Author Sangieta Devkar

Drama Romance

3  

Author Sangieta Devkar

Drama Romance

सुख म्हणजे नक्की काय? (भाग 2)

सुख म्हणजे नक्की काय? (भाग 2)

2 mins
176


प्रत्येक गोष्ट करण्या आधी आई बाबांच्या कानावर घालणे बस्स, मुलं आणि सुना यांच्या कडून एवढीच त्यांची अपेक्षा होती. या उलट मैथिली मॉडर्न घरात वाढलेली आणि हट्टी स्वभावाची होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी च मैथिली घरी आली ते ही आपली बॅग घेऊनच. "अरे ,मितु तू अचानक कशी आणि हनिमून हुन कधी आलीस? वनिता ने विचारले.

आई ,प्लिज आता मला काही ही विचारू नकोस.

अग पण अशी सकाळीच कशी काय आलीस ? तू इथे आलीस ते रोहन ला माहीत आहे का?

हो त्याला माहित आहे रादर मी एयरपोर्ट वरूनच इकडे आली आणि रोहन गेला त्याच्या घरी.

मितु चा आवाज विकून विनायकराव बाहेर आले,मितु तू आज सकाळी सकाळीच ,बरी आहेस ना?

बाबा मी ठीक आहे पण मी आता रोहन सोबत राहणार नाही आहे.

काय ? काय बोलतेस मितु सोबत राहणार नाहीस म्हणजे?  विनायकराव

आई बाबा मी आणि रोहन एकमेकांना सुटेबल नाही आहोत.

मितु काय बोलतेस हे,सुटेबल नाही आहात म्हणजे? पण तुम्ही तर लव मॅरेज केले ना!. मग लग्ना आधी नाही समजले तुम्हाला की तुम्ही सुटेबल नाही आहात ते . वनिता रागात बोलली.

आई तेव्हा नाही समजले कारण प्रेमात आंधळे होतो पण आता माझे डोळे उघडले.

मितु नेमके काय म्हणायचे आहे तुला? सुटेबल नाही म्हणजे काय सांग.

आई रोहन मला समजूनच घेत नाही. त्याच्या माझ्या कडून खूप अपेक्षा आहेत . पण माझ्या ही काही इच्छा अपेक्षा आहेत हे त्याला समजतच नाही.

मितु तुम्हा आजच्या मुलांचे लॉजिक काही आम्हाला समजत नाही. लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाही ,मनात आला तेव्हा मांडला आणि मन भरले की मोडला.

वनिता तू शान्त हो आधी ,मीतूला जरा वेळ निवांत तर बसू दे चहा नाष्टा करू दे विनायकराव बोलले.

मितु चहा नाष्टा करून तिच्या रूम मध्ये गेली.

वनिता थोडे दिवस मितु ला काही ही बोलू नकोस. ती स्वहता हुन सांगेल सगळं ..

आता तर म्हणाली ना आम्ही सुटेबल नाही आहोत . अजून काय सांगणार? मी बघेन काय करायचे वनिता इतकच बोलली.

रोहन चा कॉल आला वनिता ला. मितु चा फोन नाही लागत म्हणाला. वनिता ने त्याला विचारले की कशा वरून भांडण झाले तुमचे? मितु तर नीट काही सांगतच नाही आहे. आई ,मी भेटून तुम्हाला सांगतो सगळं . रोहन म्हणाला.मितु फोन घे रोहन चा आहे.

मितु थोडं काही रोहन शी बोलली आणि फोन वनिता कडे दिला.


क्रमश


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama