Sangita Tathod

Drama Classics

3  

Sangita Tathod

Drama Classics

तिच्या डोळ्यातील स्वप्न

तिच्या डोळ्यातील स्वप्न

3 mins
206


//तिच्या डोळ्यातील स्वप्न //


" गोदाबाई , पटापट हात चालवा ना ?,आता

थोड्या वेळात पाहूणे येतील. स्नेहाच्या त्या ट्रॉफी

रोज रोज कशाला पुसता ?चला करा लवकर."

रश्मी म्हणजे ,तिच्या मालकिणीच्या आवाजाने

गोदा भानावर आली. हातातील काम आटोपुन

लगेच स्वयंपाकाला लागली. रश्मीच्या सूचनेप्रमाणे

ती सर्व मनापासुन करत होती.त्याला कारणही

तसेच होते .स्नेहाला बघायला आज पाहुणे येणार

होते आणि स्नेहात गोदाचा भारी जीव.सर्वगुणसंपन्न

असणाऱ्या स्नेहाला योग्य जोडीदार मिळावा आणि

तिच पुढील आयुष्य आनंददायी असावं. असं गोदाला

मनोमन वाटे.

        लवकरच स्नेहाचा साखरपुडा मोठ्या

धुमधडाक्यात पार पडला. तिचा साखरपुडा

झाल्यापासून गोदा तिची फारच काळजी घेत होती.

तिचा प्रत्येक शब्द झेलत होती. या सर्व गोष्टी

रश्मीच्या नजरेतुन सुटल्या नाहीत. 

   एक दिवस गोदा स्नेहाच्या ट्रॉफी पुसत होती.

तोंडाने गाणे गुणगुणत होती

  

   माझी सोनपरी

   जाई सासराला

    सोन्याची पाऊले

   लागतील अंगणाला


बाजुला रश्मी उभी होती याचे तिला भान नव्हते.

  "गोदाबाई आपण असं करू ,या सर्व स्नेहाचा

ट्रॉफीज आपण तिला लग्नात प्रेझेंट देऊ .तुझं

एक काम कमी होईल. रोज रोज कशाला स्वच्छ

करतेस ग त्या ?"रश्मी म्हणाली.

 लगेच गोदा म्हणाली ,"असं कसं ,बाईसाहेब ?

ही बक्षिस चांगली दिसायला हवीत .आपल्या

स्नेहाने यासाठी किती मेहनत घेतली ."

   रश्मी नोटीस करायची की , स्नेहाच्या ट्रॉफी

बघतांना गोदाच्या डोळ्यात वेगळीच चमक

दिसते. कधी प्रेम ,कधी कौतुक, तर कधी या

ट्रॉफी कडे बघुन तिच्या डोळयांत काळजी सुध्दा

दिसते?ही काळजी कशाची असेल ?असा विचार

रश्मीच्या डोक्यात आला .पण लग्नाच्या कामात

तिने तो सोडून दिला.साखरपुडा झाला असल्याने

स्नेहा आणि तिचा नियोजीत वर "मनिष' यांच्या

अधुन मधुन भेटी होत होत्या.

    अशीच एकदा स्नेहा मनिषला भेटून अली.

आल्या आल्या मम्मी ,पप्पाला म्हणाली,"पप्पा मला

मनिषशी लग्न करायचे नाही."

 हे ऐकुन रेश्माच्या पाया खालची जमीन सरकु

लागली.",हे ,काय बोलतेस तू स्नेहा?"रेश्मा

 अशा वेळी मुलीला न रागवत सजवून घेणे

योग्य असते. कदाचित आपल्या नजरेतून

सुटलेली एखादी गोष्ट स्नेहाला समजली असेल.

स्नेहाचे पप्पा म्हणाले, "स्नेहा ,असे काय घडले

बेटा, तुला असा लग्न मोडण्याचा निर्णय घ्यावासा

वाटतो?"

  तिघांचा आवाज ऐकुन गोदा तिथे आली. एका

कोपऱ्यात उभी राहिली.

 " पप्पा ,मनिष ,मला कोणत्याच गोष्टीत समजुन

घेत नाही. त्याला बायको म्हणजे फक्त त्याच्या

रिमोट वर चालणार खेळण हवं आहे. त्याला

माझ्या गेम बद्दल ,मी नॅशनल लेव्हल वर 

मिळवलेल्या यशाबद्दल काहीच घेणं देणं नाही.

मी मनिषला सांगितले की ,मी फक्त नॅशनल

लेव्हल पर्यत खेळली. मला एक अकादमी

सुरू करून आपल्या जिह्यातील प्लेयर ला

इंटरनॅशनल लेव्हल वर पोहचवायचे आहे ,तर

तो मला चक्क हसला पप्पा ."

स्नेहा पोटतिडकीने बोलत होती.

 रेश्माला तिचे मतं पटत नव्हती .दोघींचा बराच

वाद झाला.",तू एवढी मोठी झालीस का स्नेहा

?मनिषला चार दिवसात ओळखशील .?

लग्नानंतर होईल सर्व ठीक." रेश्मा

 आता पर्यंत शांतपणे ऐकत असणारी गोदा

म्हणाली ,"माफ करा बाईसाहेब ,लहान तोंडी मोठा

घास घेते .पण स्नेहा बोलते त्यात सत्य असेल.

स्वतःचे लग्न मोडण्यात कसला आनंद? तिलाही

त्रास होत असेलच ना ?"

 बोलता बोलता गोदा खाली बसली .आज

तिच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसत होती .तिच्या डोळ्यात पाहिल्यावर असे जाणवले की, तिच

स्नेहाची सख्खी आई आहे. ती पुढे म्हणाली ,

"बाईसाहेब, दहा बारा वर्षाआधी जी चुक मी

 केली होती. - -

तिचं चुक तुम्ही आज ,करत आहात .माझी मुलगी

सखू अशीच होती.आपल्या स्नेहा सारखी. तिनेही

शाळेत असताना अशीच बक्षीस मिळवली होती.

 बारावी झाल्यावर चांगले स्थळ आले म्हणुन लग्न

ठरवलं. ती नाही म्हणत असतांनाही तिचे ऐकले

नाही .तिला नर्स व्हायचे होते. मुलगा दारू पितो

हे माहीत आल्यावरही ,चांगले स्थळ आहे .आज ना

उद्या सुटेल दारू असे समजून ,दिले ना मी माझ्या

सखुला त्या  - -आगीत लोटून."

 सखूच्या बाबतीत झालेल्या चुकीचे अपराधी

भाव ,गोदाच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते.

"झाले ना ,बाईसाहेब मग ,होत्याचे नव्हते ! रोजच्या

दारूला अन भांडणाला कंटाळून ,सखूने स्वतःला

जाळून घेतले.."

 स्नेहाने गोदाला पाणी आणुन दिले . डोळे पुसत

 गोदा म्हणाली,"सखूचे अस झाल्यावर .मला पण

जीवाचे काहीतरी करावेसे वाटे. मामाच्या ओळखीने

तुमच्या घरी आली .माझं नशीब चांगलं म्हणुन

तुमच्या सारखी माणस मिळाले . स्नेहा मध्ये मी 

सखुला पाहू लागली. तिला मिळालेली बक्षिसे ,

जणू माझ्या सखूची आहेत असे वाटे. अशा

गुणी स्नेहाला तिला हवा तोच मुलगा निवडा .

तिच्या आयुष्याशी खेळू नका .मी स्नेहाची

कोणी नाही असे समजू नका .मी स्नेहाची ,सखू

होऊ देणार नाही."

  गोदाच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसत होती.

रेश्माच्या चुकीबद्दल आग दिसत होती. स्नेहाबद्दल

अपार प्रेम दिसत होते. गोदाच्या डोळ्यातील या

सर्व भावमुद्रा बघुन, रेश्माचे डोळे खाडकन

उघडले.स्नेहाने बघितलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण

करण्याचा तिने निर्धार केला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama