Sangieta Devkar

Drama Romance

3  

Sangieta Devkar

Drama Romance

तेरे संग यारा

तेरे संग यारा

6 mins
185


अरे तो टॉवेल ओला आहे ना मग उचल ना बेड वर काय टाकतोस? वैशु बोलली मितेशला. हे बघ वैशु रोज टाकतेस ना तू मग? मित्या आजपासून दोघेही घरात राहणार आहोत आणि मलासुद्धा वर्क फ्रॉम होम आहे समजलं. काय यार आता मी घरातली कामं पण करू का? नाही मला नाही जमणार. हो का आणि मला खूप सवय आहे नाही का? उचल टॉवेल नाहीतर पडू दे तसाच बेडवर उद्या सकाळपर्यंत. वैशु रागात बोलत किचनकडे गेली. किती काम आहे वैताग आहे नुसता कसं सगळं एकटी करणार मी? स्वयंपाक करा आणि वरून भांडी पण घासा हा मित्या काही कामाचा नाही वैशु स्वत:शीच बोलत काम उरकत राहिली.


आजपासून लॉकडाऊन सुरू झाले होते. घरचे काम आणि ऑफिसचे काम पण तिची तारांबळ होणार होती. कारण नवरा काही कामाचा नव्हता. त्याला सगळं आयत हवे असायचे. स्वयंपाक आवरून वैशु ऑफिसचे काम पाहू लागली. वैशु थोडी कॉफ़ी बनव ना. मितेश बेडरूममध्ये येत म्हणाला. तू घे बनवून मला काम आहे. अरे मला नाही जमत ना तुझ्या सारखी प्लिज दे ना वैशु. हम्मम म्हणत वैशु उठली आणि कॉफी बनवू लागली. थँक यु डियर म्हणत मितेशने वैशुला गालावर किस केले. मस्का नको मारू आता काहीही देणार नाही मी.अगं मी फक्त थँक्स बोललो. म्हणत मितेश ही त्याच्या कामाला लागला. दुपारी ब्रेक घेऊन दोघांनी जेवण केले मग वैशुने लगेच भांडी घासून टाकली आणि पुन्हा काम करू लागली. संध्याकाळी चहा आणि रात्रीचे जेवण बनवून ती थोडा वेळ बसली. तिलाही कामाची सवय नव्हती आता सगळंच काम तिच्या अंगावर पडले होते. हे आता रोजच रुटीन झालं होतं. एका आठवड्यातच दोघेजण कंटाळून गेले. घरी बसायची सवय नाही. आता बाहेर जाणे पूर्ण बंद झाले होते. असे तीन महिने काढायचे होते. मितेश सामान संपले आहे भाजी पण नाही तू जाऊन घेऊन ये वैशु बोलली. तुला माहीत आहे वैशु मला असलं काही जमत नाही मी उलट सुलट काहीही घेऊन येईन मग परत माझ्या नावाने ओरडशील त्यापेक्षा तूच जा ना. अरे तू शिकणार कधी मी एकटी काय काय करू सांग. वैतागतच वैशु बाहेर पडली सगळं सामान भाजी वगैरे घेऊन आली. परत घरचा पसारा आणि काम होतेच आज शनिवार सो ऑफिसच्या कामाला सुट्टी होती. मग तिने बेडशीटस,पडदे,कुशन्स सगळं मशीन ला धुवायला टाकून दिले.केर काढून लादीही पुसून घेतली. संध्याकाळपर्यंत दमून गेली वैशु. परत रात्रीचा स्वयंपाक तिला कंटाळा आला मित्या खायला बनव तू मला खूप कंटाळा आला आहे आज काम पण जास्त केले मी. वैशु जास्त काही नको बनवू लाइटली कर काही पण मला नको सांगू. मितेश मी सांगते तसं कर ना फक्त. नो वे मला नाही जमणार. मग चरफडत तिनेच पुलाव आणि रायता बनवला. रात्री जेवण करून झोपले. सकाळी अलार्म वाजला पण वैशु काही उठली नाही. वैशु उठ अलार्म झाला म्हणत मितेशने तिला हलवले . मित्या माझं डोकं खूप दुखत आहे मी झोपते थोडा वेळ. वैशु मी दाबून देऊ का डोकं त्याने विचारले. हु दे वैशु बोलली. मितेशने तिच्या कपाळावर हात ठेवला त्याला कपाळ गरम लागले. वैशु अग तुला ताप आला आहे. थांब आपण टेम्परेचर चेक करू. मितेश ने थर्मामिटर आणले आणि चेक केले वैशुला खरच ताप होता. वैशु आहे तुला ताप घरात आहे का काही मेडिसिन? हो ड्रावर मध्ये पॅरासेटमॉल आहे बघ ती दे वैशु म्हणाली. मितेशने तिला गोळी दिली आणि डोक ही चेपून दिले. मितेशने मग फ्रीजमधून दूध बाहेर काढले आणि गरम करायला ठेवले. तोपर्यंत वैशु किचनमध्ये आली होती. तू का उठलीस वैशु मी करतो मला जमेल तसे जा तू झोप. काय येत रे तुला चहा तरी येतो का? तू सांग मी बनवतो मितेश म्हणाला. मग वैशुने सांगितले तसे त्याने चहा बनवला. मस्त झाला आहे चहा म्हणत वैशुने त्याच्या गालावर किस केले. नाष्टा काय बनवायचा मॅडम आता त्याने विचारले. तुला जे येते ते बनव मित्या. मला फक्त मॅग्गी बनवता येते चालेल का? हो चालेल बनव वैशु बोलली.


आज रविवार होता त्यामुळे ऑफिस वर्क नव्हते दुपारी वैशु सांगेल तसे मितेशने जीरा राईस आणि दाल फ्राय बनवले. मितेशला हे सगळं करताना छान वाटत होते वैशुसाठी करतो आहोत ही फ़ीलिंग आनंद देणारी होती. त्यांचे लव मॅरेज होते एकमेकांवर प्रेमही ख़ूप करत होते पण कामाच्या दगदगीत स्ट्रेसमध्ये दोघांचा क़्वालिटी टाईम कुठेतरी हरवला होता.दुसऱ्या दिवशी ही वैशुचा ताप कमी झाला नव्हता. मित्या हा कोरोनाचा ताप तर नसेल ना रे वैशु म्हणाली. काहीही काय बोलतेस वैशु अजिबात नाही आज आपण डॉ.कडे जावू नको काळजी करू मितेश तिला आपल्या कुशीत घेत म्हणाला. मग त्यानेच पोहे बनवले. आज ऑफिस वर्कला सुट्टी दिली. वैशु म्हणाली आज एक दिवस बघू ताप उतरतो का नाहीतर मग जावू डॉ. कड़े. ओके मितेश म्हणाला. मित्या ख़ूप बोअर होतंय मी नुसती बसून आहे काहीतरी काम करते वैशु म्हणाली. नोप तुझा ताप नाही कमी झाला गप्प बैस. एक मिनिट मी आलोच म्हणत मितेश रूम मध्ये गेला आणि त्याची गिटार घेवून आला. वाह !!मित्या तू चक्क आज गिटार हातात घेतलीस? हो गं जसा जॉबला लागलो तसा कामातच गुंतत गेलो आणि ही गिटार बाजूला पडली. मग आज गिटार सोबत गाणं पण होऊन जाऊ दे वैशु बोलली. नाही आता गाणं नाही जमणार नुसतं गिटार वाजवतो तुझ्यासाठी. मितु अरे कॉलेजमध्ये असताना किती छान गायचा तू विसरलास? तुझ्या गाण्यामुळेच तर मी प्रेमात पडले ना तुझ्या? मला आज गाणंच ऐकायचे आहे हा माझा हट्ट समज हवं तर. ये वैशु नको गं मला नाही गाता येणार किती दिवस झाले प्रॅक्टिस नाही. काही गरज नाही प्रॅक्टीस वगैरेची तू मुळात एक कलाकार आहेस आणि कलाकार आपली कला कधी ही विसरत नाही. जसे जमेल तसे म्हण. ओके सांग कोणते गाणं म्हणू? मितु ते म्हण ना माझं ऑल टाइम फेव्हरेट सॉंग. ओके मॅडम तो पेश हैं आपकी की खिदमत मे ये प्यारा सा गाना असे म्हणत मितेश ने गिटारवर धून वाजवली "का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे,उमलती कशा धुंद भावना,अल्लद वाटे कसे.बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे". मितेश भान हरपून गाऊ लागला. पूर्ण गाणं त्याने म्हटले वैशु पण मंत्र मुग्ध झाली होती. वा मित्या किती मस्त गायलेस. आवडले ना तुला? हो एकदम भारी. मग मितेश तिच्या जवळ बसला तिचा हात हातात घेत म्हणाला,किती छोट्या छोट्या गोष्टीत आनंद लपलेला असतो ना वैशु. पण आपण आपल्या कामाच्या व्यापात जगणंच विसरून जातो गं. आता हेच बघ मला अजिबात कामाची सवय नव्हती पण तुझ्यासाठी तोडकं मोडकं का होईना स्वयंपाक मी केला. घरची काम केली यात काहीच कमीपणा नाही उलट आपल्या जोडीदाराला थोडा आनंद मिळत असेल असं करून तर का करू नये आपण? आनंद प्रत्येक गोष्टीत लपलेला आहे फक्त आपल्याला तो शोधता आला पाहिजे. हो मितु मी कामावरून चीड चीड करत होते पण तुझ्यासाठी काम करण्यात आनंदच वाटत होता मला आणि तुला काही येत नाही त्यामुळे गप बसायची मी. शेवटी आपल्या दोघाना आहेच कोण एकमेकांशिवाय? हो वैशु कामाच्या रगाड्यात आपला क़्वालिटी टाईम आपण मिस केला पन आता नाही आता आपण एकमेकांसाठी वेळ काढ़ायचा मिळून काम करायची यात पण आनंदच आहे. आपला आनंद आपल्यातच आहे त्याला बाहेर जावून शोधायची गरज नाही. ह्म्म्म मित्या पण तू रोज आता गिटार वाजवनार आणि गाण सुद्धा! हो वैशु नक्कीच. चला आता तु रेस्ट घे थोड़ी ताप कमी व्हायला हवा . मीतू मला तुझ्या कुशीत झोपायचे आहे म्हणत वैशु ने आपले हात पसरले तसा मितेश ही हसत तिच्या जवळ आला आणि तिला आपल्या मिठीत घेतले आणि कपाळावर किस केले. वैशुने आनंदाने डोळे बंद केले. मितेश तिला थोपटत राहिला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama