स्वप्ननगरीची सफर
स्वप्ननगरीची सफर


*स्वप्ननगरीची सफर*
कोस्टा सेरेना*
आज पर्यंत सगळ्या प्रकारच्या वाहनांमधून किंवा वाहनावरून प्रवास केला .
त्यामध्ये अगदी सायकल, स्कूटर, मोटरसायकल ,रिक्षा, बस, ट्रक, आराम गाडी, लक्झरी बस, ट्रेन ,लोकल हेलिकॉप्टर, विमान हे सगळे झाले.
अगदी मिलिटरीच्या गाडीतून देखील फिरणे झाले .कारण एक गाववाला मिलिटरी मध्ये होता. त्या कॅम्पवर गेलो असता त्याच्या ट्रकमधून देखील फिरायला मिळाले होते . शिवाय आपले युद्ध नाव का विक्रांत चालू असताना तिच्यावरती देखील जायला मिळाले. एक नातेवाईक त्याच्यावरती होता त्याच्यामुळे त्याने आम्हाला अगदी इंजिन घरापर्यंत फिरवून आणले एरवी इंजिन घरापर्यंत जाण्याची कोणाला मुभा नसते.
पण क्रुझ मधून फिरायचे राहिले होते. क्रुझ वर जाण्याची खूपच इच्छा होती .
कारण आज पर्यंत सिनेमातच क्रुझ वरील लाईफ बघितले होते. क्रूज म्हटले की
प्यार की कश्ती मे है
लहरो की मस्ती मे है
हे कहो ना प्यार है मधलं ऋतिक रोशन आणि अमिषा पटेल त्यांचं गाण अगदी डोक्यात फिट्ट बसलेल.
आणि तो योग 2023 च्या डिसेंबर मध्ये आला.
मुंबई ते गोवा जाण्यासाठी बऱ्याच ठिकाणी "कर्डिलीया" आणि "कोस्टासेरेना" या दोन बोटींचे नाव आले.
त्यातील कार्डेलिया बरीच जुनी आहे अनेक वर्ष आपल्याकडे ती कंपनी चालू आहे. आणि कोस्टासेरेना मात्र नवीनच होती. यावर्षी पहिल्यांदाच येत होती.
मूळ इटालियन कंपनीचे असणारे हे जहाज ,भारतामध्ये मुंबई ते कोचिन आणि मुंबई ते गोवा असे पर्यटन करते .
त्यानुसार आम्ही 29 30 आणि 31 डिसेंबर 2023 हा कालावधी मुंबई ते गोवा ट्रिप साठी निवडला
सगळाच व्यवहार ऑनलाइन असल्यामुळे भीती पण वाटत होती .
आपले पैसे घेऊन पळून गेला तर काय करायचे?
जो कोण होता तो एकदा घरी पणयेऊन गेला होता.
तत्पूर्वी कार्डेलिया जास्त प्रसिद्ध होती कोस्टासेरेणाचे रेट त्यामानाने कमी होते. पण उंची मात्र जास्त होती.
कर्डिलीयाचे 12 मजले आहेत आणि कोस्टाचसेरणाचे 14 मजले आहेत म्हणजे 14 डेक आहेत.
या जहाजा बद्दल थोडीशी माहिती इटालीचे जहाज आहे,
वजन एक लाख 14 हजार 500 टन
लांबी 290 मीटर
रुंदी 35.5 मीटर
आणि गती 20 ते 23 नॉटिकल मैल
यामध्ये चार हजारापर्यंत पाहुणे बसू शकतात.
557 बाल्कनी केबिन आठ स्विमिंग पूल हॉट टब
दहा रेस्टॉरंट आठ आठ बार होते
यावर्षी पहिल्यांदाच हे जहाज मुंबईमध्ये आले.
3 नोव्हेंबर 2023 तेव्हाचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री "सर्वानंद सोनोवाल"यांनी मुंबईमध्ये पहिल्यांदा त्याला हिरवा झेंडा दाखवला त्याच वर्षी आम्ही पण ही सेवा घेतली .
शिवाय या जहाजावरती जिम, कॅसिनो, जकुजी, बास्केटबॉल, ब्युटी पार्लर ,फिल्म थेटर नाट्यगृह असं बरंच काही आहे.
आमच्यासाठी सर्व काही नवीन होते. इथून टॅक्सीने आम्ही डाॅक यार्ड ला गेलो. तिथे आमच्या समोर भरपूर लोकांची लाईन लागलेलीच होती.
त्या एवढ्या मोठ्या जहाजावर जाण्याची पहिलीच वेळ. आज सामान घेऊन जाताना एखाद्या डोंगराच्या पोटात शिरत आहोत की काय असे वाटले.
अख्या जहाजावर रंगीबेरंगी गालिचे, प्रत्येक फ्लोअरला दहा-बारा तरी लिफ्ट असतील .
कोणत्या फ्लोअरला कोणत्या थांबतात ते पण ठरलेले आणि तिकीट दाखवल्यावर त्यांनी आम्हाला की कार्ड दिले ते आम्ही पहिल्यांदाच वापरत होतो, त्यामुळे बराच वेळ दरवाजा कसा उघडायचा तेच समजेना. बर विचारावं तर आजूबाजूला कोणी नाही रिसेप्शन काउंटर चारमाळे उतरून खाली गेल्यावर, तिथून माणूस घेऊन यायचा तेव्हा तो आपल्याला गायडन्स करणार! मग शेवटी अनेक खटाटोपी केल्यानंतर ते कार्ड दाराला व्यवस्थितपणे लागले आणि दरवाजा उघडला. युरेका युरेका अखेर दरवाजा उघडला तर🗝️🗝️🗝️
स्वतःचे फूड आणि वाईन आणायची अजिबात परवानगी नाही. तेवढे मात्र चेकिंग करतात.
सामान तिथे ठेवल्याबरोबर आम्हाला जेवण्यासाठी बोलावले.
एवढे मोठे रेस्टरा आणि सगळे लावलेले बुफे ,
इंडियन फूड, चायनीज फूड, इटालियन फुड्स, आणि सर्व्ह करण्यासाठी सगळे गोरे .
काही लोक आपलेही होते म्हणा नाहीतर भाषेचाही प्रॉब्लेम झाला असता.
आम्ही फुल व्हेजिटेरियन आणि एका प्लेटमध्ये मऊ सॉफ्ट असे पांढरे पीस घेतले, मला वाटले ते तळलेले पनीर पीस आहेत . वर पाहिले तर बोर्डवर चिकन पीस होते शाॅक बसल्यासारखे पुन्हा नेऊन ठेवून दिले. नशीब खाल्ले नाहीत शांतम् पापम्😩 मग बारकाईने बघून व्हेजिटेरियन लाईनला उभे राहिलो.
किती खाऊ किती नको, फ्रुट्स, कोल्ड्रिंक, साउथ इंडियन नाश्ता देखील ठेवला होता.
शेवटी आपल्याला जवळचं काय तर भारतीय फुड .
तिथलं काय थोडं थोडं घेतलं पण ते काय गोड लागलं नाही. शेवटी आपला
"पहिल्या वरां
अन् तूच बरा"
आम्ही नुसते वेड्यासारखे डेक वरून खाली, खालून डेकवर, सगळे फ्लोअर बघत भटकत होतो .
एक एका लाईन मध्ये शंभर शंभर रूम असतील.
या टोकापासून त्या टोकापर्यंत जाल तरी सुद्धा मोठा व्यायाम होत होता .
ते सारखे अनाउन्सिंग करून डेक वर बोलावत होते आणि वेगवेगळ्या सूचना देखील देत होते.
खाऊन आणि फिरून फक्त जीवाची मुंबई गोवा काय म्हणेल ते करत होतो .
दिवसभर त्यांनी आम्हाला मुंबईच्या डॉकयार्ड मध्ये ठेवलं होतं ,रात्री प्रवास सुरू केला ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो एकदाचा तो क्षण आला, आणि बोटीने नांगर उचलला.
मग सगळ्यांना उत्सुकता कशी चालते बोट, अनेक जण डेक वरून अनेक जण आपल्या बाल्कन्यां मधून हा अद्भुत प्रवास पहात होते .
आम्ही काय खाणारेही नाही आणि पिणारेही नाही.
त्यामुळे आम्हाला काही त्याची गरज पडली नाही, पण तिकडे करन्सी चेंज करून घेऊन अनेक लोक बार समोर उभे राहिले. करन्सी चेंजिंग ला मात्र मोठी लाईन🏃🏾 काही विकत घ्यायचे तरी डॉलरमध्ये आणि हे भरतात कुठे मुंबई आणि गोव्यात .
घेतात आपल्या करन्सी मधून आणि विकतात त्यांच्या करन्सी मध्ये ,त्यामुळे आम्ही एक रुपया देखील जास्तीचा कुठे खर्च केला नाही. कारण शेवटी जुनी खोड आहोत .
आपल्याकडचा चाळीस रुपयाचा कोल्ड्रिंक टीन तीनशे रुपये. म्हणूनच ते बाहेरून कोल्ड्रिंक, दारू, खाणे पिणे आणून देत नव्हते.
अर्थात बोटीवर खाण्याची चंगळ होती पिण्याची मात्र नव्हती, ती ज्याची त्याने करायची होती.
बाकी सारे रंगीन माहोल होते .
रात्री अनेक झगमगते कलरफुल लाईट, आणि अनेक ठिकाणी कार्यक्रम चालू ,काही ठिकाणी ऑपेरा, काही ठिकाणी डिस्को, काही ठिकाणी फ्री मध्ये गाणे डीजे डान्स.
सिनेमा किंवा नाटक पाहण्यासाठी पैसे देऊन जायचे होते, शिवाय इंग्लिश नाही तरी इटालियन सिनेमे पैसे देऊन कोण पाहणार ?
आम्ही काय गेलो नाही, पण मोकळे झाल्यावर थेटर मात्र फिरून आलो अगदी भव्य दिव्य होते.
जे काही फ्री होते तेवढ्याची मजा लुटली. दोघांचे मिळून 90 हजार दोन दिवस तीन रात्रीसाठी दिले होते, मग काय लुटो अँड नाचो💃🏿
मात्र खालून वर वरून खाली जाता जाता आणि अख्खी बोट पाहता पाहताच दमछाक झाली.
29 चा रात्रभर प्रवास झाला तीस तारखेला गोव्यामध्ये बोट नांगरून ठेवली होती, ज्याला कुणाला गोवा फिरायचा आहे त्याला बाहेर जायला देत होते.
आम्ही आधी गोवा भरपूर फिरलेला होता, आणि आता डिसेंबर थर्टी फर्स्ट माहोल मध्ये जाणे काही शहाणपणाचे नव्हते. ज्यांना जायचे ते गेले आम्ही बोटीवरच थांबलो.
31 च्या रात्री थर्टी फर्स्ट ची धमाल बोटीवरच भरपूर आली, मग काय आपले 90 हजार वसूल करायला नको🤹♀️
आणि आपली हिंदी मराठी गाणी देखील वाजवली होती. त्यामुळे नाचायला मजा आली.💃🏿💃🏿 बाकी वरती जे म्युझिक ऑपेरा होते तिथे मात्र इंग्लिश सॉंग, इटालियन सॉंग आणि काय काय चालू होते आम्ही फक्त एक स़ैर सपाटा मारून आलो.
एक-दोन ठिकाणी कॅसिनो होता सिनेमात पाहिला होता ,त्यानंतर नेपाळमध्ये पाहिला होता आता हा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा पाहिला आणि अस आश्चर्य वाटत होतं की कित्येक बायका पण एखाद्या सराईत सारख्या ते कॉइन परचेस करून अट्टल पणे खेळत होत्या.
कपड्यांचे तर काय विचारूच नका, हमाम मध्ये सब नंगे या न्यायाने जमतील तेवढे आखूड कपडे घालून बायका फिरत होत्या. सोबतचे नवरे सुटा बुटात आणि बायका मात्र जेमतेम झाकायचं तेवढं झाकून बाकी सगळे उघडे टाकून फिरत होत्या.
नवरा बायको पोरं सगळी फॅमिली नंगी पुंगी 🫣🫣
कधी कधी मी साक्षी भावाने मजा घेत होते. खरंतर साक्षी भावाने मजाही घ्यायची नसते फक्त साक्षीदार सारखं राहायचं असतं .
आमची आपली उडी जास्तीत जास्त जीन्स पॅन्ट आणि टी-शर्ट, एक हौसेने स्कर्ट सोबत नेला होता तो घातला पण असे काही वेगळे वाटले नाही कारण तो परकर सारखा मोठा फुल स्कर्ट होता.
दोन्ही तिन्ही दिवस सकाळी सकाळी डेक वर असणाऱ्या स्विमिंग पूल मध्ये उतरलो.
तिथे हॉट पाण्याचा देखील स्विमिंग पूल होता त्याला काहीतरी जखुजी हॉट टब. वगैरे म्हणतात. मस्त गरम गरम पाण्याचे फ्लो वाहत असतात. तिथे मात्र दोन्ही तिन्ही दिवस मजा घेतली.
एकावेळी पंधरा-वीस लोक त्या गरम पाण्याच्या स्विमिंग पूल मध्ये उतरू शकत होते.
बाकी मोठ्यांना पोहण्यासाठी होते, लहान मुलांसाठी होते.
दोन दिवस काय फक्त खावो पिवो आणि मजा करो
कुठे जायचं नाही कुठे यायचं नाही, रूम ते डेक डेक ते रेस्टॉरंट, रेस्टॉरंट ते रूम अशा परिघात फिरत होतो मात्र इतका रंगीबेरंगी लाईट जाजम की काय पाहू आणि काय नको असं होऊन गेलं .
नवीन वर्षाच्या स्वागताला प्यालेले ,न प्यालेले सगळे एकत्र मिळून धुमशान नाचलो. 💃🏿💃🏿💃🏿 चला चला 90000 वसूल करायचे ना मग नाचा.
रात्री दोन तीन पर्यंत धमाल चालू होती. शेवटी एकदाचे रूमवर जाऊन पडलो.
त्यादिवशी 31 च्या सूर्याला टाटा करायला सगळेजण डेकवर होते. आणि सकाळचा सूर्योदय पाहायला देखील समुद्रातून मजाच आली.
चारी बाजूला अथांग समुद्र आणि मध्यात आपली चाललेली बोट काही क्षण जीव दडपून देखील जातो.
आणि आपलं मन आहे ना "मन चिंती ते वैरी न चिंती"मला तर राहून राहून टायटॅनिक मूवी ची आठवण येत होती. तरीही दोन्ही दिवस बऱ्यापैकी झोप लागली नाही तर नवीन ठिकाणी झोप येत नाही लाटांच्या हेलकाव्यावरती थोडेफार कधीतरी कळायचं .
पण तेवढं प्रचंड जहाज होतं की आपण समुद्रात आहोत असं काही वाटत नव्हतं. अशी एक ती वेगळीच दुनिया वाटत होती आणि ज्यामध्ये तीन दिवस फक्त पंख लावून उडायचं होतं.
तरी पण अधून मधून कशिश पार्क मध्ये दरवर्षी भरणाऱ्या "जल्लोष" ची आठवण येत होती. काय करणार सरड्याची धाव कुंपणापर्यंत .
असो 1 एप्रिल ला पुन्हा मुंबईत आलो आता मात्र बोटी मधून पाय निघत नव्हता. आमच्यापेक्षा देखील काही लोक अगदी 75 80 या घरातले सुद्धा जोडपी आली होती, आणि ते देखील मस्त एन्जॉय घेत होते. काही ओळखी झाल्या नंबरची देवाणघेवाण झाली. पण प्रवासातल्या ओळखी प्रवासातच राहतात नंतर कोणी कोणाला फोन करत नाही हे अनुभवाअंती माहित आहे. बिहार मधील पिलभीत येथील हा तरुण जोडप्यांचा ग्रुप होता. त्यांनी पण बरीच जग दुनिया फिरून घेतलेली होती.
इकडे आल्यानंतर पिलभित मध्ये पूर आला तेव्हा मात्र त्यांना फोन केला होता.
अनेक लोक ग्रुपने आले होते.
त्यात गुजराती जास्त. सगळीकडे एन्जॉय करायला गुजराती जास्त असतात.
पण संघर्ष करायला देखील तेच पुढे असतात. त्यांच्या अंगी भूतदया आणि सर्व प्राणीमात्रांना खाणे-पिणे घालण्याची वृत्ती असल्यामुळे अनेक संकटातून गुजरात पुन्हा पुन्हा उभे राहते.
हा अनुभव आम्ही गुजरातला घेतलेला पण आहे .
कारण जेव्हा नोटाबंदी झाली तेव्हा आम्ही गुजरात ट्रिप वरती होतो आणि आम्हाला अनेक ठिकाणी मदतीचा हात दिला की तुमच्याकडे सुटे पैसे नाही ना, तुमचं रिझर्वेशन चा दिवस आहे तो पर्यंत आमच्या या आश्रमामध्ये राहा. कारण आम्ही प्रवासात सेफ म्हणून 500 आणि 1000 च्या नोटाच घेऊन गेलो होतो. अर्थात आम्ही राहिलो नाही ती गोष्ट वेगळी पण किमान ऑफर तरी केली होती.
असो एकंदरीत ते तीन दिवस अविस्मरणीय झाले आतापर्यंत अनेक प्रवास केले आहेत याचे नवीन नवीन ठिकाणी पाहिले आणि इथे मात्र अख्खी बोट दिवसभर किती पाहू आणि किती नको असे करत पाहिले परत आपले डाॅक्यार्डला उतरलो, बोटीला टाटा केला पाहूया पुन्हा केव्हा एवढे पैसे घालण्याची हिंमत होईल तर जाऊया.
बाकी एकदा जरूर क्रूज वरती जे कधी गेले नसतील त्यांनी जाऊन यावे
माझा जो डीपी आहे तो बोटीवरीलच आहे.