अस्तित्व
अस्तित्व
समस्त सृष्टी, आकाशातील भिरभिरणारी पक्षी, माती,डोंगर,पठारे ,समुद्र,जलचर, कीटक या सर्वांकडे निरखून बघितले तर प्रत्येक वस्तूचे अस्तित्व ठरलेले आहे निसर्गाने त्या वस्तूचे अस्तित्व निश्चित केले आहे...
अशाच अस्तित्वाचा मनुष्यही एक भाग असतो असे वाटते...जीवन जगताना मनुष्याला बऱ्याच सजीव निर्जीव वस्तूंची गरज असते ही गरज एक सवय बनते... त्यातून रोजच्या दैनंदिन जीवनात एखादी वस्तू किंवा व्यक्ती ही जीवनाचा अविभाज्य भाग होते ...तिचे नसणे ही मनाला कधी न पटणारे असते... मग ती गाडी, घर,मिळालेल्या भेटवस्तू असेल, म्हणून माणसाचे माणसाशी असलेले नाते असेल..
एक वेळ वस्तू गेली तर दुसरी मिळवता येते परंतु ज्यावेळी समाजात माणसाची रक्ताची किंवा इतर नाती तयार होतात त्यावेळी व्यक्ती व्यक्तीत भाऊ-बहीण,पती-पत्नी आई-वडील ,आजी-आजोबा,मित्र-मैत्रीण, प्रियकर-प्रेयसी यांसारखे बरेच नाते व त्यांचे उंचावलेले अस्तित्व असते.... नात्या नात्यांची वीण इतकी घट्ट होते की त्या व्यक्तीचे व त्याचे असने हे नेहमीच मनाला प्रेमळ ऊब देणारे वीसावणारे असते.... नात्यांची हवी असलेली ऊब, हवीहवीशी, प्रेमळ,शीतल वाटत असते... ज्यावेळी नाते दुरावतात... त्यावेळी मात्र प्रखर उन्हाचे चटके बसू लागतात... कोणाच्या कोमल बाल मनावर,तारुण्यावर, वृद्धापकाळात त्यांच्या अस्तित्वाचे ठसे हे कायम ठेवून जातात...
क्षणार्धात नाहीसा झालेले
सगळे प्रेमाच्या बांधिलकीतून उमलणारी ते...नाजुकसे नाते.. क्षणार्धात विसावते.....त्यावेळी नात्याची तेवणारी ज्योत ही हळूच मंदावते व दाही दिशांना सर्वत्र अंधार मात्र दाटून येतो... जन्म मृत्यू अटळ आहे हे माहिती असताना ज्या वेळी जीवनाचा हिस्सा असलेले नाते दुरावते मात्र हे एक सत्य कधीही मानले जात नाही..
निसर्गसृष्टीत शोधणारी दृष्टी...
बहरलेले वृक्ष,
मंद वाहणारा झरा,
पाखरांचा किलबिलाट,
धरतीवर अंकुरलेले बिज,
यांनाच आता आपल्या माणसाचे अस्तित्व विचारावे वाटते....
