उंच माझा झोका
उंच माझा झोका
काळ बदलत चालला त्याप्रमाणे आजही स्त्रीने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रांमध्ये तिची कामगिरी बजावली परंतु स्त्रीला तिचे स्थान खरोखर मिळाले आहे.. का? हा चर्चेचा विषय ठरतो कारण एका बाजूला बघितले तर स्री प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली कामगिरी बजावत आहे ..परंतु दुसऱ्या बाजूला बघितले तर स्त्रीला हवा असा सन्मान हवी तशी वागणूक दिली जात असते का? तर उत्तर नाहीच मिळते. तिच्यावर होणारे अत्याचार हे विचार करायला भाग पडतात..तिला दिली जाणारी वागणूक ही निंदनीय आहे..यांमध्ये तिचे होणारे मानसिक व् शरीरिक शोषण,अन्याय ,अत्याचार ती नेहमी निमूटपणे सहन करत असते.त्यामुळे तिथेच तिचे स्थान दुबळे होत जाते. हे सहन करण्यापेक्षा जर तिने स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले तर नक्कीच कुठे ना कुठे प्रयत्नांना यश मिळू शकते परंतु त्यासाठी करायला हवी समाज जागृती व् योग्य मार्गदर्शन .तिची आजची अवस्था अशी झाली आहे की पंख असून ही उडता येत नाही ,इच्छा असून उंच झोका घेता येत नाही याच ठिकाणी तिच्या स्वप्नांची खरी घुसमट होत असते..
तिच्या या अवस्थेला काहीसे आपण व् काहीशी ती स्वतः पण जबाबदार आहे... म्हणून आता गरज आहे तिच्या *पंखांना बळ देण्याची व् तिला स्वतःच्या बळावर उंच झोका घेण्याची.* त्यासाठी खूप तयारी व् हिम्मत स्वतः ठेवावी लागेल परंतु त्याकरिता तिला योग्य शिक्षण व् योग्य मार्गदर्शन मिळा यायला हवे.. असे घडले तर नक्कीच स्त्रीला सक्षम आणि स्वबळावर उभे राहण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही व् येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यास ती तयार होऊ शकेल.. सामाजिक बांधिलकी जपून प्रत्येक स्रीला प्रत्येक मुलीला तिच्या सन्माना'साठी शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे.. प्रत्येक मुलीला शिक्षण देणे देखील गरजेचे आहे..तेव्हाच भारतीय मुलगी,भारतीय नारी ही अजून एक सक्षम *नारीशक्ती*समजली जाईल..आणि मग त्या वेळी त्यावेळी प्रत्येक भारतीय मुलगी भारतीय नारी अभिमानाने म्हणेल आता भिडू द्या गगनाला *उंच माझा झोका........*
