Supriya Jadhav

Comedy

4.8  

Supriya Jadhav

Comedy

'संकल्पाची ऐशी - तैशी'

'संकल्पाची ऐशी - तैशी'

4 mins
1.3K


"अगं साक्षी, नवीन वर्ष सुरू होतंय आता. नव्या वर्षात काहीतरी संकल्प कर ग आता. सुट्टीत दिवसभर लोळत पडत असतेस, अन् हातात मोबाईल". " काय करायचं रिकाम्या वेळेच मगं?......साक्षी बोलली. "अगं तुझ्यासारख्या तरूण मुलीने कसे अॅक्टीव रहायला हवे, काय करायचं, काय नाही हे तु ठरवायला हवेस.अशीच आळसात पडून रहातेस, त्यामुळे तुझं वजन ही वाढलंय." साक्षीची मम्मी साक्षीला बोलत होती. "मम्मी तिच्यावर काही परिणाम होतो का?..... अगं ढब्बू मिरची,त्याच्यासाठी दृढ निश्चय करावा लागतो माझ्यासारखा." साक्षीचा दादा बोलला. "ये गप रे दादा, बघ मी पण नवीन वर्षाचा संकल्प करते की नाही... " "कर बाई कर लवकर मनावर घे" मम्मी बोलली.


     "आता माझा निर्णय पक्का झाला, मी नेटवर व्यायामाचे छोटे प्रकार शोधते बघ," साक्षी बोलली. " अगं सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉकला गेलीस तरी चालेल. रोज पंचेचाळीस मिनिटे चालली तरी पुष्कळ फरक पडेल, वजन आटोक्यात येईल आणि दिवसभर कसं फ्रेश वाटेल बघ." "हो गं मम्मा ठरवलंय मी आता लगेच लिस्ट बनवते."


   साक्षीने लिस्ट बनवली. रोज सकाळी मॉर्निंग वॉक ला जाणे, आल्यावर योगासने करणे. सुर्यनमस्कार शिकून घेणे. आणि खानपानाचे नियम लिहून घेतले. नेटबाबांनी जे -जे सांगितले त्याप्रमाणे तिने एक लिस्ट तयार केली. उत्साहात मम्मीला लिस्ट वाचून दाखवली. मम्मी खुदकन हसली अन् म्हणाली "तुझ्या खाण्यावर नियंत्रण येईल ना?..." "मम्मी काय हे मी ठरवलंय ना आता. ठरवलं की सगळं होतं ,असं तूच म्हणतेस ना? बघच आता."


     साक्षीने डायेट प्लॅन बनवला होता. सकाळी उठल्यावर लिंबू सरबत, व्यायाम झाल्यावर हेल्दी नाश्ता तर कधी स्प्राउट, दुपारच्या जेवणात दोन चपाती भाजी, एखादं फळ, मधल्या वेळेस भूक लागली तर केवळ ताक, सायंकाळी सुप, रात्रीच्या जेवणात मुगाचा डोसा किंवा खिचडी, सलाड, एखादं फळ आणि जेवण ही संध्याकाळी आठ पुर्वी.


    "अरे व्वा!लगेच मनावर घेतलं माझ्या लाडकीने. शुभस्य शिघ्रम ....उद्यापासून सुरूवात कर" मम्मी तिला म्हणाली. "हो ग मम्मी अगं नवीन वर्ष उजाडू दे तरी." "आता चांगलं काम करायला विलंब कशाला? संकल्प केलाय तर लगेच अंमलात आण. "काय हे मम्मी अगं दोनच दिवस राहिलेत नवीन वर्ष उजाडायला. मग बघ एक तारखेपासून कशी सुरुवात करते. तुम्ही सगळेच मला चिडवताय ना दाखवूनच देते तुम्हाला आता." "बरं बाई तुला हवं तेव्हा तु सूरू कर पण सुरू करच." माय लेकीचा असा संवाद रंगला होता.


 त्याचदिवशी संध्याकाळी बाजारातून ट्रॅकसुट, पॅन्ट, शूज सगळं घेऊन आली. योगासाठी नवी मॅटही खरेदी केली. १जानेवारी पहाटेचा अलार्म लावून झोपली. पहाटे अलार्म⏰ वाजला, तरी ही डाराडूर झोपेतच होती. "साक्षी उठ" मम्मी तिला उठवत होती. "मम्मा रात्री खुप उशीर झाला झोपायला, उद्यापासून जाईन, मला झोपू दे अजुन. असं म्हणून ब्लॅंकेट डोक्यावर पांघरूण ती गुडूप झोपुन गेली. न्यु इयर सेलीब्रेशन करून खरंच झोपायला उशीर झाला होता. "बरं बाई झोप तर मगं " असं म्हणून मम्मी तिच्या कामाला लागली. 


दुसऱ्या दिवशी मात्र अलार्म होताच ती लगेच उठली तोंड धुऊन ट्रॅकसुट, पॅन्ट, शुज घालून मॉर्निंग वॉक ला बाहेर पडली. घरी येऊन नेटवर पाहून सुर्यनमस्कार घालू लागली, दोन सुर्यनमस्कारातच गारद झाली. बस्स आजच्यापुरत एवढंच असं म्हणून बेडवर अंग झोकून दिलं. "झोपू नको आता "असं मम्मी बोलल्यावर त्यावर ती बोलली "पाय दुखत आहेत माझे, जरा आराम करते."


साक्षीने केलेल्या संकल्पानुसार सगळे छान चालले होते. आई-बाबांनाही खुप बरं वाटतं होतं शेवटी मुलीनं व्यायामाचे मनावर घेतले होते. आठवडाभर सगळे छान चालले होते. हळूहळू थंडी वाढत चालली होती. आता अलार्म ,वाजला तरी ती डाराडूर, मम्मी उठवायला लागली तर म्हणे, "अगं थंडी किती आहे, झोपुन दे जरा. उठल्यावर योगा करेन."


मम्मीने रविवार म्हणून नाश्त्यासाठी इडल्या केल्या होत्या. साक्षीने इडल्या पाहून लवकरच व्यायाम आटोपता घेतला आणि इडल्यावर अगदी तुटून पडली. मम्मी डाएट ची आठवण करून देत होती. साक्षी म्हणाली "एका दिवसाने काही फरक पडत नाही गं मम्मी, बऱ्याच दिवसांनी पोटभर खातेय." पप्पा हसून बोलले, "खाऊ दे तिला, खाणाऱ्याला अडवू नये, खा-खा, खाशी तशी होशी." "पप्पा माझी चेष्टा करताय ना?..... पण बघा,माझं थोडं वजन कमी झालंय की नाही? "हो बाई खरंच झालंय पप्पा गालातल्या गालात हसत होते.😊


संध्याकाळी घरात खास मेनू बनवला होता मिक्स भाजी, भरलं वांगं, मसाले भात, कोशिंबीर, पापड, लोणचं, चटण्या. फोडणीचा खमंग वास घरभर दरवळत होता. सगळे जेवायला बसले. साक्षीने सगळे पदार्थ ताटात वाढून घेतले. अन् चांगला ताव मारू लागली, सगळे अवाक होवून तिच्याकडे बघत होते. दादा बोलला, "बकासुरे अगं हळूहळू!.....तिचं लक्षच नव्हतं सगळं लक्ष खाण्याकडेच. मम्मीने तिला डाएट ची आठवण करून दिली त्यावर ती बोलली, "काय हे मम्मी एवढे छान छान पदार्थ बनवतेस आणि मला कमी खायला सांगतेस? जाऊदे ते डाएट-बिएट, मी अशीच छान आहे. जीभेवर किती नियंत्रण ठेवायचं, 'खाव- प्याव मस्त रहावं' होना पप्पा?...... आता मम्मी-पप्पा यावर काय बोलणार? पप्पा हसतच बोलले, "लगे रहो". दादा बोलला, "नव्याचे नऊ दिवस" साक्षी त्यांच्याकडे रोखून बघू लागली"खा बाई खा चांगल्या खात्या-पित्या घरातली आहेस" दादा बोलला अन् सगळेच हसायला लागले.


वाचक मित्र मैत्रिणींनीनो कशी वाटली कथा ?

आवडली नसेल तरीही तसं सांगा पण आवडली तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा माझ्या नावासह.



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy