सुखाचा स्पर्श
सुखाचा स्पर्श
मुलाने वयाचे २५ वर्षे ओलांडले की मुलगी बघायला सुरुवात होते तसा अमित पण पाहायला देखणा आणि सुंदर होता. त्याचबरोबर चांगली नोकरी असल्यामुळे लग्नाला मुलगी मिळणार नाही असेही नव्हते, पण पहिलीच मुलगी पाहून सर्वसंमतीने लग्न झाले होते. अमित तसा लग्नापासून खूप खुश होता, कारण मुलगी पण पाहायला सुंदर होतीच दोघांची जोडी अशी शोभून दिसत होती जसे राधा-कृष्ण.
अमित आणि अस्मिताला लग्नाच्या रितसर कार्यक्रमामुळे सोबत वेळ घालवायला मिळाला नाही, पण अमित अस्मितासोबत एकांतात भेटायला आतुर होता. कारण अस्मिता ही त्याच्या जीवनात आलेली पहिली स्त्री होती जिच्यावर तो जीवापाड, भरभरून प्रेम करणार होता. पाहुण्यांची वर्दळ कमी झाली आणि शेवटी ती रात्र आली, जेव्हा अमित-अस्मिता एकत्र वेळ घालवणार होते. म्हणजे लग्नानंतरची पहिली रात्र म्हणजे नवदाम्पत्यासाठी खास असते असं म्हणतात, अमितसाठी पण ही रात्र खास होती. अमितच्या मित्रांनी त्याची तयारी आणि रुममध्ये सजावट केली होती ते पाहून अमितला एक सरप्राइज मिळालं.
अमितला शरीरसुख काय असतं याचा अनुभव नव्हता, तो अनुभव शरीरसुखाचा आनंद तो हक्कानी घेणार होता. अमित रुममध्ये गेला, अस्मिता बेडरूममध्ये बसलेली होती पण, पण ती नुसतीच बसलेली नव्हती तर तिच्या हुंदक्यांचा आवाज येत होता, अमितला पाहून तिने स्वतःला सावरलं. अमित तिच्या जवळ जाऊन बसला आणि आणि अस्मितेच्या खांद्यावर हात ठेऊन खांद्यावरचा हात जवळ करत तिला मिठीत घेण्याचे स्वप्न पूर्ण केलं. अस्मिताचे हुंदके आणखीन सुरू झाले पण तिच्या रडण्याचे कारण अमितला कळले नाही, अस्मिताने स्वतःला दूर करत अमितकडे काही वेळ मागितला व बाहेर जाऊन स्वतःला समजावत होती, खूप वेळ झाल्याने अमितने अस्मिताला बोलावलं आणि रडण्याचे कारण विचारलं. पण अस्मिता त्याला टाळत होती तरीपण अमितने कुठल्याही प्रकारची जबरदस्ती न करता स्वतःला समजावलं. त्याला जाणवलं की बोलताना केलेला स्पर्श तिला नको होता / नको असावा म्हणून त्याने ठरवलं की आज दूर राहायचं.
अस्मिताला स्पर्श न करताच अमित स्वतःविषयी बरेच काही अस्मिताला सांगत असतो, बोलता बोलता तेवढ्यात एक नजर अस्मिताकडे जाते अस्मिता केव्हाचीच झोपी गेली होती. झोपेतही ती सुंदर दिसत होती तिच्या त्या मोहक शरीरावर आणि तिच्या सुंदरतेवर तो भाळला, ती झोपेतही त्याला मोहून टाकत होती त्यामुळे तिला स्पर्श करण्याची त्याची हिम्मत झाली नाही त्याला ते जमले नाही.
अमितचं मन अस्मिताकडे वळू लागलं होतं, तिच्या मोहात तो पूर्णपणे वितळत होता, जणू काही अस्मिता ज्योत आणि अमित मोम बनून त्या ज्योतिसोबत वितळत होता. या एका रात्रीमध्ये अस्मिताच्या मोहक रूपाने अमितची बेचैनी वाढवली होती. अमित बाहेर जाऊन बाल्कनीमध्ये उभा राहतो तेवढ्यात त्याला ग्लास पडण्याचा आवाज आला, अमित आत गेला अस्मिताने आपली जागा बदलली होती.
रात्री झोपताना अस्मिताने सहाचा गजर लावला होता, त्या आवाजाने अमितला जाग आली. अस्मिता अजूनही झोपली होती, पण अमितच्या थोडी जवळ सरकलेली होती, त्याने हळूच आपला हात तिच्या कमरेवर ठेवला तोच अस्मिताला जाग आली.
तिच्या अनुमानानुसर तिच्यासाठी अमितने केलेला स्पर्श हा तिच्यासाठी एखाद्या परपुरूषाच्या स्पर्शासारखा होता. ती एकदम घाबरली आणि लगेच उठून बाथरूमच्या दिशेने वळली व तयार होऊन स्वयंपाकघरात आली. अस्मिताच्या अशा वागण्यावरून अमितला कळलेलं होत की, आपण केलेला स्पर्श हा तिला नको होता. पण तो याचाच विचार करत होता असं का?
अस्मिता अमितसाठी न्याहारी (नाश्ता) घेऊन गेली तेव्हा अमितने विचारलं की, असं का वागलीस? पण अस्मिता त्याच्या प्रश्नांना उत्तर न देताच तिथून निघून गेली. दिवस कसाबसा निघून गेला आणि अमित कामानिमित्त बाहेर गेला होता त्यामुळे त्याला यायला जरा उशीरच झाला. जवळजवळ ११ वाजले असतील अस्मिता झोपलेली होती. अमितने हात पाय धुऊन स्वतःचं जेवण घेतलं आणि थकव्यामुळे तोसुद्धा झोपी गेला.
दिवस उजाडला आज मात्र अमितच्या आधीच अस्मिता जागी झाली होती व घरकामात व्यस्त असेच चार-पाच दिवस असेच गेले. आज मात्र अमित अस्वस्थ झाला होता कारण, अस्मिता त्याच्याशी बोलायला तयार नव्हती. पण अमितने आज अस्मितासोबत बोलायचं ठरवलं. आपल्या इच्छा अस्मिता समोर मांडायच्या तिच्या असं वागण्याबद्दल कारण, सगळं विचारायचं आणि आपले विचार मांडण्यात तो सफल झाला. पण त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळाले. ते म्हणजे अस्मिताच्या विरहाचे पुरावे. अमित आता पूर्णपणे तुटला तिच्यासमोर काय बोलावे हेही त्याला सुचत नव्हते, तो स्वस्थ झाला.
शेवटी एक प्रश्न केला मग लग्न का केलंस? या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं... तो मला सोडून गेला... अस्मिताचं रडणं सुरू होते अमित स्वतःला सावरत तिला मिठीत घेतो आणि बोलतो, हा तर समाजाचा नियम आहे. कोणालाच त्याचं प्रेम मिळत नाही बघ ना तुला तुझं प्रेम मिळालं नाही आणि मला माझं प्रेम!
अमितच्या बोलण्यावरून अस्मिता जरा विचारात पडली, तुमचं प्रेम!
अमित बोलला, होय माझं प्रेम, तू आहेस माझं प्रेम त्याच्यासाठी तू मला दूर केलेस गं.
एवढं बोलून अमित निघून गेला. अस्मिताला आता स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. अमितबद्दल आपुलकी-जिव्हाळा वाटू लागला.
अमित काही वेळानी परत आला. आता त्याला अस्मिता त्याची पत्नी म्हणून मिळाली होती. जो स्पर्श तिला परपुरूषाचा स्पर्श वाटत होता तोच स्पर्श आज तिला हवाहवासा वाटत होता.
अमित ज्या रात्रीची ज्या स्पर्शाची वाट पाहात तो सुखाचा स्पर्श आज अमितला करायला मिळाला. अमित आणि अस्मिता दोघेही एकमेकांवर भरभरून प्रेम करत होते. सुखाच्या स्पर्शाचा आनंद घेत होते.
अमितला जर पहिल्या रात्री आज केलेला स्पर्श केला असता तर कदाचित तो स्पर्श सुखाचा नसता किंवा आणि ही मनही कधी जुळली नसती.