सुख म्हणजे नक्की काय? (भाग 1)
सुख म्हणजे नक्की काय? (भाग 1)
वनिता घर अगदी सून सून वाटते बघ मैथिली नाही तर" विनायक राव म्हणाले.
हो ना मितू च लग्न होऊन वीस दिवस तर झाले पण अजून तिची सवय नाही सुटली. मला पण चुकल्या चुकल्या सारख वाटत आहे.
पण सगळं तिच्या मनासारखं झालं. मनासारखा जोडीदार,लग्न आता तर काय फिरायला ही गेलेत,उटी ला. विनायकराव.
हो सगळं छान होऊ दे. रोहन च्या घरचे लोक ही स्वभावाने चांगली आहेत. आपली मितू च जरा जास्त हट्टी आहे. कस निभावून घेईल देव जाणे.
वनिता नको काळजी करू एकदा का जबाबदारी अंगावर पडली की मुलींना सगळं जमते.
हा ते तर आहेच पण मितु ने संयमाने राहायला हवे. जरा अल्लड पणा आता कमी करायला हवा. वनिता लेकी च्या काळजी पोटी बोलत होती. एकुलती एक मुलगी होती त्यांची मैथिली. सॉफ्टवेअर मध्ये शिक्षण मग जॉब आणि रोहन सोबत रिलेशनशिप मध्ये होती म्हणून लग्न त्याच्याशीच करणार म्हणाली. रोहन च्या घरच्यांना म्हणजे त्याचे आई बाबा , आजी मोठा भाऊ,वहिनी असा त्याचा परिवार होता. सगळ्याना वनिता ने घरी यायचे आमंत्रण दिले. मुलगा मुलगी एकमेकां वर प्रेम करतात तर लग्न लावून देऊ अस ठरले. विनायक राव म्हणाले,की जस मुलांना हवे तसे लग्न आम्ही लावून देऊ फक्त तुमच्या अपेक्षा काय तेवढं सांगा. पण रोहन ची फॅमिली साधारण मध्यम वर्गीय होती. बाबा रिटायर्ड होते. मोठा भाऊ जॉब करत होता आणि वहिनी घरात होती. ती ही उच्चशिक्षित होती पण तिनेच घरी राहायचा निर्णय घेतला होता पण घरून ती लाईफ इन्शोरन्स चे काम ही पाहत होती. त्यांच्या काही जास्त अपेक्षा नवहत्या.
आपल्या मुलीला चांगले घर मिळाले याचा आनंद वनिता ला झाला. सासरचे लोक मितु ला सांभाळून घेतील हा विश्वास वाटला. अगदी सांग्रसंगीत आणि धुमधडाक्यात मैथिली आणि रोहन चे लग्न लावून दिले. वनिता ही शिकलेली आणि आजच्या काळा सोबत चालणारी स्त्री होती. त्यामुळे मितु ची ती आई कमी मैत्रीण जास्त वाटत असे. लग्न झाल्यावर विनायक रावांनीच रोहन आणि मैथिली ला उटी ची तिकिटे आणि हॉटेल बुकिंग करून दिले होते. एकुलत्या एक मुलीच्या लग्नात त्यांनी कसलीच कसर ठेवली नवहती.
रोहन आणि मितु उटी ला जाऊन आठ दहा दिवस झाले होते. त्या नंतर दोघे आप आपल्या जॉब वर जाईन होणार होते. मितु ला सासरी जॉब करायची परवानगी मिळाली होती. त्यांना ही मुलांचेच सुख हवे होते. कशाला ही त्यांची आडकाठी नसे फक्त इतकेच असायचे की घरातले सणवार,आला गेला पाहुणा सुनांनी या कडे लक्ष द्यावे आणि प्रत्येक गोष्ट करण्या आधी आई बाबांच्या कानावर घालणे बस्स, मुलं आणि सुना यांच्या कडून एवढीच त्यांची अपेक्षा होती. या उलट मैथिली मॉडर्न घरात वाढलेली आणि हट्टी स्वभावाची होती.
क्रमश..

