Shubhangi Mali

Others

1.6  

Shubhangi Mali

Others

लेखकाची समाजसेवा

लेखकाची समाजसेवा

2 mins
106


   आदिम काळापासून निरीक्षण केले तर लक्षात येते कि, समाजातील अज्ञान, अविचार,अनिष्ट रूढी,परंपरा, गुलामगिरी,अत्याचार यांनी त्या काळाची स्थिती जखडली होती...यांवर सामाजिक प्रबोधन करण्यासाठी साहित्य लेखनाचा फार मोठा वाटा आहे यामध्ये बघितले तर राजे-महाराजांच्या काळात संतांची कामगिरी अतिशय महत्वपूर्ण होती ..यामध्ये संतांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्य केले..विविध संत महात्मे आपले विचार लेखनातून मांडत....संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थदीपिका...संत कबीराचे दोहे आज ही प्रचलित आहेत संत एकनाथ यांची भारुड...संत तुकारामांचे अभंगांचा आजही उल्लेख केला जातो तसेच शीख पवित्र ग्रंथ गुरुग्रंथसाहेब यामध्ये संत नामदेवांच्या ओळींचा समावेश करण्यात आलेला आहे...वारकरी संप्रदायाच्या पताका पंजाबपर्यंत पोहोचवण्यासाठी संत नामदेवांनी विशेषलेखन कार्य केले होते.वैदिक काळात देखील ऋषिमुनींनी चार वेदांमध्ये विविध प्रकारे आपले ज्ञान मांडण्याचा प्रयत्न केला होता....यामध्ये अथर्ववेदात राजाने राज्य कसे करावे याचाही विशेष उल्लेख केलेला दिसून येतो...

  इतकेच नव्हे तर ब्रिटिशकालीन राजवटीमध्ये विविध समाज सुधारकांनी विचारांचा प्रसार प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रसार माध्यमांचा वापर हा एक 'शस्त्र' म्हणून केला होता.....

  

तत्कालीन लिखाणाचा प्रवास आजवर चालत आलेला असून कालांतराने लिखाणाचे स्वरूप बदलत गेले ...तरी त्यामागे प्रत्येक लिखाणाचा उद्देश मात्र तोच राहिला आहे.... माणूस अज्ञाना कडून ज्ञाना पर्यंत पोहोचला... विविध क्षेत्रात क्रांती केली ..त्याप्रमाणे विज्ञान युगामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असताना बऱ्याच समस्या तो मागे सोडत राहिला...आणि पुन्हा लेखकाला या समस्या सोडविण्यासाठी...सामाजिक जागृती निर्माण करण्याची... विविध विषयात आपले विचार समाजापुढे मांडण्याची गरज निर्माण झाली....या विषयांमध्ये बदलत्या परिस्थितीप्रमाणे स्त्रीभ्रूणहत्या,वृक्षतोड, विज्ञान शाप की वरदान,निसर्गसंवर्धन,आरोग्याचेजतन,मानसिक संतुलन यांसारख्या विविध समस्या...या भेडसावणाऱ्या आहेत जितकी प्रगती माणसाने केली परिणाम मात्र उलटच होत गेले...इतिहास बघता प्रगती तितक्याच समस्या...कमी न होता आणखीनच वाढत राहिल्या..


   सांगायचा उद्देश हाच की आजही लेखक विविध माध्यमातून आपले विचार जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो..कधी कथा, कविता,लेख,कादंबरी या माध्यमांतून तो आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करत असतो..या मागचा...प्रसिद्धी हा उद्देश कधीही नसतो... आपले विचार लोकांना कळावे यासाठी मात्र तो नेहमी झटत असतो...आपले विचार किती चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचतील व लोकांना ते समजतील या साठी सोपी पण आकर्षित अशी भाषा शैली वापरण्या तो नेहमी प्रयत्नशील असतो... कधीकधी प्रोत्साहनपर वाचक वर्ग,विविध संस्था,प्रसार माध्यमांकडून दाद मिळावी म्हणून लेखकांना पारितोषिके व पुरस्कार देखील दिले जात असतात...त्या मागे प्रसिद्धी हा हेतू कधीही कोणत्याही लेखकाचा नसतो..आपले मांडलेले विचार हे खरोखर वाचकाला पटले आहेत किंवा मी लिहिलेले लेखनाची भाषा ही लोकांना समजते यात खरा आनंद तो नेहमी शोधत असतो...


त्यातच लेखकाला नवीन लिहिण्यासाठी उभारी येत असते...अशाच नवनवीन समस्यांकडे दूरदृष्टी टाकून त्या समस्यांचे आकलन करून लेख लिहण्याचा प्रयत्न तो करत असतो...लेखनाला मिळालेल्या कौतुकाच्या थापेवर....पुन्हा उभारीणे तो आपल्या कामाला लागत असतो...त्यावेळी त्याची चालणारी लेखणी,विचार ही सतत न थकता....न थांबता चालत असते....रोजच्या नवीन समस्यांना बघता समाज जागृती करण्याचे हे काम... देखील एका समाज कार्याचा भाग म्हणजे समाज सेवाच... ही सेवा घडविण्याचा भाग... यापेक्षा कमी असू शकत नाहीत नाही ....म्हणूनच लेखकाचा लेखन प्रवास हा समाजसेवाच असे म्हणण्यात वावगे ठरणार नाही...


Rate this content
Log in