अक्षता कुरडे

Drama

3  

अक्षता कुरडे

Drama

सुखाचा शेवट...

सुखाचा शेवट...

3 mins
219


बाबुजी ने कहा गाव छोड़दो...

सबने कहा पारो को छोड़दो..

पारो ने कहा शराब छोड़दो..

आज तुमने कह दिया हवेली छोडदो...

एक दिन आएगा जब वो कहेगा,

दुनिया ही छोड़दो... 


असं म्हणून तो हवेली कायमची सोडून निघून जात होता. हवेली च नाही तर हे गाव सोडून जाण्याचा निर्णय त्याने घेतला होता. लग्नानंतर त्याने पारो ला पाहिले देखील नव्हते. शेवटची भेटण्याची इच्छा म्हणून त्याने पारो ला निरोप पाठवला. पारो ला देखील त्याला आतुरतेने भेटण्याची ओढ लागली होती. मनात एक वेगळीच हुरहूर लागली होती. देव चा निरोप आल्यापासून तिचं काळीज धडधडायला लागलं होतं. काही विपरीत तर होणार नाही ना याची शंका येत होती. घरच्यांपासून लपून ती निघाली तिच्या देव ला भेटायला. कोणी तिला पाहणार नाही याची दक्षता घेत ती पडली हवेली बाहेर. 

देव तिची वाटच पाहत बसला होता. ती पाठीमागून आली आणि हळूच तिने देवला हाक मारली. 

"देव.." 

इतक्या दिवसांनी पारो चा आवाज ऐकून भावूक झाला. त्याला आजवर चे त्यांचे सारे प्रेमळ क्षण डोळ्यांसमोरून तरळून गेले. पारो त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. नव्या नवरीच्या वेशात पाहून त्याला ती त्याचीच बायको वाटू लागली. तो तिला तसाच न्याहाळत राहिला. पारो ने देखील काहीच न बोलता तशीच स्तब्ध उभी होती. ते जरी बोलत नसले तरी इतक्या वेळेत त्यांचे डोळे एकमेकांशी खुप काही बोलून गेले होते. त्याने स्वतःला सावरलं. आणि तो तिथून निघून जाऊ लागला. त्याची इच्छा फक्त इतकीच होती की, तिच्या रूपाला डोळ्यांत साठवून घ्यावं आणि तिथून कायमच निघून जावं. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. देव माघारी जायला वळला तसा त्याच्या समोर पारो चा नवरा उभा होता. पारो च्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवून असणाऱ्या कालीबाबु ला सर्वकाही ठाऊक होते. पारो ला हवेलीच्या बाहेर पडताना कालीबाबू ने पाहिलं होत. त्यानेच त्याला पारो देवदास ला भेटण्यासाठी संशयित रित्या घराबाहेर पडल्याचे सांगितले होते. पारो ने ह्या आधी देव बद्दल त्याला सांगितले होते पण ती त्याला भेटायला जाईल त्याला वाटले नव्हते. तसेच मोठ्या घरच्या सुनेची ही अशी वागणूक त्याला अजिबात पटली नव्हती. त्याला त्याच्या घरची अब्रू प्रिय होती. त्याने पारो ला खडे बोल सुनावत, यापुढे हवेलीत पाऊल देखील न ठेवण्यास सांगितले. आणि तो तिथून निघून गेला. देव च्या मनात अपराधी भावना येऊ लागली. त्याने त्याचे हात जोडत पारो ची माफी मागितली तशी पारो अगतिक होऊन त्याला तिच्यासोबत प्रेमाची परिभाषा कळत नसलेल्या ह्या निर्दयी समाजापासून खुप दूरवर घेऊन जाण्यास तिने विनवणी केली. जाता जाता, ज्या व्यक्तीने देव ची काळजी घेत त्याला जीव लावला अश्या चंद्रमुखी ला देखील शेवटचा निरोप देत जाऊ अशी इच्छा पारो ने देव जवळ व्यक्त केली. देव ने त्याला होकार देत तिला चंद्रमुखी च्या दारापाशी घेऊन आला. 


चंद्रमुखी.. चंद्रमुखी.. करत पारो सैरावरा पळत हवेलीत तिला आवाज देत सुटली. तिचा आवाज ऐकत ती देखील धावत आपल्या खोलीतून बाहेर आली. दोघींनी एकमेकींना अशी घट्ट मिठी मारली जणू बालपणाच्या मैत्रिणी असाव्या. देव ला देखील त्यांच्यात मैत्री जाणवली. पारो ला देव सोबत पाहून चंद्रमुखी ला खुप आनंद झाला. देव ने दोघींना तिथेच त्याची वाट पाहत बसण्याची विनंती करत तो हवेलीतून बाहेर पडला. गप्पा गोष्टी करत काही काळ उलटून गेला पण देव अजूनही आला नव्हता. आता मात्र दोघींना ही काळजी वाटू लागली होती. तितक्यात देव आला. त्याच्यासोबत त्याने चून्नीलाल ला आणले होते. त्याने चंद्रमुखी चा हात त्याच्या हातात देत, आयुष्यभर साथ देण्याच वचन चून्नीलाल कडून घेतले. ह्या साऱ्याशी अनपेक्षित चंद्रमुखी चकित झाली होती. पण ह्या अश्या बेरंगी आयुष्यात कशाचाही मोह नसणाऱ्या चंद्रमुखी ला देखील सुखाची हुरहूर लागली असावी. सगळ्यांनी एकमेकांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत हसत निरोप दिला.

आणि प्रत्येकाच्या आयुष्याला सुखासोबत प्रेमाची कड मिळाली. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama