एक तरी मैत्रीण असावी
एक तरी मैत्रीण असावी
एक तरी मैत्रिण असावी
खरच अशी एक तरी मैत्रीण असावी,
जरी न बघता समोर गेलो,
तरी मागून आवाज देणारी,
चुकला तर रागवणारी,
वेळ आली तर काळजी घेणारी,
एक तरी मैत्रिण असावी.
बोलतांना ती अस एक वाक्य बोलून गेली तिचे शब्द लागले माझ्या मनाला. मला गर्व आहे तुझ्यासारखी मैत्रिण असल्याचा. भाग्य समजतो मी की मला तुझ्यासारखी मैत्रिण मिळाली. खरच यार मी विचारही करु शकत एवढी काळजी करतेस. काळजाला लागले तू बोललेले शब्द.
माझी एक विनंती आहे तुला की, काहीही झालं कितीही दूर गेलो तरी आपल्या मैत्रीत फूट पडायला नको. कारण तुझ्यासारखी मैत्रिण मिळायला नशीब लागत, खरच मन जिंकलीस माझ.
याआधी पण आपण सोबत शिकलो, एका क्लासमध्ये पण तुला एवढ्या जवळून जाणण्यासाठी मला कधी वेळच मिळाला नाही. आज मी तुला ओळखलं, जेव्हा बी. एस. सी. पहिल्या वर्षाला सोबत होतो त्यावेळेस मी तुला वेळ द्यायला लागलो. तस तर सर्वच मैत्रिणींना देत होतो. सोबत बसणं मधल्या ब्रेकमध्ये सोबत डबा खान, तसा मी कधीकधी डबा नेत नव्हतोच तरी स्वतःचा डब्बा काढून बोलावण, एक चम्मच शेअर करून डब्बा रिकामा करण, कॉलेज सुटल्यावर दाबेली सेंटर वर जाऊन बसन सोबत दाबेली खान. किती मस्त चालायचं आजही आठवतात ते दिवस.
कळत नकळत ते मित्र बनतात,
कळत नकळत प्रेम जुळते.
तो काहीच बोलत नाही तरीही,
शब्दावाचून तिला सगळकाही कळते.
पण तुला माझ प्रेम कधी कळलंच नाही, खर सांगायचं तर तुझ्या कोमल अंगावर, नी चांगल्या स्वभावावर भाळलो होतो.
मला प्रेम तेव्हाच झालं होत जेव्हा तू बोललीस की, " तो एका बुकासाठी तेवढ्या दुरून येणार आहे का " तुझ्या या वाक्यामध्ये मझ्याप्रती असलेलं प्रेम, आपुलकी काळजी दिसत होती. मनात विचारही आला
की तुला त्याच क्षणी सांगावं मला तू आवडतेस माझे तुझ्यावर प्रेम आहे. वाटलं विचारावं जीवनात साथ देशील का ?
तुझ्याबद्दल कोणी काही बोललेल सहन होत नव्हतं. तुला आठवत असेल माझा एक मित्र तुझ्यासोबत बोलायचा, त्याच तुझ्याशी बोलणं मला खटकत होत. त्याच्यासोबत मी भांडण पण केल होत तेव्हा त्यानं तुझ्याशी नाही बोलावं यासाठी.
शब्दाविना कळाव, मागितल्याशिवाय मिळावं.
धाग्याविणा जुळाव, स्पर्षावाचून ओळखावं.
तुझ माझं प्रेम
हे प्रेम नाही तर काय होत तुझ्यासाठी भांडण करणं तेव्हा तर सिद्धच झालं होत की मी तुझ्यावर प्रेम करायला लागलो होतो पण मी बोलू शकलो नाही.
मी तुझ्यावर प्रेम करतो,
हे ओठावर आणता आल नाही.
प्रेम असच असतं,
हे शब्दात सांगता आल नाही.
खूप वेळा विचार केला या विषयावर तुझ्याशी बोलायचं पण तू तशी संधीच दिली नाही. मला एक चांगला मित्र तर कधी चांगला भाऊ असा दर्जा देत राहिलीस. आणि मी तुझ्या या आपुलकीने आणखीनच प्रेम करायला लागलो, पण कधी शब्दात सांगू शकलो नाही. दिवसाबरोबर - दिवस लोटून गेले तुझ्या स्वभवाबरोबर तुझ साैंदर्य मला आणखीन जास्त आवळायला लागलं. आणि मी ते मनाच्या डायरीत साठाऊन ठेवलं.
तुला पाहताना, थेंबासह ओघळला,
तृप्त होऊन शब्दांसावे, कागदावर पाझरला.
पण मी तुला कधी बोलू शकलो नाही आणि फक्त एक मित्र-मैत्रिण म्हणून सोबत आहोत. आजही माझ्याप्रती तुझी तीच भावना असेल कीव्हा नसेल. यानंतर तू मला काय म्हणशील, माझ्याबद्दल काय विचार करशील माहीत नाही पण आजपर्यंत जशी माझी मैत्रीण म्हणून होतीस तशीच पुढेही राहा आणि वचन दे की यापुढेही माझी मैत्रीण म्हणून सोबत राहशील. कारण एक तरी मैत्रीण असावी.