Jyoti gosavi

Classics

4.0  

Jyoti gosavi

Classics

संक्रमण

संक्रमण

2 mins
348


सूर्य एका राशीतून दुसर्‍या राशीत मध्ये प्रवेश करतो त्या घटनेला संक्रमण असे म्हटले जाते. आणि सगळ्यात मोठे महत्त्वाचे संक्रमण आपण मकर संक्रांतीला म्हणतो. त्यावेळी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात जात असतो, आणि इथून पुढे ऋतूचे संक्रमण देखील होणार असते . त्यामुळे सूर्याच्या मकर राशि मधील संक्रमणाला विशेष महत्व आहे. संक्रमण या शब्दाचा अर्थ स्थित्यंतर किंवा स्थलांतर असा होतो . सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत करतो त्याला स्थलांतर असे येईल म्हटले जाते आत्तापर्यंत सर्वांच्या लेखांमध्ये इतर सर्व गोष्टींना स्पर्श केलेला आहे फक्त त्यामध्ये अजून एक ऐकलेला शब्द म्हणजे संक्रमण शिबीर या विषयाला कोणी स्पर्श केलेला नाही म्हणून मी या वरतीच बोलते, संक्रमण शिबिरेही त्या त्या वेळेनुसार घटनेनुसार तात्पुरत्या स्वरूपाचा निवारा म्हणून दिलेली असतात. परंतु आपल्या देशामध्ये काश्मिरी पंडित मात्र वर्षानुवर्षे छावण्यांमध्ये किंवा संक्रमण शिबिरांमध्ये राहताहेत खरोखरी त्यांच्या भूमिकेत जाऊन विचार केला तर कधीकाळी त्यांनी काडी काडी आणून घर सजवला असेल, संसार मांडला असेल आणि अचानक ते सारं काही सोडायचं आणि कुठला तरी नव्या ठिकाणी नव्या जागी जाऊन राहायचं... जीथे कोणत्याच गोष्टीची शाश्वती नाही कोणत्याच गोष्टीला भविष्य नाही अशा गोष्टी आहेत पण शेवटी जगण्यासाठी माणूस परिस्थितीपुढे हतबल होतो किंवा परिस्थितीशी तडजोड करतो काश्मिरी पंडित आणि तशीच तडजोड केलेले आहे वास्तविक त्यांच्या शिबिरांमध्ये संक्रमण शिबिरांमध्ये अतिशय वाईट परिस्थिती आहे नरक यातना आहेत तरीही ते त्या भोगत तिथे राहत आहेत.

सध्या अजून एक प्रकार म्हणजे कोरोनासंक्रमण इकडून तिकडे सर्वांकडे स्थलांतर करीत राहतो आणि प्रत्येक व्यक्तीच्या शरीरानुसार स्वतःमध्ये देखील संक्रमन करत स्वतःमध्ये देखील बदल करतो.

बाकी संक्रमण सर्वांनी सांगितलेलेच आहे. निसर्गामध्ये घडतं माणसाच्या शरीरामध्ये घडतं, इतक काय माणसाच्या मनामध्ये देखील संक्रमण करतो. शरीरामधले संक्रमण म्हणजे बाल्यावस्थेपासून वृद्धावस्थेत पर्यंत येणारा बदल आणि मनाच संक्रमण देखील तसंच असतं. एखाद्या गोष्टीबाबत लहानपणी आपल्याला जी उत्कटता वाटत असते, ती मोठी झाल्यावर वाटेल तसं नसतं. मोठे झाल्यावर त्या वस्तू विषयक आपल्या कल्पना बदललेल्या असतात. ते देखील एक प्रकारचे मानसिक संक्रमणाच आहे. "नेमेचि येतो मग पावसाळा" उन्हाळा हिवाळा पुन्हा पावसाळा हे ऋतुचक्र म्हणजे निसर्गाचे संक्रमण. जुन काहीतरी टाकल्याशिवाय, सोडल्याशिवाय नव्याच आगमन होत नाही. झाडाची जुनी पाने गळाल्या शिवाय नवीन पालवी फुटत नाही. निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीला संक्रमण असतं. अगदी छोटे छोटे दगड धोंडे सुद्धा काही वर्षांमध्ये आपले आकार आणि जागा बदलतात. तिथपासून ते आता पृथ्वीच्या परिवलन आत्ता देखील संक्रमण झालेले आहे आणि पृथ्वीचा वेग चार मिनिटांनी वाढलेला आहे तर असे हे संक्रमण साऱ्या चराचरामध्ये दिसून येते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics