Shubhangi Mali

Inspirational Others

3.9  

Shubhangi Mali

Inspirational Others

संस्कार शब्दांचे

संस्कार शब्दांचे

1 min
283


  ध्वनी ही भाषेची प्राथमिक अवस्था मानली जाते.म्हणून याच ध्वनीच्या जूळणीने शब्द तयार होत असतात त्या तयार पदांच्या विशिष्ट रचनांमधून वाक्य तयार होतात. भाषाविज्ञान भाषाभ्यास जितका बारीक व काटेकोर अभ्यासला तितका तो कोडयाप्रमाणे उलगडत जातो.भाषा निर्मितीची जाणीव आपल्याला त्यातून अलगदपणे होत असते.

  मूर्तिकाराला पाशाण हे मूलद्रव्य लाभते त्यातून तो सुरेख मूर्ती घडवतो. चित्रकाराला रंगांचे मूलद्रव्य लाभल्यानंतर चित्रकार उत्कृष्ट कलाकृती ची किमया निर्माण करतो. एक साहित्यिकदेखील शब्दांचे मूलद्रव्य वापरून शब्दांच्या मदतीने स्वतःच्या भावविश्वात उतरून भावनांना हळूवारपने वेचून,अलगद टिपुन त्यांची मांडणी लिखानात करत असतो.त्या शब्दांच्या मदतीने प्रभावी आविष्कार आपल्या समोर येतात.

  शब्दांची किमया शब्दांचे संस्कार हे जीवन घडवतात.असे शब्द नेहमी स्वतःकडे सुगंधाची जादू ठेवतात.जेथे जातील तेथिल वातावरण ते बदलतात. व्याख्यानात ऐकतांना कधी मनाला लागलेल्या शब्दातून जीवनाला अचानक कलाटनी मिळते. या शब्दांनी वाल्ह्याचा वाल्मिकी झाला.

   काही शब्द हे रुतणाऱ्या काट्याप्रमाणे असतात जाताना सुद्धा खोलवर जखम व घाव करून जातात. अशा शब्दांपासून कधीकधी लांबच राहिलेले बरे असे वाटते.

  काही शब्द संस्कार नवनिर्मितीसाठी जादू करतात. एखाद्याचे जीवनही उल्हासीत होते.असेच विखुरलेले शब्द असतात ज्याने एकेक शब्द वेचून या शब्दरूपी मोत्याची माळ स्वतःजवळ बनवून ठेवली.त्याला हे अनमोल आभूषण प्राप्त होते.कधी कधी तर या शब्दांना कंठा मध्ये दडवून ठेवले जाते प्रसंगी त्यांना मोकळी वाट मिळते. या शब्दांच्या संपत्तीला जवळ बाळगनारा नक्कीच 'शब्दवान' असेल.प्रत्यक्ष सरस्वती मातेच्या आशीर्वादाने ज्ञानाच्या  

सोबतीने शब्दांचे द्वार खुले होतात.त्यात आपले स्वागत होते.

    एकदा या शब्दांच्या विश्वात प्रवेश मिळाला की या शब्द संपत्तीने समृद्धता मिळते.

 म्हणून

 शब्द भिजवावे

   भावनेच्या डोहात,

      शब्द बुडवावे

        कल्पनेच्या शाईत.

        शब्द निवडावे

       मोत्याच्या सागरात.

     शब्द वापरावे

   दृढ संस्कारात......


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational