आठवणीतले घर
आठवणीतले घर
मी आणि माझा छोटासा परिवार आबाजी आई मी आणि माझे तीन भाऊ असे सहा जण नेरी येथे आमचं छोटस कौलारु घर, घर खूप छोट आणि पैशाच्या बाबतीत पण तेवढे काही श्रीमंत नाही पण घरातील लोक मनानी खूप मोठे.
माझी आई तर खूप प्रेमळ अगदी माझ्या आजीसारखी.
माझी आजी आईची आई शांताबाई खूप प्रेमळ आणि मुक्या प्राण्यासाठी तर खूपच जवळची होती, आणखीन सांगायचं म्हणजे ती लांब पोळ्या करायची आजही आठवण येते तिच्या हातच्या लांब पोळ्याची आणि गाणं पण खूप सुंदर म्हणायची.
मझ्या आईला पण गाण्याची आवड होती कुठलही काम करत असतांना गुणगुणत राहायची पण आता तीच गाणं आता थांबलं. त्याचबरोबर फुलझाडांचीही आवड होती. आईला कोणाच्या घरी कुठलं फुलझाड दिसलं की लगेच त्यांना विचारून घेऊन यायची आणि घरी लावायची.
माझे वडील शिंपी ( टेलर ) होते बाजार चौकामध्ये त्यांचं छोटस दुकान होत त्या वेळेस तेही फार काही चालत नसेल कदाचित. वडील तर एकदम शिस्तीचे होते, आमच्या गावात नवरात्री ला देवीजवल वर्गणी गोळा करून जेवण देतात तिथे वडिलांनी पण वर्गणी दिली होती तिथे माझे मोठे भाऊ जेवायला गेले आणि त्यांनी तिथून बुंदी आणली तेव्हा त्यांनी खूप मारलं होत ते असतांना आमच्या तोंडातून आवाज सुद्धा निघत नसे. हे संगड माझ्या भवानी लिहिलेल्या एका आठवणीतून मला माहिती झालं कारण मी तेव्हा खूप लहान होतो
माझे आबाजी झाडू विकायचे व घरखर्चात थोडा हातभार लावायचे. आता म्हातारे झाल्यामुळे घरीच असतात.
आम्ही चार भाऊ खंत याची आहे की आम्हाला एकही बहीण नाही चारही भाऊच पण कधीकधी वाटते कि बराच आहे बहीण नाही तर कारण माझ्या आईला 2 भाऊ पण भाऊ असून कधी त्यांना बहिणीविषयी काही वाटत असेल माहित नाही मग काय फायदा.
माझा मोठा भाऊ मोठा असून मोठ्यासारखा वागत नसे आणि मजवा भाऊ तो सहावीत असतांनाच नवोदय च्या विद्यालय मध्ये शिकायला गेला. आम्ही दोघे लहान आणि मोठा भाऊ असे तिघे भाऊ आम्ही घरी आईसोबत राहायचो. मोठा भाऊ मोठा असून सुद्धा तस तो वागत नसे आईला व आम्हाला खूप त्रास द्यायचा तसा आजही त्याचा त्रास काही कमी नाही आजही तो तेच करतोय म्हणून आम्ही कधी त्याला भाऊ म्हटलंच नाही नावानेच हाक मारायचो.
आमच्याकडून काम करून घ्यायचा आम्ही आईला मदत करायचो आणि आणि तो आम्हालाच मारायचा आई त्याला खूप ओरडायची पण तो काही ऐकत नसे आम्ही सगडे त्याचा खूप राग करायचो.
दिनांक :- 12-01-2000
माझ्या वडिलांनी माझ्या आईला माझ्या लहान आत्याच्या गावाला पाठवलं सोबत आम्ही दोघे लहान भाऊ गेलो होतो घरी माझे आबाजी आणि माझे दोन मोठे भाऊ आणि बाबा अशे चार जण घरीच होते बाबा दिवसभर दुकानात जायचे व एकदम रात्री घरी यायचे.
दिनांक :- 14-01-2000
आज तीळसंक्रांत माझ्या आबाजीनी तिळगुळ बनवला माझ्या भावांना खायला दिला त्यातलाच थोडा तिळगुळ त्यांनी वडीलासाठी एका कागदाच्या पुडीत बांधून ठेवला पण तो त्यांनी खाल्ला नाही.
त्या रात्री माझे वडील दुकानातून उशिरा आले दोन्ही भावांना कुरवाळल आणि आम्हा सर्वांना सोडून कुठतरी दूर सहलीला निघून गेले तीच शेवटची रात्र.
सकडी उठून बघतात तर काय माझे वडील बेडवर नव्हतेच ते अशे एवढ्या सकडी उठून कधीच कोठेच गेले नव्हते पण आज कुठे गेले ते कोणत्याच सजीवला माहित नसावं आमचं तर दूरच राहील.
आबाजींनी त्यांना खूप शोधलं जेवढं लहानपणी त्यांना शोधलं नसेल तेवढं आज शोधलं होत. त्यांच्या सगड्या मित्रांकडे गेले सगाडीकडे फोन लावला पण कोणकडूनच आमच्याकडे आले होते किव्हा आहेत अस उत्तर मिडल नाही. शेवटी माझ्या मोठ्या आत्याच्या पतीला माझ्या मामाजीला बोलावून लहान आत्याकडून आईला व आम्हाला घरी घेऊन आले आईला तर भानच नव्हते की इथे काय चाललय ती स्वतःच भानच विसरून गेली होती तिला काहीच समजत नव्हतं.
माझे वडील घरी परत न येण्याचा आजचा तिसरा दिवस होता माझा मजवा भाऊ शाळेत गेला होता दुपारच्या सुट्टीत घरी परततांना घराजवडचा मुलगा राकेश आणि माझा भाऊ दोघेही घरी येत होते.
घराजवड एक विहीर होती त्या विहिरीत कासव होता ते शाळेतून परतताना त्या कासवाला रोज पाहायचे त्या दिवशी माझा भाऊ कासव न बघताच सरळ घराच्या दिशेने आला पण राकेश त्या विहिरीत कासव बघायसाठी डोकावला तर त्याला कासवाच्या जागी माझे वडील दिसले तो ओरडला अप्पुचे बाबा विहिरीत आहेत.
सगाडीकडे खडबड उडाली आबाजी तर विहिरीजवड जाऊन बेभान झाल्यासारखे रडायला लागले सगडा गाव तिथे जमा झाला आई तर बेशुद्धच पडली होती कारण तिच्यावर आता खूप मोठं आभाळ कोसळलं होत.
तिच्या हिरव्य बांगड्या फुटल्या होत्या, तीच कुंकू पुसलं तीच, सौभाग्य मिटल आणि फक्त उरलं होत ते दुःखाचे डोंगर आणि ते दुःखच डोंगर आम्हा सर्वांसाठी ते सोडून गेले.
हे डोंगर दुःखाचे ओझे आम्हाला पार करायचे आहे आजही दुःखाचे ओझे उतरायचे आहे आणि आईच्या डोक्यावरून उतरवायचे आहे आम्ही हे उतरवण्याचे पूर्ण प्रयत्न करून या दुःखाला संपवायचं आहे.