त्याग
त्याग
समजत नाही आहे आजच्या दिवशी तिला शुभेच्छा देऊ की दुःख व्यक्त करू ! अपेक्षा होती तिच्याकडून निस्वार्थ प्रेमाची, प्रेमाच्या मोबदल्यात प्रेम मिळेल. आज शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहत होतो की, माझ प्रेम मला मिळेल पण ते मिळू शकलं नाही. वाटत होत की, मी तिच्या प्रेमासाठीच जगात आहो पण नाही. तिच्यापेक्षा जास्त प्रेम करणारी आणि जीव लावणारी मुलगी मला मिळू शकेल अस तीच बोलली होती. होय मिळाली पण, तिला विसरणे शक्य नव्हते आणि आजही शक्य नाही कारण, जीवापाड प्रेम केलंय तिच्यावर आणि आजही तेवढंच करतोय जेवढं आधी करत होतो कदाचित ते प्रेम ती समजू शकली नाही.
काहीच नको होत मला तिच्याकडून गरज होती तर ती फक्त आणि फक्त निस्वार्थ प्रेमाची. आमची एक शेवटची भेट आठवते मला ती पण सार्वजनिक ठिकाणी भेटलो होतो फार काही बोलणे झाले नाही पण, एक महत्वाचा निर्णय त्या शेवटच्या भेटीत घेतला होता, तो म्हणजे दोघांनी वेगवेगळ्या वाळणांनी जायचं ठरलं त्यानंतर हीच आमची शेवटची भेट ठरली.
पाच वर्षे झाली असतील त्या भेटीला पण आजही मी तिला विसरु शकलो नाही, आणि यापुढेही कधी विसरनार अस वाटत नाही. कारण मन मानत नाही तीला विसराव कारण खूप प्रेम केलंय तिच्यावर शब्दातही सांगता येणार नाही किती प्रेम केलंय. मन कधी आणि कसे जुळले, प्रेमाच्या या अतूट बंधनात कधी - कसा बांधला गेलो कळलेच नाही.
ती मुलगी होती की, जादुई परी नेमक काय म्हणावं कळत नाही. पहिल्या भेटीतच माझं मन तिच्यामध्ये कधी गुंतल कळलच नाही. जेव्हा पण एकटं वाटतं ना तेव्हा तिचीच आठवण येते. तीच बोलणं, हसन, सगळच आठवत आजही. जेव्हा-जेव्हा तिची आठवण येते तेव्हा सगळीकडे तिचाच चेहरा दिसतो. तिची आठवण म्हणजे एक प्रकारच्या वेदनाच समजा. वाटलं नव्हतं की, तिच्यावर प्रेम केल्यानंतर एवढं दुःख होईल. वाटलं नव्हतं आम्ही कधी एकमेकांपासून दुरावणार.
बहुतेक प्रियकर - प्रेयसी म्हणतात एकमेकांना वचन देतात, मी तुझ्याशिवाय जगणं शक्य नाही मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, या सर्व गोष्टी बोलण्यापुरतेच मर्यादित असतात. माझ्या सगळ्या इच्छा - आकांक्षा आज संपल्या होत्या, त्याचबरोबर एकदा भेटणार अशी शेवटची आशा होती तीसुद्धा आता संपणार होती. कारण तिचं आज लग्न होऊन एका अतूट, पवित्र बंधनात बांधली जाणार होती. प्रेम सगळेच करतात आणि माझ्या अनुभानुसार तर काहींच्या च नशिबात असते ते प्रेम जे त्यांना हवं असते. कारण सगळ्यांनाच वेगवेगळ्या वणानांनी जावं लागतं. दोन प्रियकराच्या मधात येतो तो त्यांचा परिवार , त्याची जात, किंव्हा गरिबी अशा काही शुल्लक कारणांसाठी दुरावा निर्माण होतो आणि हीच पद्धत आहे अस समजायला ही काही हरकत नाही. कारण प्रेम व्यक्त करणाऱ्यांच्या भावनांना समजून घेणारं कोणी नसतं. जिथे निस्वार्थ प्रेम असतो ना ते प्रेम कधीच मिळत नाही. असो नशिबात जे असतं तेच होत आणि जे होऊ शकल नाही त्यापेक्षाही अधिक चांगलं होईल.
परिवारासाठी माझा साथ सोडला होता तिने, परिवाराची बदनामी नको व्हायला म्हणून मला विसरण्याचा निर्णय घेतला कदाचित तिच्या या निर्णयात तिचा आनंद असावा असेल तर चांगलचं आहे तिच्या आनंद आणखीनच वृध्दिंगत होवो सुख समृद्धी लाभो हीच माझी शेवटची आशा आहे. ठिक आहे कदाचित तिच्या घरच्यांनी जो निर्णय घेतला तो तिच्यासाठी चुकीचा नसावा, पण तिने थोडा विचार स्वतःचा किंव्हा माझाही करायला हवा होता. आजच्या नंतर तीला भेटण्याचा विचारही करणार नाही. माझे दुःख, वेदना, तिच्यापर्यंत कधीच पोहचणार नाहीत. मला नकार देण्याच्या तिच्या या निर्णयातही मी माझा आनंद शोधण्याचा प्रयत्न करेल.
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय...
