अखेरचे प्रेम
अखेरचे प्रेम


पावसाआधी गारवा यावा आणि अंगाला स्पर्शून जावा, थोड्याफार पावसाच्या सरी याव्या आणि मातीचा दुर्मिळ सुगंध सोडून जावा. नेमकं असंच क्षणभराची भेट आणि आयुष्याचे सोबती.
ओळख झाली एका लग्नामध्ये, लग्न होत ते माझ्या ताईचं. ताईसोबत माझं चांगलं जमायचं आणि भाऊजी पण आधीपासूनच ओळखायचे, त्यामुळे नवरीसोबत म्हणजे ताईसोबत मी सुद्धा गेलो. तिथे सगळे नवीन असल्याने मी फार कोणाशी बोललो नाही. पण थोडा स्वभाव चंचल असल्यामुळे एका मुलीशी गाठ पडलीच आणि आमचं बोलणं सुरु झालं.
मी तिथे तीन दिवस राहिलो, तिथे पहिल्या दिवशीच एका मुलीशी गाठ पडली. थोडं बोलणं चालणं झालं आमचं आणि थोडी ओळख पण झाली. आमची चांगली ओळख व्हायला, तिसऱ्या दिवसाची वाट पाहायची गरजच पडली नाही. बोलता बोलता ती स्वतःविषयी बरंच काही बोलून गेली, मी सुद्धा होतं नव्हतं थोडंफार स्वतःविषयी बोललो. विचारांची देवाणघेवाण झाली, इथे आता आमचं बोलणं जरा जास्तच वाढलं होतं. बोलता-बोलता तिने माझा मोबाईल नंबर घेतला, मी पण तिचा नंबर घेतला. मी तिचा नंबर फक्त सेव्ह करून ठेवला होता कारण, तिला मेसेज किंवा कॉल करणं हवं तेवढं सोप नाही वाटलं.
नाव तर तशी एकमेकांची माहितीच झाली होती. त्यामुळे फेसबुकवर तिची फ्रेन्ड रिक्वेस्ट आली, मी ती ॲक्सेप्ट करून आमचं फेसबुकवर बोलणं सुरु झालं. बोलता बोलता ती कळून चुकल्यासारखं काहीतरी बोलून गेली (सगळं माहित असताना) की, तुम्हाला गर्ल-फ्रेन्ड आहे का?
तिच्या बोलण्याचा अर्थ मला थोडक्यात समजला होता. म्हणून मी काही दिवसांनी तिच्याशी बोलणं थोडं कमी केलं कारण, मला तिनं केलेल्या प्रश्नाचा उलगडा झाला होता की, ती अशी का बोलली. कदाचित मी तिला आवडत असावा. परंतु, माझं आधीच एका मुलीवर प्रेम असल्याकारणाने मी तिच्याशी बोलायला टाळाटाळ करायचो. तसा अधूनमधून एखादा मेसेज सोडायचा तिच्यासाठी.
जिंदगी में कुछ लम्हें खास बन गये.....
मिले तो मुलाकात,
बिछडे तो फऱयाद बन गये.....
जो लम्हे दिल में बस गये वो,
प्यारी सी याद बन गये......
आप जैसे कुछ खास मिले
और जिंदगी बन गये.......
कालांतराने आमचं बोलणं अधिकच वाढलं आणि त्यातल्या त्यात भर म्हणजे, माझ्या प्रेयसीसोबत माझं ब्रेकअप झालं आणि बोलताना एकदा माझी जीभ फिसलली म्हणावं की काय माहित नाही, पण मी नकळत तिला I LOVE YOU हा शब्द बोललो. पण मी तिला लगेच SORRY म्हणून एक मेसेज पाठवला, हा मेसेज तिच्यापर्यंत पोहचण्याच्या आधीच तिची प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहचली होती. तिची प्रतिक्रिया (मेसेज) बघून मी तर दंगच झालो. ती बोलली मी तुम्हाला पहिल्या नजरेतच पसंत केले होते, मी तुम्हाला बघितलं तेव्हापासूनच मला तुम्ही आवडायला लागले, हेच शब्द ऐकण्यासाठी दोन वर्षे वाट पहिली.
जेव्हा की तिला माझ्याबद्दल सगळंच माहिती होतं, कारण मला आठवते तिथपर्यंत मी तिला माझ्या प्रेयसीबद्दल सगळंच सांगितलं होतं. तरीसुद्धा तिने माझ्या प्रेमाला होकार द्यावा मी एकदम चकितच झालो की असं काय आहे माझ्यात तिने एका नजरेत पसंत करावं आणि पहिल्याच भेटीत प्रेमात पडावं. आणि तिला असं काय कमी जाणवल की तिने 5 वर्षाच्या प्रेमाला काही क्षणात विसारावं???
दिनांक - १६/०४/२०१७ इथे माझ्या प्रेमाचा एक डाव संपला होता म्हणजे, जिच्यावर 5 वर्षे जीवापाड प्रेम केलं तीच व्यक्ती आज मला सोडून गेली होती. एक खेळ इथेच संपला होता व दुसऱ्या खेळाला सुरुवात झाली. पुन्हा एकदा डाव आला पण मी पहिल्याच खेळात एवढा दंगलो की दुसरा डाव कधी आला कळलंच नाही. आणि आजही तो डाव समजायला वेळ नाही कारण, आजही मी तिच्यावर तेवढंच प्रेम करत होतो जेवढं काल करत होतो.
कदाचित माझं हे प्रेम पाहून तिचा आणखीनच माझ्यावरचा विश्वास दृढ होत गेला. कारण ती समजूनच गेली की, ज्या व्यक्तीच्या जीवनात दुसरी प्रेयसी असून तो पहिल्या प्रेयसीला विसरू शकत नाही म्हणजे यासारखं प्रेम कोणी करूच शकत नाही. कदाचित माझ्यामध्ये हीच गोष्ट तिला आवडत असावी. मानलं की खरं प्रेम एकदाच होते पण आपल्यावर कोणी खरं प्रेम करत असेल त्याचं/तिचं काय?? आणि आपल्यासोबत घडलं तेच दुसऱ्यासोबत का घडावं?
माझं मलाच कळत नाही, कसा खेळ मांडला गेला.
आणि कसा खेळावा, की सांगून द्यावं मी हरलो!!
खूप काही सांगायचं आहे तिला, प्रत्येक क्षणाला वाटतं की सगळं सांगावं पण,
मी कमी बोलतो म्हणून,
शब्द मुके कागदावर उतरतात.
मी बोलायला गेलो तर,
वेडे ओठातून परततात.
आणि बोलायचं म्हटलं तर,
शब्द मुकेपन धरून घेतात.
खूप विचार येतात मनात, आधी विचार येतो तो मला झालेल्या खऱ्या प्रेमाचा आणि मिळालेला दुरावा. विचार येतो तिचा जी माझ्यावर खरं प्रेम करते. आजही मी तिच्यासोबत बोलताना माझ्याकडून नेहमीच कुठेतरी पहिल्या प्रेयसीचा उल्लेख होतो. का? तिच्या भावना नसतील का दुखावत? कुठेतरी तिलासुद्धा वाईट वाटत असेल पण तसं ती बोलून दाखवत नाही. कदाचित तिला माझं मन दुखवायचं नसेल कारण, तीसुद्धा प्रेम करते माझ्यावर. तरीसुद्धा माझं मन का वळत नाही? कधीकधी स्वतःवरच खूप चिडतो, स्वत:लाच विचारतो मी असा का? माझ्यासारखा पागल प्रेमी या दुनियेत दिसणार नाही जो की दुसरी मुलगी जी जिवापाड प्रेम करणारी सोबत असल्यावरसुद्धा पहिल्या प्रेमाला विसरू शकत नाही.
असो प्रेमाचं काय आज ना उद्या एखाद्या अनोळखी मुलीसोबत लग्न करणार, तिच्यावर प्रेम होणार थोडा वेड लागेल पण होणार तेच प्रेम हिला देईन जी माझ्यावर जीवापाड प्रेम करते, आत्ता माझ्या जीवनामध्ये प्रेयसी म्हणून आहे.
आज मी तिला वचन देतो की, जरी मी काहीही करत असणार तरी, मी जीवनामध्ये तुझी साथ सोडणार नाही अखेर माझी सोबत तूच राहशील. आजच मी तुझं प्रेम हे माझ्यासाठी "अखेरचं प्रेम" म्हणून स्वीकार करतो.