Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Kamlesh Indorkar

Others


2  

Kamlesh Indorkar

Others


सहवास मैत्रीचा

सहवास मैत्रीचा

3 mins 986 3 mins 986

काय असतो हा साहवास ?

सहवास म्हणजे नेमकं काय ?

         एकांतात बसून असतांना,

         विचारात फसून असतांना,

         मनात तुझा विचार आला,

         सहवासात घालवलेला क्षण,

         निशब्द कागदावर कोरला गेला.

सोबत आणि वास्तव्य या दोन गोष्टी एकत्र आल्या की, सुरु होतो एक प्रवास कदाचित याच प्रवासाला म्हणत असावं सहवास. असाच एक सहवास सुरु झाला तो आमच्या मैत्रीचा.

       तुझ्या मैत्रीचा हात हवा-हवासा वाटते,

       तुझ्या डोळ्यावरचा गॉगल पहावस वाटते,

       आता तुझ्या मानातच घर करून राहावस वाटते,

       तुझी आठवण आली की खूप बोलावसं वाटते.

                    आमच्या मैत्रीचा सहवास सुरु झाला तो त्याच्या डोळ्यावरचा गॉगल आणि त्याची बसण्याची एक वेगळीच शैली. खरच भाळलो मी त्याचावर. एकदा का तो माझ्याशी बोलला तेच आमचं रोजच बोलणं सुरु झालं. रोज सायंकाळी चहाच्या वेळेस मी कॅन्टीन मध्ये जयचो, तसा मी सायंकाडचा चहा पीत नव्हतो, पण मला त्याच बोलणं आणि त्याच्यासोबत वेळ घालवायला आवडायचं म्हणून मी चहा प्यायला जात होतो.

    

                         मुलांना माझं त्याचाशी बोलणं, वागणं थोडं वेगळच वाटायचं आणि आजही वाटतच असेल. सहाजिकच आहे कारण एखाद्या मुलाला एखाद्या मुलावरच प्रेम होन हे त्यांच्यासाठी एक विचार करण्यासारखी बाब होती. पण माझ्यासाठी ते काही वेगळं नव्हतं, कारण प्रेम हे प्रेम असत एखाद्या मुलीवर प्रेम होऊ शकते, भावावर असू शकते, आईवर असू शकते, वडिलांवर असू शकते, तर एखाद्या मित्रावर का नाही ?????????


                  

काय आहे यात नवीन अस नवल वाटण्यासारखं एकदा मुलीला संकटात आवाज द्या कधीच धावून येणार नाही ती पण तेच मित्राला आवाज द्या कुठलाही संकट पार करून तो मित्रासाठी धावत येईल. मग काय चुकलं रे माझं मित्रावर प्रेम केलं तर काय चूक केली ???

             

लोक काय विचार करतात / करत असतील / किव्हा करतील मला काहीच करायचं नाही, कारण या मैत्रीप्रेमात मी एकदम भारावून गेलो आहे. त्याच्यामध्ये तर एवढा गुंतलो की, आज दूर जाण्याचीही भीती वाटते.

                  कदाचित तोही माझ्यावर प्रेम करत आसवा पण, तस तो दाखवत नाही. आणि डोळ्यातील भावना मात्र लपवू शकत नाही. माहिती आहे मला कि तोही प्रेम करते पण तास व्यक्त करत नाही.

बोलायचे असते तेव्हा तू भेटत नाहीस,

दिसतेस तू मला तेव्हा शब्द फुटत नाहीत,

एकांतात तुझ्या स्मरणाने हळूच मी हसतो,

प्रत्यक्षात मात्र भेटल्यावर सगळं विसरून जातो,

तुही प्रेम करतेस पण तस दाखवत नाहीस,

डोळ्यातील भावना मात्र लपवू शकत नाहीस,

आपल्या या मैत्रिप्रेमाला दिशा तूच देऊ शकतेस,

माझी अबोल प्रीत तू या कवितेतूनच जणू शकतेस.

              माझ्यापेक्षा मोठा आहे तरी मला भाऊ म्हणतो मला खंत आहे याची की, मी त्याला कधीच भाऊ किव्हा रिस्पेक्ट देऊन बोललो नाही. आणि बोलनारही नाही SORRY कारण मला आमच्या या मैत्रीला एक वेगळं वळण द्यायचे नाही आहे कारण माझ्याकडे बोट दाखवणाऱ्यांना माझ्या मैत्रिप्रेमावर हसणाऱ्यांना मैत्रिप्रेम काय आहे हेही दाखवून द्यायचं आहे.

       

          एक वेळ होती की मी स्वतःच अस्तित्व विसरलो होतो, स्वतःलाही बरोबर ओळखलं नव्हत. आणि आज जर मी स्वतःला ओळखलं असेल ना तर ते फक्त त्याच्याच मूळे आणि त्यासाठी मी त्याचा खूप आभारी आहो.

    कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,

    पण तुझा जन्म एक अनमोल भेट घेऊन आला.

    सहवासात घालवलेले क्षण आठवणी ठेऊन गेला,

    आणि मित्रा तू तर खर जीवन जगन शिकवून गेला.

                

तुझ्या सहवासात घालवलेले क्षण खरच अविस्मरणीय आहेत. खूप आठवण करिन तुला खूप काही चांगलं वाईट सगळंच शिकवलंस मित्रा. भाग्य समजतो माझे कि मला तुझ्यासारख्या अनमोल मित्राचा सहवास लाभला.


      मला नेहमी असच वाटायच,

      तुझ्या डोळ्यात काहीतरी.

      पण प्रयत्नांत वाचायच्या,

      डोळ्याला नेहमी पाणी यायचं.

      एकमेकांकडे चोरून पाहतांना,

   

      नजर मिळताच हळूच हसून जायचं.

      निरोप देता देता एक-मेकाजवड यायचं,

      तू कोण ? मी कोण ? काय नाते आपले ?

      अनेक प्रश्नानी डोकं एकदम भारावून जायचं,

   

      डोक्यात विचारांच तांडव व्हायचं.

      पण नेहमी असच वाटायचं,

      आपण पुन्हा कधीतरी भेटायचं.


Rate this content
Log in