Kamlesh Indorkar

Others

2  

Kamlesh Indorkar

Others

माझं पेटून उठलेलं मन

माझं पेटून उठलेलं मन

2 mins
117


सोसून कडा वेदनेच्या

घातले तुला जन्माला

दाखवली डोळस दुनिया

का विसरलास त्या मातेला

          

जन्म आणि मृत्यू यापैकी कोणतीच गोष्ट मानवाच्या हातात नाही परंतु माते शिवाय जन्म घेणे ही शक्य नाही. या सृष्टीवर असलेला प्रत्येक मानव फक्त मानव म्हणण्यापेक्षा प्रत्येक सजीव आहे तर तो त्या मातेमुळे जर आई नावाचं पान नसतं तर कदाचित या सृष्टीवर कोणी जन्मला नसता. आई काय असते हे प्रत्येक सजीवाला माहीत असाव.

आई म्हणजे काय असते

वासराची गाय असते

लंगड्याचा पाय असते

दुधावरची साय असते

लेकराची माय असते"

 

        अनिरुद्ध वनकर यांनी म्हटल्याप्रमाणे आई म्हणजे काय असते ? खरंच आई म्हणजे काय असते हे जाणून घ्यायचं असेल ना तर ज्यांच्या डोक्यावर मायेची सावली नाही त्यांना विचार आई काय असते. नऊ महिने उदरात असलेलं बाळ जन्माला घालताना आई स्वतः मरण यातना सहन करून बाळाला जन्म देते आणि पहिला प्रश्न विचारते माझं बाळ कसं आहे ? हा एकच दिवस असतो ज्या दिवशी मुलाच्या रडण्याने आई हसते. त्यानंतर सारे दिवस आई मुलाच्या सुखासाठी झुरत असते. त्याचा आनंद कशात आहे जाणून त्याच्या आनंदात आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न करते. आईचं हे निरागस नातं या जगात कुठेच सापडणार नाही मुलांचे भविष्य उजळवण्यासाठी अतोनात प्रयत्न करते, त्यांना स्वबळावर जगण्याची हिंमत देते. काय काय नसेल करत आई मुलांसाठी विचाराव एखाद्या मुलाला. मुलगा सुधारावा चांगल्या वळणावर जावा असे मुलाकडून वचन घेऊन मुलाचे पाय धुऊन पाणी पितानाची आई याचाही अनुभव मी घेतला तेही फक्त मुलांच्या भविष्यासाठी. आता यापुढे तुम्ही बोला काय करत नाही ?

 

       आई फक्त आणि फक्त मुलांच्या भविष्यासाठी वाटेल ते करते त्यानंतरही जेव्हा एखाद्या झोपडीत एकटी असलेली आई दिसते तेव्हा माझं मन पेटून उठते रहायला अलिशान बंगला, फिरायला चार चाकी गाडी, खायला हॉटेल सर्व कोणामुळे तिच्यामुळे मिळाले ना ! मग आज ती अशी एकटी का ? आई झोपडीत एकटी रहात असताना सुद्धा आपल्या मुलाचे गोडवे गाते त्याला काय हवं काय नाही सर्व विचारपूस करते. एकटी रहात असताना सुद्धा तुला आणखी काही लागेल तर सांग मी पाठवते असे बोलून मुलाला धीर देते त्यातून आपुलकी, जिव्हाळा, प्रेम दिसून येते आपल्या मुलाविषयी कळकळ दिसते, तरी का तिच्या भावना मुलाला समजत नसतील ! कदाचित नसतील समजत तेव्हाच ती आई एकटीच झोपडीत राहते. त्या झोपडीतील आईला पाहून माझं मन पेटून उठते ज्या माऊली मुळे आपण ही दुनिया पाहतो, उन्हाचे चटके सोसून काबाडकष्ट करून आपल्याला लहानाचं मोठं करते कधी कधी स्वतः उपाशी राहून मुलाला घास भरवते, ती लहानपणीचे भाकर जेव्हा तिला मुलं परत करू शकत नाही तेव्हा माझं मन पेटून उठते.


वृद्धाश्रमात गेल्यावर दिसते तिथे कित्येक वयोवृद्ध माता बंधु राहतात. काहीतरी लहान-मोठे काम करून मिळेल त्यात पोटाची खळगी भरतात आश्रमात राहून सुद्धा मुलांचे गोडवे गातात, तरी याची जाणीव त्या मुलाला होत नाही तेव्हा माझं मन पेटून उठते, अशा या थोर माऊलीस माझा प्रणाम!


Rate this content
Log in