STORYMIRROR

Shubhangi Mali

Action Fantasy

2  

Shubhangi Mali

Action Fantasy

संकल्पासाठी संकल्प

संकल्पासाठी संकल्प

1 min
67

नवीन वर्ष जवळ आले;गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी काहीतरी नवीन करण्याचा संकल्प मनात येऊ लागला आणि या वर्षी कोणता चांगला संकल्प करता येईल यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तत्क्षणी आठवले की आपण मागील वर्षी देखील कोणता तरी संकल्प केला होता परंतु जसजसे वर्ष संपत आले तसा त्याचा विसरही पडला ज्याप्रमाणे दरवर्षी आपण केलेला संकल्प ठरवतो तो पूर्णत्वाकडे नेण्यासाठी किती गांभीर्याने त्याकडे लक्ष दिले जाते हा प्रश्न निर्माण झाला; आपण केलेला संकल्प परिवार,मित्र-मैत्रिणी, सगळ्यांना मोठ्या कौतुकाने सांगायला विसरत नाही; कारण केलेल्या संकल्पा विषयी झालेले कौतुकाचे प्रशंसक शब्द नेहमी आवडत असतात;ठरवलेले चांगले काम कृतीतून समोर आले व त्याचा पूर्ण करण्यासाठीचा खटाटोप,प्रयत्नाला आलेले यश हे आपण केलेल्या उत्तम कार्याचा दाखला असू शकतो. असे म्हणता येईल. परंतु संकल्प मार्गी लावण्यासाठी तो पूर्णत्वाकड नेण्यासाठीे रोजनिशीच्या दैनंदिन कामाबरोबर त्याचाही समावेश व्हायला हवा; आपले संकल्प हे उत्तम आरोग्य,कुटुंब,समाज, शिक्षण,व्यक्तिमत्व विकास, आवडी-निवडी,छंद जोपासणे,स्वतःची बलस्थाने ओळखून त्यांना चालना देणे;यांपेक्षा अजुन काय वेगळे असू शकतात. यातील प्रत्येक घटक बरकाईने बघुन आत्मपरीक्षण करून योग्य संकल्प निवडून त्यासाठी आपण किती पुरुन उरतो हे ही तितकेच महत्वाचे; परंतु हाती घेतलेले कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्या इतर जबबदाऱ्या देखिल तितक्याच कौशल्याने आपल्याला पार पडता यायला हव्यात नाहीतर एका कामाच्या पूर्णत्वासाठी दुसऱ्या कामाला अडथळा नको; खूप काही भाराभर नोंद करण्यापेक्षा मोजके पण प्रयत्नशील असे असावेत परिपूर्ण संकल्प...

  आता मात्र संकल्प निवडायला उशीर नको, आत्मभान ठेवून नवीन वर्षाच्या नव्या संकल्पासाठी केलेला संकल्प पूर्ण करुयात नवीन संकल्पना घेऊन.एक पाऊल असेही पूर्णत्वाकडे...


Rate this content
Log in

Similar marathi story from Action