Author Sangieta Devkar

Drama Romance

3  

Author Sangieta Devkar

Drama Romance

सुख म्हणजे नक्की काय - भाग 4

सुख म्हणजे नक्की काय - भाग 4

5 mins
254


रोहन तू नको काळजी करू मी बघते काय करायचे. नात्यात जास्त दुरावा येण्या आधी ते सांधन्याचा प्रयत्न करावा नाहीतर नात तुटायला वेळ लागत नाही. तुझी कळकळ समजते मला रोहन.

प्रत्येक लग्नात थोडी तडजोड ,त्याग हे करावेच लागतात. घरात असणारे भाऊ बहीण सुद्धा भिन्न स्वभावाची असतात त्याच्यात मतभेद असतात त्या वरून भांडण ही होतात. म्हणून काय ते कायमचे नाते नाही तोडत मात्र नवरा बायको च्या नात्याला तडा गेला की अगदी घटस्फोटा पर्यंत गोष्टी जातात. वनिता विचार करतच घरी आली. मितु मैत्रीणीशी फोन वर बोलत होती. हो ग आमचं भांडण झाले मी आई कडेच आहे.आता मला वाटते की मी रोहन शी लग्न करून चूक केली. वनिता ने ऐकले ,तिला बघून मितु ने फोन कट केला.

मितु तुझा निर्णय बाबांना ही मान्य आहे. अग आम्ही तुझ्या साठी एक श्रीमंत मुलगा बघितला होता बघ एकदम मॉडर्न आहे. फॅशनेबल सुद्धा आहे. पार्टी फिरणं,मित्र मैत्रीनी भरपूर आहेत त्याला. अगदी तुला हवा तसा आहे. पण तेव्हा तू नको बोलली कारण रोहन वर तुझं प्रेम होतं तुला त्याच्याशीच लग्न करायचे होते. पण आता त्या मुलाचे अजून लग्न नाही झाले तू तयार असशील तर मी बोलते त्याच्याशी. उगाच रोहन सोबत राहण्यात काही ही अर्थ नाही. तुला सुटेबल नाही तो. नको असलेल्या नात्याच ओझं कशाला वागवायच? वनिता कडे मितु आ वासून बघत राहिली . तिला कुठेतरी हर्ट झाले तिचे बोलणे. आणि आता ते म्युच्युअल डायव्होर्समध्ये फार वेळ लागत नाही पटकन डिओर्स होतो.वनिता ने अजून एक गुगली टाकली. मितु मी माझ्या मैत्रीणी सॊबत पार्टी ला जाणार आहे बाय सी यु म्हणत वनिता आवरायला गेली.

मितु ला खटकलेच जरा. माझी मनस्थिती काय आणि आई खुशाल पार्टीला गेली. संध्याकाळ झाली तरी वनिता घरी आली नाही तेव्हा मितु ने कॉल केला ,' आई अग कुठे आहेस किती उशीर झालाय? कधी येतेस?

मितु अग आम्ही आज सगळ्या जणी सीमा कडे राहणार आहोत उद्या येईन मी आणि हो तुझे बाबा ही मुंबई ला गेलेत. आई पण मी एकटी आहे घरी तू ये..मितु बोलली.

बेटा ज्याला त्याला आपले आयुष्य आपल्या पध्दतीने जगण्याचा अधिकार आहे. मी तुझ्या डिओर्स बाबतीत तुला पाठिंबा दिला ना? मग एक दिवस मी मैत्रिणी कडे राहिले तर काय बिघडले? लता मावशी येतील सकाळी तुला हवं नको करून देईल गुड नाईट. वनिता ने फोन ठेवला.

दुसऱ्या दिवशी ही वनिता घरी नाही आली मितु जाम वैतागली. मैत्रिणी ना कॉल केले पण सगळ्या ग्रुप मध्ये तिच्या डिओर्सचीच चर्चा होती. कोण नवऱ्या सोबत शॉपिंग ला गेलेले तर कोण पिकनिक ला. तिच्याशी फोन वर बोलायला ही कोणाला वेळ नवहता. जो तो आपल्या दुनियेत मग्न होता. मितु च्या लक्षात आले की लग्ना नंतर मुलीच आयुष्य बदलते,नाती बदलतात . मित्र मैत्रिणी चे दृष्टीकोण ही बदलतात. लग्न म्हणजे पोरखेळ नाही आपण लग्ना कडे गांभीर्याने पाहिलेच नाही. तिने पटकन रोहन ला कॉल लावला, बोल मितु कशी आहेस? रोहन ने आपुलकीने विचारले.

मी ठीक तू कसा आहेस रोहन?

मितु तुझी आठवण येतेय खूप दिवस झाले आपण भेटलो नाही आज भेटूया का? मीतूच मन गहिवरून आले,हो भेटूया आपण भेटायचो पूर्वी तिथे ये.

आज कसलाच ताण नवहता. मितु आणि रोहन प्रसन्न पणे एकमेकांना भेटले. आज ते एकमेकां वर चिडचिड करत नवहते तर फक्त प्रेमच प्रेम होतं. मितु ला एकदम हलकं वाटलं रोहन शी बोलून.मितु घरी आली. तशी वनिता म्हणाली, मितु तुझं नक्की रोहन ला डिओर्स द्यायचे ठरले आहे ना? कारण तो आम्ही बघितलेला मुलगा तुला भेटायला तयार आहे. आई इतकी काय घाई आहे जेव्हा व्हायचा तेव्हा होईल आमचा घटस्फोट. अस बोलून ती रूम मध्ये गेली. वनिता च्या चेहऱ्यावर हसू होते. मितु जरी डिओर्स बद्दल बोलली तरी तिला रोहन मनातून हवाच होता. एकमेकांवर प्रेम करत होते ते. रोहन पासून दूर राहणे तिला शक्य नवहते.

आज ही ती रोहन ला भेटायला गेली. मितु घरी लवकर ये तो मुलगा तुला भेटायला येणार आहे वनिता म्हणाली." अरे यार आई ला का इतकी घाई झालीय माझ्या डिओर्स ची आणि दुसऱ्या लग्नाची ही...आपला निर्णय लवकर आई ला सांगायला हवा असा विचार करत ती बाहेर पडली.

कॅफेत रोहन आणि मितु बसले होते. एकमेकांच्या नजरेत हरवून हात हातात घेऊन हरवून गेले होते. " मितु घरी कधी येतेस सगळेजण तुझी वाट बघत आहेत. कसे बसे मी काही कारण सांगून त्यांना गप्प केले आहे  रोहन म्हणाला.

रोहन खरच सगळे माझी वाट बघत आहेत का?

हो मितु आई जास्त तुझी वाट बघत आहे नवीन सून तू तिची तिच्या मैत्रिणी ना तुला बघायचे आहे. आई त्यांच्या समोर तुझ्या बद्दल खूप कौतुकाने बोलत होती. माझी नवीन सून हुशार देखणी आहे पण चांगला जॉब ही करतेय. अस सांगत होती.

मितु ला आठवले लग्न मग सत्य नारायण पूजा याने मितु खूप दमली होती तेव्हा संध्याकाळी पूजा झाल्यावर आई नी तिला आराम करायला सांगितले. शेजारच्या बायका मितु ला बघायला आल्या तेव्हा आई म्हणाल्या होत्या की मितु दमली आहे आता तिला आरामाची गरज आहे तुम्ही उद्या या तिला भेटायला.तेव्हा मीतूला आईंचे बोलणे ऐकून किती छान वाटले होते खरच आपलेच चुकले आपण त्यांना समजून घेण्यात आणि पारखण्यास वेळ दिलाच नाही. त्यांच्या सोबत राहिलोच नाही.

बोल ना मितु का अजून रागवली आहेस माझ्यावर रोहन ने पुन्हा विचारले.

नाही रोहन नाही रागवले मला सांग तू कधी येतो मला आपल्या घरी न्यायला? हसतच मितु म्हणाली.

आताच चल जाऊ आपल्या घरी म्हणत रोहन मितु चा हात पकडून उभा राहिला. दोघे घरी आले.

अरे रोहन आणि मितु तुम्ही एकत्र कसे काय पुन्हा काही भांडण झाले का.? घरात येताच बाबानी विचारले.

मितु बर झाले तू आलीस तो मुलगा ही येतोय आता लगेच. वनिता मुद्दाम हुन बोलली.

आई बास ना आता कोण कुठला तो मुलगा मला कोणी दुसरा नको आहे . मला माझा रोहन च प्रिय आहे आणि सातजन्म हाच नवरा म्हणून हवा आहे.

ओहह मग मितु समजले ना तुला की लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाही . थोडे एकमेकांना समजून घेऊन तडजोड करत संसार करायचा असतो त्यातच खरी गंमत असते. प्रेम ही असते.

हो आई मला पटले आहे ते आणि लवकरात लवकर मला माझ्या घरी जायचे आहे म्हणून रोहन मला घ्यायला आला आहे.

मितु पण त्या मुलाला काय सांगू मी आता.

खड्यात जाऊ दे त्याला ,तू सांग काय ते

तशी वनिता हसत म्हणाली,मितु असा कोणी मुलगा नव्हातच कधी पण तुझ्या मनातली रोहन बद्दलची अढी काढायला मी तो खोटा प्लॅन बनवला आणि मी जिंकले.

आई तू पण ना ..अस बोलून मितु आई च्या गळ्यात पडली.

मितु तु रोहन सोबत सुखात आनंदात रहावे इतकीच आमची इच्छा आहे ग. लग्न हे कधीच एकतर्फी नसते आणि ते टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही दोघांची असते. तुम्ही मुल आप आपल्या संसारात सुखी आहात या पेक्षा अधिक सुखाचे काय असू शकते. आई वडिलांना आपल्या मुलांचं सुख हवं असते बस्स तुम्ही आनंदात रहा यालाच तर सुख म्हणतात ना. आपली लेक आनंदाने सुखाने सासरी राहते हेच ते सुख असत ग आम्हा आई वडिलांना .

मितु रोहन आई बाबांच्या पाया पडून घरी जायला निघाले. रोहन आमची लाडकी जरा हट्टी आहे मितु तिला सांभाळून घे.

हो आई अजिबात काळजी नका करू. रोहन म्हणाला आणि दोघे घरा बाहेर पडले. आपल्या लेकीला आनंदाने जाताना बघून वनिताने मन सुखावत होते.


समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama