Shubhangi Mali

Inspirational

2  

Shubhangi Mali

Inspirational

खतपाणी

खतपाणी

2 mins
124


  आज सकाळी गवती चहाच्या कुंडीत पाणी घलताना मनात विचार आला ते लावलेल चहाच कंद अखेर आता बहरल..अस म्हणत मी सुटकेचा श्वास सोडला..पुन्हा मनात विचार आला..पण त्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली आहे हे विसरून कस चालेल.. कितीतरी वेळा आणून लावलेले कंद हे जगायला तयारच नव्हतं....काही केलं तरी या वेळी मला दुसरे कंद आणायचे नव्हते.. आता याकडेच नीट लक्ष द्यायला हव अस मी ठरवल.. आणि यावेळी त्याची पूर्ण काळजी घेतली.त्याला खतपाणी वेळोवेळी दिले अगदी गावाला गेली तरी पाणी घालण्यास शेजारी सांगून गेली...उन्हाने ते कोमेजू नये म्हणून एकदम पाणी न टाकता पाण्याच्या भरलेल्या बाटलीला छेद करून ती कुंडित उलटी ठेवली... उन्हाळा सरे पर्यंत मात्र मी कुंडिला असेच पाणी देत राहिली .... आणि आश्चर्य म्हणजे यावेळी खरोखर ते कंद मोठ होऊ लागल...आता कुठे ते वार्‍यावर झोके घेऊ लागलं..त्यामागे चहा व् काढा करण्याठी ताजी गवती चहा मला रोज मिळणार होती हा माझा एक स्वार्थ नक्की होता...

पण त्यासाठी मी माझी जिद्द मात्र सोडली नव्हती...


   असाच काहीसा विचार माझ्या मनात मुलांबाबत आला आजचे मूल सांभाळ ने म्हणजे रोपटे च वाढवणे ..मूल लहानाचे मोठे करने सोपे परंतु त्यासाठी त्याला योग्य वातावरण देणे,संस्कार देणे हे प्रत्येक पालकापुढे मोठे आजच्या काळात आव्हान आहे. त्याला कारण कुटुंब पद्धती देखिल आहे मनात विचार आले की साधे रोपटे वाढवने हे सोपे नाही तर सध्याच्या काळात प्रत्येक मुलाला घरात योग्य वातावरण देऊन सांभाळ ने हे प्रत्येक पालकाला किती अवघड जात आहे...परंतु पालकांनी स्वतः संयम ठेऊन मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे... गंभीर समस्या व् त्यावर चर्चा मुलांसमोर न केलेलीच बरी.. कारण मूल यावर आपल्याशी बोलत नसली तरी त्यांच्या मनावर नक्कीच या गोष्टींचा परिणाम होत असतो व त्यामुळे त्यांची मानसिकताही खालावत असते...

  मी साहित्य, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील भाषणे ऐकत असते आणि त्यामधील दिलेल्या मान्यवरांचे मनाला भावलेले वाक्य मी लक्षात ठेवत असते असेच एका कार्यक्रमातील लक्षात ठेवलेले वाक्य असे की *आपण मुलांचे पालक आहोत मालक नाहीत* खरोखर या वाक्याचा मतितार्थ ज्या पालकाला कळाला तर... नक्कीच तो पालक आपल्या बालकाशी कसा वागेल हे त्याला सांगण्याची गरज नाही


तसेच आमच्या क्लासच्या स्नेहसंमेलनासाठी नाशिकचे मानसोपचार तज्ञ डॉक्टर श्री जयंत ढाके सर यांना आम्ही आमंत्रित केले होते व त्यावेळी देखील त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं तेही अजून माझ्या लक्षात आहे ते वाक्य म्हणजेच *जगातील प्रत्येक मूल हे त्याच्या पालकांसाठी गोड गिफ्ट आहे* ज्याप्रमाणे आपण गिफ्ट जपून ठेवतो सांभाळतो त्याप्रमाणे तुमचं ते बालक तुम्ही सांभाळा...म्हणजेच बालक जसे आहे तसे त्याचा स्वीकार करा त्याची तुलना इतर मुलांशी करू नका..असे अनेक अर्थ हे ओळीतुन आपण समजू शकतो..


या ही ओळीचा अर्थ पालकाने समजून घेतला तर...मूल संभाळन हे पालकासाठी फार अवघड जाणार नाही... विषय तसा गंभीर पण आहे.. विस्तारित पण लिहिले तरी कमीच् आहे...समजदार को इशारा काफी होता है.... असे म्हणून लिहिणे थांबवते....फक्त माझी प्रत्येक पालकाला विनंती आहे की बालकाला समजून घ्या.. त्याला बहरु दया..उमलु दया..खळखळु दया...मात्र आपण लावलेल्या रोपटयाला खतपाणी ही मर्यादितच द्या.....✍️


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational