Author Sangieta Devkar

Drama Romance

3  

Author Sangieta Devkar

Drama Romance

सुख म्हणजे नक्की काय - भाग 3

सुख म्हणजे नक्की काय - भाग 3

2 mins
216


आई ,मी भेटून तुम्हाला सांगतो सगळं . रोहन म्हणाला.मितु फोन घे रोहन चा आहे.

मितु थोडं काही रोहन शी बोलली आणि फोन वनिता कडे दिला.


मितु तू काय ठरवले आहेस रोहन बाबतीत? नेमके काय झाले तुमच्यात सांगणार आहेस का?

आई रोहन सोबत मी नाही राहू शकत. लग्ना आधी तो माझ्या बाबतीत पझेसिव्ह होता पण आता ही मी माझ्या मित्रां बद्दल बोललेलं त्याला आवडत नाही. छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडत असतो. हनीमुन कसला तिथे पण त्याने मला त्याच्या घरी कसे राहायचे,कसे जुळवून घ्यायचे याचेच ट्रेनिंग दिले. आता लग्न झाले म्हणून मी माझे जुने मित्र सोडून द्यायचे का?परवा फोन वर ही असच म्हणाला,की तुला थोडं ऍडजेस्ट करून घ्यावे लागेल. समजून घ्यायला हवे.

मितु च्या बोलण्या वरून वनिता ला इतके समजले की रोहन ला हे लग्न तोडायचे नाही आहे. आता आपल्या हट्टी मुलीला कसे समजवायचे आणि सासरी नांदायला पाठवायचे याचा विचार वनिता करू लागली.

ठीक आहे मितु तुला जो निर्णय घ्यायचा तो तू घे. आम्ही तुझ्या पाठिशी आहोत.


आई मला हे लग्न नको आहे मला डिओर्स हवा.

मितु तुला हवे तसे करण्याचाच अधिकार आम्ही नेहमीच तुला दिला आहे. आता ही तुझ्या मना सारख होईल.पण ऐक एकदा लग्न झालं की मुलीला सासरीच राहावं लागतं. तिथल्या माणसांमध्ये मिळून मिसळून त्यांना आपलंसं करावं लागतं. प्रत्येक विवाहित मुलीला या संक्रमणातून जावंच लागतं.’’

रोहन तू आम्हाला आमच्या मुला सारखा आहेस मी मितु ची बाजू ऐकली तू तुझी बाजू सांग. नेमके काय खटकले तुमच्यात? वनिता रोहन ला भेटायला आली होती.

आई , माझ्या घरी अजून ही थोडं जूनं वातावरण आहे. मी मितुला इतकच सांगितले की आई आणि आजी चा मान ठेव. त्यांना विचारून काही गोष्टी करत जा. वहिनी ला कामात थोडी मदत करत जा. जेमतेम आठ दिवसच मितु सासरी राहिली तिला लगेच पार्टीला जायचे होते पण आमच्या कडे पार्टी कल्चर नाही. मग त्या वरून चिडचिड . आई मी यूएस ला जाण्यासाठी प्रयत्न करत आहे फक्त थोडे दिवस मितु ला सांभाळून घे म्हणालो नंतर मग तुला हवे तसे रहा अस ही बोललो आहे मी पण यात कसला तिला टॉर्चर केला मी सांगा? सगळ्याशी जुळवून घेऊन रहा यात तिला कसला कमी पणा वाटतो ? माझी वहिनी ही उच्चशिक्षित आहे पण घरच सगळं सांभाळून ती ही इन्शोरन्स चे काम करते आहेच ना! पण मितु ला काही ही पटत नाही.


(क्रमशः)  


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama