STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Drama Tragedy

3  

Author Sangieta Devkar

Drama Tragedy

सुन्या सुन्या मैफलीत माझ्या

सुन्या सुन्या मैफलीत माझ्या

6 mins
253

कुसुम पाणी दे जरा म्हणत शामराव घरात आले. कुसुम ने पाण्याचा ग्लास त्यांना दिला. काय बोलले हो गुरुजी? वसु ला कड़क मंगळ आहे तेव्हा तिला लग्ना साठी मंगळ असनाराच मुलगा बघा असे म्हणाले गुरुजी. अवघडच आहे सगळ. वसु मुळे शालिनी आणि नयन चे लग्न ही लांबनार. वसुला यंदा पंचविस वर्ष पूर्ण होतील. तिच्या मागे शालिनी आहे मग माधव आहे नयन लहान आहे तीच शिक्षण सुरु आहे उद्या तिचे पण लग्नाचे वय होईल. कुसुम म्हणाली. आपण काय करू शकतो आता बघू जेव्हा होईल तेव्हा शामराव म्हणाले. वसुधा कुसुम आणि शामरावाची पहिली मुलगी त्यानंतर शालिनी चौवीस वर्षाची मग माधव बाविस वर्षाचा आणि विस वर्षाची नयन. वसु च्या पत्रिकेत कड़क मंगळ होता त्यामुळे तिचे लग्न जमत नव्हते. दोन वर्ष झाली तिला स्थळ पाहत होते.पण कुठेच जमत नव्हते. वसु ने डी ए ड केले होते. तिचा या पत्रिके वर विश्वास नव्हता पण घरच्या पुढे ती बोलू शकत नव्हती. वसु गावातल्या जिल्हा परिषदे च्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. वसु चे लग्न जमत नाही इतके वय झाले तरी हा गावात चर्चेचा विषय होता.ओळखिचे लोक नातेवाईक सगळे वसु ला तिच्या लग्ना वरुन सतत विचारत असत. तिला आता या सगळ्या गोष्टीची चीड़ येत असे पण ती काही करू शकत नव्हती.


वसु शाळेतुन घरी आली होती. शामराव पण आले होते कामा वरुन ते पोस्ट ऑफिसात क्लार्क होते. कुसुम एक स्थळ आले आहे . हो का काय करतो मुलगा आणि त्याला पण मंगळ आहे का? कुसुम वसु ला नाही आले स्थळ तर शालिनी ला आले आहे. मि म्हणतो आता वसु चे जमत नाही तर शालिनी चे करून टाकू लग्न. कीती दिवस तिला थाम्बवून ठेवायचे नन्तर पाठोपाठ मधु आहे नयन आहे. हा तुमचे बरोबर आहे. मग येत्या रविवारी बोलवतो पाहुणयांना. यांचे बोलने वसुला ऐकू आले होते. ती स्वयपाक घरात होती. वसु ये वसु बाहेर ये कुसुम ने आवाज दिला. काय आई म्हणत ती बाहेर आली. अग आपल्या शालू ला स्थळ आले आहे तर तिचे जमत असेल तर लग्न उरकुन टाकू तुला काय वाटते? आई माझ्यामुळे शालू ला वाट पाहायला नको माझी काही हरकत नाही. असे बोलून वसु खोलीत गेली. डोळ्यात पाणी आले होते तिच्या. ताई काय झाल ग रडतेस का? नयन ने विचारले. काही नाही ग कचरा गेला डोळ्यात. ताई काय ते खरे सांग शालू बोलली. खरच काही नाही शालू म्हणत वसु आपले कपड़े आवरु लागली. जेवताना रात्री शामरावा नी शालू ला पाहायला पाहुने येणार असल्याचे सांगितले. बाबा ताई चे लग्न झाल्या शिवाय मि लग्न करणार नाही. वेड लागले का तुला वसु चे लग्न जमे पर्यंत तुझे वय वाढ़त जाईल मग तुला कोणी पसंद नाही करणार बसशील मग आयुष्यभर बिना लग्नाची. कुसुम बोलली. शालू आई म्हणते ते बरोबर आहे माझ काही लग्नाचे खरे नाही तू कर लवकर. मला काही प्रॉब्लेम नाही.


मग ठरल्याप्रमाणे रविवारी पाहुने आले. शालू त्यांना आवडली. लवकरचा मुहूर्त बघून तिचे लग्न लावून दिले. वसु चे मात्र वय वाढत चालले होते. मंगळ चा मुलगा काही तिला मिळत नव्हता. नोकरी मध्ये ती सव्हताचे मन रमवत होती. घरातून तिच्या लग्ना साठी कोणी म्हणावे तितके प्रयत्न ही करत नव्हते. तिचा पगार येत होता. लग्न झाले तर ही मिळक़त बंद होणार होती. चालते तो पर्यंत असेच दिवस ढकलायचे अस चालले होते सगळे. आज शाळेत नरेशने पुन्हा वसुला विचारले वसु काय विचार केला आहेस? कीती दिवस मि तुझी वाट बघू सांग. नरेश मि बोलले आहे तुला मला मंगळ आहे रे उगाच माझ्या मुळे तुझा जीव का धोक्यात घालतोस? नरेश तिच्याच शाळेत शिक्षक होता त्याचे वसु वर ख़ुप प्रेम होते. गेली वर्ष भर तो तिच्या मागे लग्ना साठी लागला होता पन वसु ऐक़त नव्हती. वसु अग कुठल्या जमानयात राहतेस हे मंगळ वैगेरे काही नसते ग. मी मानत नाही असले काही. नाही नरेश मला नाही पटत हे.मग असच आयुष्य काढनार का तू वसु? तुझ्या घरचे तुझे लग्न आता नाही करणार त्यांना तुझा पगार मिळतो. तसे काही नाही नरेश . असच आहे वसु मला सांग तुझ्या लग्ना साठी कीती प्रयत्न करत आहेत तुझ्या घरचे? या वर वसु काही बोलली नाही. वसु आपण लग्न करूया. नाही नरेश मला विचार करावा लागेल.


आता शालिनीच्या लग्नला दोन वर्ष झाले होते. माधव चे ही लग्नाचे जमत होते. थोड्याच दिवसात त्याचे ही लग्न झाले. वसु साठी मात्र कोणीही प्रयत्न करत नव्हते. एक दिवस वसु शाळेत गेली तेव्हा नरेश ने तिला त्याच्या लग्नाची पत्रिका दिली. वसु तू तर लग्नाला तयार नाही आहेस . मी कीती दिवस तुझी वाट पाहत बसणार. घरी माझी आई एकटी आहे तिला आता काम होत नाही. माझे खरच प्रेम आहे तुझ्यावर पण तू काही मला साथ द्यायला तयार नाहीस. नरेश बरोबर आहे तुझे . माझ्या साठी तू थांबुन राहावेस हे मला ही मान्य नाही. तू लग्न कर माझे काही ही म्हणणे नाही. मला माफ कर नरेश. वसु इतके बोलून तिच्या वर्गा कड़े गेली. घरी आल्यावर वसु ख़ुप रडली. नरेश वर तिचे ही प्रेम होते पण या पत्रिकेतील मंगळा मुळे तिचा ही नाइलाज होता.माझ्या नाशिबात प्रेम लग्न या गोष्टी देवाने लिहिल्याच नाहीत का ? असा विचार ती करत राहिली. आता तिची वयाची तिशी जवळ आली होती. वसु संध्याकाळी शाळेतुन घरी आली. आल्या आल्या कुसुम ने तिला सांगितले की तिला एक स्थळ आले आहे. मुलाला सौम्य मंगळ आहे तर बघून घेऊ. ठरल्या प्रमाणे पाहूणे वसु ला बघायला आले. मुलगा ही वया ने मोठा होता . प्रसाद नाव होते त्याचे. एका खाजगी कंपनीत कामाला होता. त्याला वसुधा आवडली मग लवकरचा मुहूर्त बघून त्यांचे लग्न लावून दिले. वसु आनंदात होती शेवटी उशिरा का होईना तिचे लग्न झाले.


प्रसाद ही चांगला मुलगा होता. त्याचे एकत्र कुटुंब होते. मोठा भाऊ त्याची बायको एक लहान बहिन आई वडील असा परिवार होता. वसु दुसऱ्या गावात आली होती त्यामुळे तिला नोकरी सोडावी लागली होती. इकडे सासर च्या गावी ती नोकरी साठी प्रयत्न करत होती.सगळ काही छान चालले होते. एक दिवस कामा वरून येताना प्रसाद चा अपघात झाला आणि त्यातच त्याचे निधन झाले. वसू ला तर हा धक्का सहन नाही झाला. खूप आतुन तूटत गेली ती. तिच्या पत्रिकेत असणाऱ्या मंगळ ग्रहा मुळे प्रसाद चा हकनाक बळी गेला असच तिला वाटू लागले. तिच्या सासरी सुद्धा तिलाच बोल लावले गेले . वसू ला अपशकुनी ठरवून त्या घरातून हाकलून लावले. वसू माहेरी आली. आता तिला नोकरी ही नवहती. त्यामुळे माहेरी पण ती डोईजड झाली होती. वहिनी तिला पटवून घेत नवहती. सारखा तिचा अपमान करत असे. नयन ही लग्न होऊन सासरी गेली होती. नरेश ला वसू बद्दल समजले तसे त्याने तिला भेटायला बोलवले. वसू तुझ्या बाबतीत जे घडले ते खरच वाईट घडले. मला नाही बघवत तुझे असे हाल. नरेश माझ्या साठी नोकरी बघ एखादया शाळेत. माझी मी आता स्वतंत्र राहीन. आई कडे राहणं मला जमणार नाही. हा वसू नको काळजी करुस मी तुझ्या नोकरी साठी नक्की प्रयत्न करेन. एक महिन्या नंतर वसू ला शेजारच्या गावात शाळेत नोकरी मिळाली. तिने घरी सांगितले तसे वहिनी बोलली हो का छान झाले मग वन्स असे पण यांच्या एकटयाच्या पगारात इतक्या जनानच भागत नव्हते. आता तुमचा पगार येईल. वसू ला वहिनी च्या अप्पल पोटी बोलण्याचा भयंकर राग आला. वहिनी असे पण मी तुम्हाला या घरात नकोच होते तेव्हा मी हे घर सोडून जाणार आहे. मला नोकरी दुसऱ्या गावात मिळाली आहे.


वहिनी मग गप्प झाली. आई बाबांचा निरोप घेऊन वसू नोकरीच्या ठिकाणी आली. दोन रुम चे घर भाड्याने घेऊन ती एकटी राहू लागली. नरेश चे आभार मानले. तो म्हणाला मी तुझा मित्र आहे वसू केव्हाही मदत लागेल तेव्हा सांग मी येईन. नरेश तू इतकी मदत केलीस हेच खूप झाले. माझ्या मुळे लोक तुला नाव ठेवतील हे मला नको आहे. मी एकटीच ठीक आहे रे आता कसलेच बंधन आणि पाश ही नकोत. वसू असे का बोलतेस? हो नरेश आता आपल्यात कोणतंच नात नको. राहू दे मला एकटी. नरेश मग निघून गेला. दूरवर कुठुन तरी गाण्याचे बोल वसू च्या कानावर आले "सुन्या सुन्या मैफलित माझ्या तुझेच मी गीत गात आहे. अजूनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे. सुन्या सुन्या मैफलित माझ्या".....


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama