STORYMIRROR

AnjalI Butley

Abstract Tragedy Inspirational

2  

AnjalI Butley

Abstract Tragedy Inspirational

सुराज्य घरातील

सुराज्य घरातील

3 mins
156

लहान होतो, खूप आनंदी असायचो, आजी, आजोबा, आई, बाबा, दादा, ताई, घरा शेजारीच काका, काकु, चुलत भिवंडे, इतर नातेवाईक! जवळच राहायचे सर्व! मित्र, शाळा सर्व जवळ, हाकेच्याच अंतरावर!

शाळेत जातांना हसत खेळत शाळेत जायचे, दंगा मस्ती करत शिक्षण व्हायचे! शिक्षक ही ओळखीचेच! शाळेत काही चुकीचे वागले की आपण घरी पोहचायच्या आधी, बातमी घरी पोहचलेली, बाबांचा तो ऐरझार्या घालत ओसरीतील चालणे, हातात एक काठी, लांबुनच दिसायच, त्यात थोड लांब घराजवळच दादा, ताईची फिल्डिंग मला मार बसु नये म्हणून, मागच्या दाराने आत घरात घेणे, आई ने , एका खोलीत शांत अभ्यास करत बसायला लावणे, बाबा वाट पाहत कंटाळून आत येता, काय झाले कार्ट्याला अजून आला नाही शाळेतून, जरा काळजीचा सूर त्यांचा, मग आई शांतपणे म्हणणार, अहो मघाच आला तो, खाऊन अभ्यासालापण बसला! काय कधी आला बाळ्या परत घरी शाळेतून? मला कसा नाही दिसला! आई गालात हसून म्हणणार तुमच्या रागामुळे डोळे लाल झाले असेल म्हणून नाही दिसला, जा आत त्या अभ्यासाच्या खोलीत, काय अभ्यास करतो ते तरी बघा, मी बापडी अडाणी, मला त्याचे अभ्यासातील काही समजत नाही!

प्रगतीपुस्तकावर पण तुमचीच सही असतेन!

मला शिकता नाही आले निदान आपले मुले शिकुन सवरून मोठे व्हावे हीच प्रार्थना करते मी रोज देवा जवळ!

ताईपण छान शिकत आहे, घरचपण काम करते, गुणी आहे तीन्ही मुले आपली, मला बाई भारीच त्यांचा अभिमान!

आमच्या घरी वरचे वर असा संवाद चालायचा, सगळ्या नायातील, शेजारी असलेल्यांना अभिमान असायचा आमच्या घरच्या सर्वांचा,

अडीअडचणीला आई-बाबा, आजी-आजोबां सगळ्यांना आपल्या घासातील घास काढून मदत करणार, तीच सवय आम्हालाही लागली होती..

सुराज्य होत घरात!

ताईचे लग्न ठरले, चांगला शिकलेला, श्रीमंत नवरा होता तीचा, लग्न होई पर्यंत सगळ छान होत!

तुम्हाला नातेवाईकांमध्ये, समाजात मान आहे, आम्ही तुमच्यापेक्षा श्रीमंत आहोतपण एवढा एकोपा नाही आमच्या नातेवाईकांन मध्ये आमचा! झाले त्यांच्या घरच्यांना आमच्या एकमेकांच्या घट्ट नात्या बद्दल असुया तयार झाली होती मनात!

सारख़ आई-बाबांना घालुन पाडून बोलायचे, लग्नात हे नाही केले, ते नाही केले, तुमच्या नातेवाईकांनी आमचा अपमानच केला वैगरे..

आजी-आजोबा मोठे होते त्यांनापण उगाच काहीतरी बोलणार! जावई म्हणून आले घरात पण पार घरातील एक छान शांतता होती ती दुषीत करायचा प्रयत्न असायचा, घराच्या बाहेर उभे राहून मोठमोठ्याने बोलणे, ताईला उगाच ओरडणे! आमची ताई लाडात घरात वाढलेली, रोजच्या तीच्या सासरच्यांच्या भांडकुदळी मुळे ती पार खंगुन गेली. आई-बाबांना आपला त्रास संमजु नये म्हणून ती काही बोलायची नाही, नंतर ताई घरी सांगेल म्हणून ताईला आमच्याकडे पाठवायचेच नाही, स्वतः एकटेच यायचे, दादा व मला घालुन पाडून बोलायचे, शिकून कोणते सायब होणार, आमच्याकडे कामाला माणस हवीच आहे शेतात, या आमच्याकडे! 

उलटून बोलायचे नाही ही आमच्या घरची शिकवण, म्हणून उलट बोलताही येत नव्हत!

कधी कधी दारू पिऊन यायचे, मग जास्तच गोंधळ घालायचे! एकदा आईच्या अंगावरचा धाऊन गेले! 

मी संतापलो, व त्यांना त्यांच्या घरी सोडून आलो, परत आमच्या घरी यायचे नाही हे ठणकावून सांगत!

सोबत घरी ताईला बळजबरीनेच सोबत आणले, ती नाही म्हणत होती, सुधरतील ते म्हणत होती, तीच्या खोल गेलेल्या डोळ्यातील केवीलवाणे अश्रू सगळ सांगून गेली ती कोणत्या घरात पडली, सुराज्य घरातील सांभाळण तीला तीथे किती अडचणीचे होते!

एका अनामिक भितीने ती ग्रासली होती! 

आमच्या घरचेपण पटकण तीला असे खंगलेले पाहुन हतबल होत होते!

पण सगळ्यांना सावरते केले पहिले, फारकत घेऊन ताईला स्वालंबी केले, 

आमच्या घरातील गढूळ झालेले राज्य परत सुराज्या बनवल एकमेकांना आधार देत!

पहिले शेजारी नातेवाईक, ताईची फारकत झाली म्हणून नाराज झाले होते आमच्यावर, मग हळूहळू त्यांची नाराजी कमी झाली, सगळे ताईला मान देऊ लागली, जाचातून सुटली नाहीतर आयुष्यभर यातना मुकाट्याने सहन करत संपली असती, ताईला लहान मुलांना शिकवायला आवडत तर आंगणवाडी शिक्षका म्हणून ती काम करते, घराची ओसरी आता अंगण वाडीचे वर्ग़ भरवण्यास वापरतो!

घरातील सुराज्य सांभाळल्यामुळे ताई मला मी लहान असून माझे खूप कौतुक करते!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract