Rahul Maghade

Drama Others

3.3  

Rahul Maghade

Drama Others

"ती"चा संघर्ष

"ती"चा संघर्ष

6 mins
797


घरच्यांचा विरोधात पळून जाऊन लग्न केलं तिने. तिच्या घरच्यांचा पहिल्यापासून लग्नाला विरोध होता. एकाच ऑफिसमध्ये काम करत असताना झालेली ओळख अन ओळखीचं रुपांतर प्रेमात केव्हा झालं हे तिला स्वतःला सुद्धा कळल नाही. हळू हळू प्रेमाची सुरू झालेली चाहूल घरी कळाली, मग काय सुरू झालं, तिच्यावर लक्ष ठेवणं, सारखा सारखा मोबाईल चेक करणं.वैताग आला या सगळ्याचा तिला, तो खरच चांगला आहे, हे समजावून समजावून ती वैतागली पण कोणालाच पटलं नाही. उलट तिला स्थळं बघायला सुरुवात केली. शेवटी त्यांचा नाईलाज झाला आणि पळून जायचं ठरवलं.


मुलाकडच्यांना काहीच अडचण नव्हती. त्यांच मुंबईत घर होत, लग्न झाल्याचं तिच्या घरी कळालं आणि सगळा कालवा झाला. भांवडांनी तर बोलणं सोडून दिलं. कित्येक दिवस आईवडीलही बोलत नव्हते,सगळ्या गावात त्यांची छी थू झाली. नातेवाइकांनी येऊन आईलाच दोष दिला. घरात ती सर्वांची लाडकी, हे असलं काही करेल यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. तिच्या पप्पांनीतर किती दिवस जेवणचं सोडलेलं. सगळ्यांनी मनवून मनवून त्यांना धीर दिला.


तिला ह्या सगळ्या परिस्थितीच गांभीर्य कळत होतं. पण तिला त्याला गमवायचं नव्हतं. ती प्रेम करायची त्याच्यावर अगदी मनापासून. घरच्यांना तो नाही आवडणार हे कदाचित तिला माहीत होतं आणि हेच कारण होत की घरच्यांनी कधीच त्यांचं लग्न लावून नसतं दिलं. लग्नानंतरच तीच आयुष्य सुरू झालं सकाळी लवकर उठायचे, सगळ्यांसाठी चहा करणं, मग जेवणाची तयारी. कपडे धूणं, लोकांच येणं जाणं घरात त्यामुळे सतत भांडी घासायला पडायची. घरात सासू सासरे, दीर, नणंद आणि ते दोघं. लग्न झाल्यापासून सासूबाईंनी कामातून पूर्ण हात काढून घेतला आणि सगळी जबाबदारी तिच्यावर येऊन पडली...


आज वर्ष होत आलं त्यांच्या लग्नाला. पोटात लेकरू आहे. आंधळ्या डोळ्याने पाहिलेली सगळी स्वप्नं खोटी ठरलीयेत. आपली गावी जमीन आहे,मुंबई सारख्या सिटी मध्ये फ्लॅट घेतलेले आहे, लवकरच गाडी घेऊ अशी दाखवेली सगळी स्वप्नं एक एक करून खोटी ठरली. मुंबईतल राहतं घर आणि गावच शेत सोडलं तर काहीच नाही. नवरा छोट्याशा कंपनीत कामाला जातो. जेमतेम आठ - दहा हजार पडतात महिन्याचे हातात. कमवणारं तोंड एक आणि खाणारी बरीच. नटण्या थटण्याची तिची सगळी हौस मरून गेलीये.


कधीकधी वाटायचं तिला की, हे सगळं सोडून आईवडिलांकडे निघून जावं. पण आईवडिलांकडं कुठल्या तोंडाने जाऊ. एकदा तिला तिची आई आली होती भेटायला. जिद्दीने संसार कर म्हणाली. भाऊ तर अजूनही बोलत नाही. कुणासमोर मन हलकं कराव,हे तिला कळत नव्हत.तिला ह्या सर्व गोष्टी अश्या व्यक्तीला सांगायच्या होत्या, जो तिला समजून घेईल. बहिणीसारखी ( छोटा हत्ती) एक जवळची मैत्रीण होती, पन तिला सांगायची हिम्मत तिच्यात नव्हती.{ हिम्मत पेक्षा आपण हे ही बोलू शकतो की तिला ह्या गोष्टीची भीती वाटत होती की,जो काही तिच्या आयुष्याचा खेळखंडोबा होतोय तो जर तिने तिला सांगितला तर तिला त्रास होईल अन हे तिची ती मैत्रीण नाही सहन करू शकणार.} 


खरंतर एक मानलेला भाऊ (कझामा) होता, पण त्याच्याशी बोलयच कसं, कुठून सुरुवात करायची,काय काय सांगायचं, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर स्वतः तिच्याजवळही नव्हती. तिच्या घरात जरा काही घरात वाद झाले की नवरा चिडचिड करायचा, ओरडायचा, उगाच लग्न केलं म्हनायचा, तू आल्यापासून पणवती लागली.हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी जरी आलं तरी त्याला आता काही फरक पडत नव्हत. आता प्रेम कुठं गेलं काही पता नाही. 

आता तिला कळत होतं लग्न करून फसली आहे ती. आयुष्याची वाट लागली. चूक झाली. पश्चाताप होतो, पण काय करणार. आता माघारी वाट नाही. एकदा पाउल उचललं आता तिला हे निभवावं लागणार. जे नशिबी आलंय ते भोगावं लागणार. सगळं तोडून जावं तर कुठं जाणार. आता आलेला दिवस फक्त ढकलायचाय तिला.. तिच्या पोटातल्या लेकरासाठी.


काही काळानंतर....

कधी नव्हे तिच्या आयुष्यात सुखाचा पाऊस कोसळला. आज ती एका मुलाची आई झाली, क्षणांत सर्व भूतकाळ आठवला, कशी ती बाबांची लाडकी मुलगी,नवऱ्याची बायको झाली आणि आता एका मुलाची आई झाली, यात सर्वांकडून भेटलेल प्रेम, आशीर्वाद, सुख - दुःख यातना सगळं काही भोगून आयुष्याच्या खूप पुढे आली. 


सगळे बोलतात, मूल झाल्यावर सर्व काही सुरळीत होत. पण काही नात्याला ते अपवाद असत, असच काही हिच्यासोबत घडत जात होतं. आधीच स्वप्नाचा चकनाचुर, त्यात मुलाच्या निम्मिताने का होईना, कुठे थोडासा आंनद झाला, पण त्या आनंदावर विरंजन म्हणून तिच शरीर तिला साथ देत नव्हतं. थोडक्यात काय तर आजारी पडली होती.


एका मोठ्या आजाराशी ती रोज लढत होती, काळ पण एवढा निर्दयी की तिच्या एक छोट्या चूकीची शिक्षा म्हणून तिला स्वतःच्याच मुलापासून कित्येक दिवस दूर रहाव लागत होत.ह्याच परिस्थितित दोघांची भांडण झाल्यामुळे ति तिच्या माहेरी राहत होती. खरतर चूक कोणाची आहे काहीच कळत नव्हतं, निव्वळ गैरसमजावर नात धकलल जात होत, नात हळु हळू कोलमडून गेलं होतं, तुटलेल्या नात्याला जोडण्यासाठी कोणीही पुढाकार घ्यायला तयार नव्हत.


मानलेला भाऊ कजामा, माहीत नाही कसा तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला आणि दुसऱ्याच दिवशी तिच्या घरी पोहचला, सोबतीला त्याचा मित्र होताच. कित्येक वर्षांनी आज तो तिला भेटणार होता, दरवाज्या उघडून जेव्हा ती समोर आली तेव्हा दोघांचे ही डोळे पाणावलेले होते पण जर आपणच रडलो तर कुठेतरी ती कमजोर पडेल हा विचार करूनच त्याने स्वतःला सावरलं अन एक स्मित हास्य देऊन तिची विचारपूस करू लागला. मग काय, ती तिच्या आयुष्याचा प्रवास सांगू लागली.


हे सगळं त्यांने ऐकून घेतल्यानंतर त्याने तिचा निरोप घेतला, जाताना त्याने तिला सांगितलं की मी लवकरच तुझ्या नवऱ्याला भेटून तुमचे प्रॉब्लेम सॉर्ट करेन, अन ते तसच झालं, भेट झाली, बोलणं ही झालं, तिच्या नवऱ्याने सगळ मान्य केलं, पण त्याला तिचा नाही, तर तिच्या घरच्यांचा प्रॉब्लेम होता.त्याच एवढंच म्हणणं होतं की मी तिला घरी घेऊन येईल, पण मी त्यांच्या दारात जाणार नाही, तिने स्वतः यावं, तीच तिच्या घरात स्वागतच आहे.अन इथे हीची अवस्था अशी होती की हीचा साधा आवाज ऐकू येणार नाही एवढी अशक्त झालेली ती, ह्या अवस्थेत तिचे घरचे तरी तिला काय बाहेर सोडणार. 


नवऱ्याच्या अहंकारी स्वभावामुळे अन घरच्यांच्या हट्टीपणाने तिने बनवलेलं कमी काळापुरत का होईना पण एक नात पूर्णपणे तुटलं होतं. काही दिवसानी तिच्या मोठ्या बहिनीचा फोन आला त्या मुलाला (कजामा), की तुला आणि छोटा हत्ती (तिची जी सगळ्यात जवळची मैत्रीण होती) तुम्हा दोघांना तिला शेवटच भेटायच आहे, तो मुलगा तर निघाला तिला भेटायला पण तिच्या मैत्रीणिला काही कारणास्ताव नाही जमलं.


हॉस्पिटलचा तो दिवस खरंच खूप धक्कादायक होता, बेडवर ती होती, पूर्णपणे अशक्त, चेहऱ्यावर कसलिच भीती नाही, डोळ्यात पाणी तर दाटुन आलय तिच्याही अन त्याच्याही पण त्याला तिला हिम्मत द्यायची होती, (की चल लवकर बरी हो आपल्याला फिरायला जायचय, तुझे खुप सारे गिफ्ट तुला द्यायचेत, तू फक्त बरी हो, तुला हव ते देईल) पण तिचा तो केविलवाणा चेहरा पाहून तो ह्या वेळेस स्वतःला खरच थांबवू नाही शकला, आणि डोळ्यात आलेले पानी खीश्यात असलेल्या रुमालाने पुसू लागला.


शेवटची इच्छा म्हणूनच काय तिच्या तोंडून, "कजामा मला वेफर्स पाहिजेत," हे शब्द निघाले, उद्या पुन्हा येईल भेटायला, छोटा हत्ती सोबत अस बोलून त्याने तिचा अन तिच्या मोठ्या बहिनीचा निरोप घेतला, जाताना तिने त्याला एक वस्तू दिली अन् सांगितल की, ही वस्तु छोटा हत्तीला दे. तो घरी पोहचतोच की तेवढ्यात तिच्या मोठ्या बहिनीचा फोन आला की आता ति "आपल्याला सोडून गेलीय." ही बातमी ऐकून मन सुन्न झालं, विश्वास बसत नव्हता की आपण हिला थोड्यावेळा पूर्वीच भेटून आलोय अन आज ती आपल्यालात नाहीये.....क्षणभरासाठी डोळ्यासमोरून शाळेपासून ते आतापर्यंतचा प्रवास येऊन उभा राहिला..


आज मी तिला खूप मिस करतोय, तिची कमतरता जाणवतेय, सतत वाटत ती असायला हवी होती, खरंच आयुष्याच्या या धावपळीच्या जीवनात एक अशी मैत्रीण नक्कीच असायला पाहिजे, जी वेळप्रसंगी तुमची मोठी बहीण म्हणून सतत सोबतीला उभी राहील....


स्मरणार्थ,

चला पुन्हा शोधू, त्या निरागस बालपणाला, जिथे स्वप्न सजले होते, जेथे बालपण घालवले होते, झाडांच्या त्या सावलीत, कुठे कच्चे घर बनवले होते ! 😢


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama