विखुरलेल प्रेम
विखुरलेल प्रेम


मी तुझी प्रतिक्षाच करणार नाही, कारण तु माझी झालीच नाही.
माझ्या सौभ्याग्याचा टिळा, तुझ्या कपाळावर लागेल यावर माझा विश्वासच बसत नाही.
कारण तुझ्या जीवनातील गर्द कोमल पातळीवर, माझ्या नावाच चिन्हच नाही.
म्हणून मनात जागा देशील अशी, हाक सुद्धा देणार नाही.
माझ्या दु:खाची हलकीशी लाट सुद्धा, तुझ्या सुखी जीवनाला स्पर्ष करणार नाही.
प्रेम काय असत नव्हत माहित मला पण ते आज कळल मला, की काय असत प्रेम ?????
कही महिण्याआधी आमच भांडण झाल आणि आम्ही एकमेकांपासून दूरावलो, तरीपण माझ्या मनात आजही घर करून बसली होती. वारंवार, सतत येणारी तिची 'आठवण' मी तिच्यावर करत असलेल्या प्रेमाचा पुरावा देत होती.
वाटत होत कराव फोन, भेटाव आणि तिच्या कुशीत बसुन केसांना कुरवाळत मनसोक्त बोलाव एकांतात. आणि सांगाव तिला की मी फक्त तुझाच आहे, पण हिम्मतच होत नव्हती.
कदाचित तिलादेखील वाटत असेल बोलाव, तीसुद्धा वाट बघत असेल माझ्या फोनची. अशा अनेक विचारानी डोक भाराऊन जायच, डोळ्यांतुन अश्रुंच्या धारा निघायच्या मी सुद्धा मनसोक्त रडून घ्यायचो , रडन थांबल की तो दिवस आठवण म्हणून लिहुन ठेवायचो.
एकांत असतो तेंव्हा तुझीच आठवण येते,
तुझ्या आठवणीने जीव कासाविस होते.
खूप बोलूनही पुन्हा बोलावसं वाटते,
तुझ्या माझ्या मिलनाची वेळेलाच प्रतिक्षा असते.
तुझा भेटण्याचा नकार ऐकताच जीव कासाविस होते,
माझ मलाच समजत नाही सखे अस का होते ???
काही का असो ना पण प्रेयसीला डोळे भरूण पाहण्याचा एक वेगळाच आनंद असतो, खरच एकमेकांकडे पाहताना तिच्या चेहर्यावर जे हास्य असायच ना खरच खूप गोड होत.
त्यानंतर कितीतरी दिवसानी आम्हीं भेटलो, झाल गेल सगळ जागेवर ठेउन डोक्यत अनेक विचारांची मेजवानी घेऊन तिथून निघालो. त्या दिवसानंतर आमच बोलण तस थांबलच होत. आणि ही आमची शेवटची भेट ठरली कारण आम्हीं वेगवेगळ्या वळनानी जायज ठरल होत.
१६/०४/२०१७ वाढदिवस
आज तिचा वाढदिवस खूप वाट बघत होतो या दिवसाची कारण हा एक दिवस होता तिच्यासोबत बोलायला कारण असणारा. शेवटी वाजले ते रात्रीचे १२ मनात कसलीच भीती न ठेवता तिचा फोन नंबर डायल केला. फोनचा अंगावर काटे उभे करणारा रोमांचक प्रतिसाद मला मिळाला.
!!! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
मी तिला केलेल्या फोनचा मला असा प्रतिसाद मीळाला की त्यानंतर काय बोलाव काहीच उरल नव्हत. आज तिचा वाढदिवस होता म्हणून मी तिला फोन केला मला फोन व्यस्त दाखवत होता.
मी समजुन गेलो की, तिला तिचा जीवनसाथी मीळाला असावा. आनखीन विशेष म्हनजे जरी ती व्यस्त होता तरी पहिल्यांदा केलेला फोन घेऊन शुभेच्छा स्वीकारल्या. ( मी तिचा खूप आभारी आहो ) मी तुला काही वेळानी फोन करतो अस बोलून तिचा फोन बंद झाला !!!!!!!!!!!
आज मी तिच्याप्रेमासामोर हरलो होतो कारण माझा जो तिच्यावरचा अधिकार होता तो कोणीतरी हिरावून घेतला होता. आता मात्र मी पुर्णपणे खचलो.
कितीतरी दिवसानंतर आज मी तिच्यासोबत बोलणार होतो, खूप आनंदात होतो आणि बारा वाजण्याची तर आतुरतेने वाट पाहत होतो एक न एक मिनिटा कडे लक्ष होत, शेवटी १२ वाजले नंबर डायल केला. तिचा फोन व्यास्त पाहुन माझ मन स्थीर झाल सगळ्या आनंदाचा पाराच उतरला.
तरी वाटल ५-१० मिनिटानंतर करणार फोन मनात अशी आशा ठेउन प्रत्येक क्षण प्रत्येक मिनिट फोन हाती घेऊन वाट पाहत होतो. पाहता-पाहता तब्बल एक तास लोटून गेला अजूनही मी वाटच पाहत होतो. नंतर विचार केला नाही पाहणार वाट, माझे डोळे थकले आणि निवांत पडलो बेडवर.
त्याच क्षणी फोन वाजला, कानाला फोन लावताच SORRY हा शब्द बोलून तिने सगळच संपवून टाकल.
ती पुढे बोलली " तु माझ्याशिवाय राहु शकतेस का ??? " या शब्दानी तर माझ्या डोक्यत तांडवच केल होत. ती अशी का मला बोलली काहींचं समजायला वेळ नव्हता, मी तीलाच प्रश्न केला अस का बोललीस ???
या प्रश्ननाच उत्तर ऐकुन आता मात्र मी माझाच उरलो नव्हतो. ते उत्तर होत "आता मी तुझी राहिली नाही " आणि मी वेडा फक्त आणि फक्त तिच्यावरच प्रेम करत होतो.
खूप बोलन झाल आता फोन ठेवायची वेळ आली आणि शेवटचे शब्द कानावर आले " मी माझा जीवनसाथी शोधला तु पण एखादी राणी बघ. मला विसरून जा " आणि धडाधडा रडायला लागली, माझही रडन थांबेना कसाबसा स्वत:ला सावरत फोन बंद केला.
आता मात्र मी पुर्णपणे हरलो. माझ्या प्रेमाचा खेळ इथेच संपला....
## काय मिळवलीस ##
कळयांनाही तुच उगवलीस, फुलांनाही तुच फुलवलीस, झाडांपासुन फळ तुच तोडलीस.
आधी हसवून मग रडवलीस, खर सांग प्रीये एवढ करून, काय मिळवलीस ???
सुख दुःखात होती तुला साथ, तरी तुला नव्हता विश्वास, प्रेमात असतो विश्वास खरा जो नव्हता तुला. तरी तुच चूकला अस का म्हणते मला ???
स्वत: पाहिलीस मलाही दाखवलीस, पण " मला विसरून जा " हा एक शब्द बोलून स्वप्न्नांना चूराळुन, माझी साथ सोडुन तु काय मिळवलीस ???????