Kamlesh Indorkar

Drama Romance

4.8  

Kamlesh Indorkar

Drama Romance

अबोल प्रीत

अबोल प्रीत

3 mins
585



मी तिच्यासोबत रोज बोलत नव्हतोच आणि स्वत:हून तर चुकूनही फोन करत नव्हतो. त्याचं कारण काय ते मलाच माहित. पण तिनं एक दोनदा फोन केला की मी नक्कीच बोलत होतो. कारण ती माझ्यावर प्रेम करते हे मला चांगल्या प्रकारे माहिती होतं. आणि जिथपर्यंत मला माहिती आहे तिथपर्यंत तिला मला भेटण्याची खूप उत्सुकता असायची आणि आजही आहे.


माझा वाढदिवस मी तिला बोललो होतो की, माझ्या वाढदिवसाला तू माझ्यासमोर राहून शुभेच्छा देशील, पण तिला काही कारणांनी सुट्टी मिळणे शक्य नव्हते. ती पुण्याला जॉब करते आणि जॉब काय असते हे मलाही माहित आहे आणि सुट्टीसाठी किती खटपट करावी लागते हेही मला चांगल्या प्रकारे माहित आहे. कारण मी सुद्धा कुठेतरी जॉब करतो त्यामुळे मी तिला वाढदिवसासाठी येण्यास काही जबरदस्ती करू शकलो नाही.

                           

ती मला बोलली की माझं 21 तारखेला येणं शक्य नाही पण मी 25 तारखेला नक्की येईल आणि एक पूर्ण दिवस वेळ तुम्हाला देईल. मी तिच्या या बोलण्यावर समाधानी होतो. कारण तसं ती न येता ही शुभेच्छा देऊ शकली असती आणि तेही सर्वांच्या आधी म्हणून मी तिला तेवढा काही फोर्स केला नाही की तू वाढदिवसाच्या दिवशीच ये म्हणून. तसं एवढ्यात मी तिचं मन समजावं म्हणून थोडा तरी बोलायचा तिच्यासोबत. कारण तिलाही कुठेतरी ही गोष्ट खटकत असेल आणि तिलाही या गोष्टीचं वाईट वाटत असेल की मी वाढदिवसाला नाही जाऊ शकले म्हणून.

                        

माझ्यासोबत असलेला स्टाफ मला चिडवत पण होते की तुमची प्रेयसी कशी तुमच्या वाढदिवसाला येणार नाही. मी त्यांना सुट्टीचं कारण सांगितलं तर ते बोलायचे की, सर सगळं पाॅसीबल असतं फक्त प्रयत्न करावे लागतात. आणि काही स्टाफ बोलत होता की तुमची 25 तारीख मी 21 तारखेलाच आणतो, मी त्याच्या गोष्टी ऐकून सोडून द्याचा. कारण मला माहिती होतं की ती माझ्याशी खोट बोलणार नाही.

                      

शेवटी 20 तारखेची रात्र आली म्हणजे 12 वाजता 21 तारीख लागणार, तशी माझा वाढदिवस साजरा करण्याची चांगलीच तयारी माझ्या होस्टेलच्या मुलांनी आणि मुलीची वॉर्डन यांनी केलीच होती. माझ्या डोळ्याला एक रुमाल बांधून काही मुलं मला घेऊन गेले वाढदिवस साजरा करण्यासाठी. पण माझं पूर्ण लक्ष फोनवर होतं कारण मला 12 वाजता शुभेच्छा देण्यासाठी तिचा फोन येणार हे मला माहिती होतं. माझ्या डोळ्याचा रुमाल सुटायच्या आधीच मला तिचा फोन आला, मुलांनीच तो फोन रीसिव्ह करून दिला. मी तिच्या शुभेच्छा स्वीकार करून नंतर बोलतो असं बोलून फोन कट केला. कारण इथे मुलं वाढदिवस साजरा करणार होते. मुलांनी आणलेला केक कट करून मी होस्टेलला गेलो.

               

आणि तिला फोन केला तर थोडी रागावलेली, मग मी ओला असल्यामुळे पुन्हा नंतर बोलतो म्हणून फोन कट केला. आणि गेलो तेवढ्यात सर आले आणि मला पुन्हा कुठेतरी घेऊन गेले. आणि जिथे घेऊन गेले तिथे आश्चर्यजनक गोष्ट पाहायला मीळाली ती म्हणजे माझी प्रेयसी जी 25 तारखेला येणार होती ती चक्क माझ्या डोळ्यासमोर. तिला बघून तर मी एकदम मंत्रमुग्ध झाल्यासारखा तिला मिठीत घेतलं. त्याक्षणी अस वाटलं की माझं सगळं काही आज मला मिळालं, माझं हरवलेलं प्रेम आज मला मिळालं. तिलादेखील वाटलं असेल की तिचं प्रेम आज तिला मिळालं. कारण तिला इग्नोऱ करणारा मी, मी तुझ्यावर प्रेम करत नाही असं म्हणणारा मी, आणि आज तिला बघून मिठीत घेणं आणि चेहऱ्यावरचा आनंद कुठेतरी प्रेम व्यक्त करत होता.

                       

आजपर्यंत माझं प्रेम हे एकाच मुलीपर्यंत मर्यादित होतं आणि आजही थोडं असेल तिच्यासाठी पण शेवटी मी ज्या प्रेमाला आजपर्यंत स्वीकारण्यास असमर्थ होतो तेच प्रेम आज काहीही न बोलता व्यक्त झालं ते माझ्या वागण्यातून. तिला पाहून झालेला आनंद आणि प्रेमानी मारलेली मिठी हीच ती अबोल प्रित. शब्दात न बोलता उफाळून आलेलं हे प्रेम हीच ती अबोल प्रित.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama