकार आमच्या वाटेल आलेच नाहीत.

तिसऱ्या दिवशी पाच रुपयाच्या पोष्टाच्या पाकिटातून

गुलाबी कागद आला ,उडघडून पाहतो तर काय .?

एकच गुलाबाची पाकळी आणि तिचे बॉल पेनने

लिहिलेले तिचे नाव.

पहाताच डायरेक्ट मी चंद्रावर.आहो आत्ता कोठे यां बिन पाठवतात पण पूर्वी तस नव्हत, स्वतःचच

जण व्हायचं.मी पूढे दीड दोन वर्षे गॅसवर मासळी सारखा तडफडत,पण अंदाज घेत बांधत जीवन सारले.आणि व्हायचे तेच झाले आणि माझ्या जीवनात तीन अक्षरांची जाऊन चार अक्षरांच्या मुलीने पत्नी म्हणून १५ मे १९९५साली प्रवेश केला.पाहिलेल्या पहिली क्षणा पासून ते आज या क्षणा पर्यन्त ट्युनिंग कसे जमले,जमत गेले,जमते देव जाणे.तिच्या आणि माझ्या प्रेमाच्या गोष्टी बऱ्याच आहेत पण त्या दोन काठावरच्या ,प्रेमाच्या नदीने जोडलेल्या अतूट अविरत वहात राहणाऱ्या.ती ही खुश मी ही खुश,कर्तव्य पालन करीत जीवन जगतोय.ना खंत,ना नाराजी,ना मान ,ना अपमान,ना आशा,ना अपेक्षा,ना स्पर्धा,ना ईर्षा, ना द्वेष,ना असूया अशा निर्मोही निर्मळ भावनेच प्रेम अंतरात घेऊन त्यागाच्या दोरीवरची कसरत लीलया करीत जीवनात रमतोय.बरे वाटते आपले आपलेच आहे ही भावनाच म्हणजे प्रेम हे कळते,समजते,उमजते पटते तेंव्हा आभाळ ठेंगणे वाटते,असते इतके मात्र खरे...!

काही भावना,वर्णनाच्या पलीकडच्या असतात,शब्दात बांधता येत नाहीत किंव्हा ब्रम्हांडात मावत ही नाहीत कदाचित तेच प्रेम असावे आणि तेच उभयता अनुभवतोय याहून दुसरे काय जीवनात सौख्य असेल,असणार आहे असे आम्हाला वाटत नाही हेच खरे ?


चिठ्ठी ..पहिलं प्रेम..!


गुलाबी थंडीत हूर हूर

वेगळीच जाणवत होती

कम्प शहारा अंगभर

नवीनच जाणवत होता


जाणायच होत मला

काहीतरी तिच्या मनातलं

धाडस करायचं होतं

पहिलं माझ्या जीवनातलं


चिठ्ठी चा घाट घातला

बोलके दोन शब्द लिहिले

आणि मागोवा घेत घेत

तिच्या क्लास चे ठिकाण गाठले


आज बीएसए मला

वेगळीच वाटत होती

जणू ती तिखट मिरचीच

खायला उठली होती


कानोसा घेतला असा

वाटले जणू सारे विश्वच

पाळत ठेऊन बसले असावे

आणि सारे पितळ उघडे पडावे


शंका कुशंका घर करीत होत्या

हूर हूर भीती दाटत होती

शेवटी ठिकाण निश्चित केलं

आणि पहिली चिट्ठी स्थानापन्न झाली


धूम ठोकून कोपरा गाठला

कानोसा घेण्या दबा धरला

म्हंटल प्रेम असेल तर ती

चिठ्ठी तिला पटकन मिळेल


ती आली ,तीन जाणलं असावं

तीन पटकन चिठ्ठी घेतली

मी जे पाहिलं ते परत परत

कधीच दिसणार नव्हतं म्हणून साठवलं


आजही अंगावर शहारा येतो

ते दृश्य किती लोभस किती बोलकं

साऱ्या विश्वाच सौख्य त्यात सामावलेलं

आणि मला पूर्णतया आपल्स करणारं


पहिली नजर,पहिली चिठ्ठी

पहिली चकमक सार सारं

फक्त माझ्या साठीच होत

हे ही काही त्या काळी कमी नव्हतं


स्वर्ग दोन बोट,चारो उंगलिया घी में

छप्पर फाड के देता है

मैं तो मर गया 

सार सार अनुभवलं.!


Rate this content
Log in