Kamlesh Indorkar

Others

2  

Kamlesh Indorkar

Others

भिकारी

भिकारी

2 mins
205


आई वीणा भिकारी स्वामी तिन्ही जगाचा

आई म्हणजे काय असते, लगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, आई म्हणजे लेकराची माय असते.

10 वी किंवा 12 वी च्या पेपर मधे नेहमीच आई या विषयावर निबंध लिहायला येतच असेल आणि तिथे आईची महती सांगणारे कितीतरी गोडवे त्या पेंमधून कागदांवर उतरतात. माझी आई अशी किव्हा तशी काय काय गोडवे गातात त्या पानांवर ते फक्त लिहिण्यापूरतच असते.

या भूतलावर जेवढे सजीव असतील प्रत्येक सजीवला माहिती असेल की आई काय असते. कारण इथे असलेला प्रत्येक सजीव हा आला तर तो आईमुळेच जर आई नसती तर इथे कुठलाच सजीव जन्मला नसता.

                          आणि या आईची किंमत त्यांनाच कळेल ज्यांना आईच प्रेम मिळाल नाही, आई काय असते स्वतःहा उपाशी राहून लेकराला खाऊ घालून मोठं करते ती असते आई. मग का आपण अस वागतो की ज्यामुळे आई दुखावली जाईल का वागतो अस आपण , आईने दिलेली लहानपणीची भाकर का परत करू शकत, का तिला वृद्धाश्रमात राहावं लागत, का ?????????????????

                                  किती नीच झालास रे मानसा तू कसा विसारतोस त्या विधात्याला ज्यांनी तुला ही दुनिया दाखवली. अरे आज जन्मदाते नसते तर तुझी काय हिम्मत असती या भूतलावर यायची कुठून आला असता रे सगड समजत तुला तरी का असा वागतोस?????

                                          सिनेमा आणि नाट्यगृहात भिकारी झालेला नट तुम्ही बघितला असेलच पण त्याच भूमिकेला सत्यात उतरवताना आईसाठी भिकारी झालेला अनामिक आज माझ्या जवळ आला. सर्वच जवळ असतांना अनवाणी पायांनी, सकाळपासून पोटात काही नसलेला अनामिक, सोबत विस्कटलेले केस आणि चेहऱ्यावर उदंड प्रश्नाचं चिन्ह असलेली आई. तिला हेही सुचत नव्हतं जगावं की मराव ??

                अशा अवस्थेत आज हा अनामिक माझ्या जवळ आला ( भिकारी ). त्यांना पाहून माझ्याही डोळ्यातून अश्रूचा पूर ओघालायला लागला. मलाही काही सुचेनासे झालं काय करावं जगावं कि मराव ? एकच प्रश्न.

                                      खरच अनामिक अभिमान आहे मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा आणि मी तुझा भाऊ असल्याचा. आई विना भिकारी होण्यापेक्षा आईसाठी भिकारी झालेला हा अनामिक खरच खूप अभिमान आहे मला तू माझा भाऊ असल्याचा.

                                जीवनामध्ये जर काही करायचं असेल न तर भिकारी व्हा आईसाठी. तीच आहे जीवनाचे सार्थक करून देणारी तीच आहे संधीच सोन करायला सांगणारी, तीच आहे रे तुम्हाला ही डोळस दुनिया दाखवणारी. म्हणून भिकारी व्हायचं झालं तर पैशासाठी स्वाभिमान मिळवण्यासाठी नाही त्या जन्मदात्या आईसाठी व्हा.

आईविना भिकारी होण्यापेक्षा आईसाठी भिकारी व्हा.


Rate this content
Log in