Sangieta Devkar

Drama Romance

3  

Sangieta Devkar

Drama Romance

समज गैरसमज

समज गैरसमज

8 mins
589


आज विक्रांत एकटाच होता घरी. खूप कंटाळा आला होता त्याला. आर्या माहेरी गेली होती अबीरला घेऊन. दोघांची सवय लागली होती आता विक्रांतला त्यामुळे घर खायला उठले होते. नुसता बेडवर लोळत पडला होता तो.


तितक्यात आर्याचा फोन आला, हॅलो विक्रांत अजून उठला नाहीस का?


हो गं उठतो आता जाम कंटाळा आला यार. काय मला एकट्याला सोडून जाता ना तुम्ही दोघं. आय मिस यु यार.


बास हा आम्ही घरी असलो की तुला ऑफिसच्या कामातून वेळ मिळत नाही आणि आता मी दोन दिवस आईकडे काय आले लगेच मिस यु.


हो मग आपलं माणूस आपल्यापासून दूर गेलं ना मग त्याला मिस करतो जवळ असताना काय आहेच ना असं.


हो का नौटंकी उठ आणि आवर आणि मावशी येतील तुला नाष्टा आणि स्वयंपाक करून देतील मी कालच सांगितले त्यांना.


बरं राणी सरकार आणि आमचा चॅम्प कुठे आहे.


झोपला आहे तो, उठल्यावर कॉल लावते पुन्हा.


हो बाय जातो, अंघोळीला म्हणत विक्रांतने फोन ठेवला.


अंघोळ वगैरे उरकून विक्रांतने चहा घेतला तोपर्यंत शेजारच्या काकुंकडे येणाऱ्या मावशी आल्या आणि स्वयंपाकाला लागल्या. विक्रांत आपल्या रूममध्ये गेला आणि त्याने लॅपटॉप ओपन केले. आज शनिवार असल्याने निवांत होता तो. मग एफबी ओपन करून तो टाइमपास करू लागला. सगळे कॉलेज मेट ऍड होते त्याला. जुन्या आठवणी आठवू लागल्या. कॉलेजचे दिवस आठवले. कॉलेज संपून सहा तर वर्ष झाली होती. त्यामुळे त्या आठवणी अजून ताज्याच होत्या. एफ़बीवर एकाने पोस्ट टाकली होती. चुका माणसांकडूनच होतात न चुकणारा देव असतो पण त्याला माफ करणारा सर्वश्रेष्ठ असतो माणूस जीवंत असेपर्यंत माफ करा. मेल्यानंतर माफ करण्यात काही अर्थ नसतो. ही पोस्ट वाचली तसे विक्रांतला संयुक्ताची आठवण आली. कुठे असेल आता ती. मला खरंच विसरून गेली असेल का? मी तिला माफ नाही केले तेव्हा मी खरंच चुकलो का? का नाही तिचे ऐकून घेतले. इतका कशाचा मला राग आला होता. मग त्याने तिला अनब्लॉक केले. सहा वर्षांपूर्वी संयुला त्याने ब्लॉक केले होते. तिचे अकाऊंट सुरु होते. त्याने तिचे फ़ोटो पाहिले पूर्वीसारखीच सूंदर दिसत होती. तिचेही लग्न झाले होते. एक मुलगीही दिसत होती फ़ोटोमध्ये. मुलगी तिच्यासारखीच छान होती. सगळे तिचे फ़ोटो पाहू लागला. त्यांची पहिली भेट मग झालेली मैत्री आणि त्यानंतर झालेले प्रेम. सगळं सगळं आठवू लागले त्याला. आज कदाचित संयु आपल्या सोबत असती पण मी तिचे काहीही ऐकून नाही घेतले, तिला खूप बोललो. ती खूप वेळ सॉरी म्हणत होती पण नाहीच मला इतका राग आला होता की तिचे काहीही ऐकून नाही घेतले. तिचा एक शब्द माझ्या जिव्हारी लागला. ती रागात बोलली, विक्रांत आय नीड यू म्हणून तू असा त्रास देतो का मला. म्हणजे मी हीची गरज होतो फ़क्त बस याचाच राग आला मला आणि संपलं सगळं. चार वर्षाचं नातं आमचं एका क्षणात तुटले होते कायमचेच कारण माझा इगो. आज हे सगळं आठवून नकळत त्याच्या डोळ्यात पाणी आले. संयुक्ताच्या आठवणीने मन भरून आले. आता तिला भेटून बोलावे असे त्याला वाटू लागले. पण आता संयु का बोलेल माझ्याशी मी किती अपमान केला तिचा. असा विचार करत त्याने लॅपटॉप बंद केला. डोळे बंद करून पडून राहिला. पण नजरेसमोरून संयुक्ताचा चेहरा हटतच नव्हता. त्याला सगळं सगळं आठवत राहिले.


त्यांची पहिली भेट, मग एकमेकांना प्रपोज केले. दर वीक डेजला मनसोक्त फिरायला जायचे, एकमेकांसोबत वेळ घालवायचे. दोघं एकमेकांत आकंठ बुडाले होते. संयु खूप शांत आणि समजूतदार होती पण विक्रांत अगदी उलट राग तर त्याच्या नाकावर जणू ठाण मांडून बसलेला असायचा. ती म्हणायची पण विक हो प्रेमाने ती त्याला विक बोलवायची. तुझे नाक ना इतकं टोकदार आणि मोठे का आहे माहित आहे? का सांग. कारण तुला राग पटकन येतो. हो काय. होच मग ती हसत राहायची. पण खूप आवडायचे तिला त्याचे नाक. विक्रांत उंच गोरा सरळ टोकदार नाक, नेहमी स्ट्रीम असणारी बियर्ड आणि जिमला जात असल्यामुळे एकदम फिट आणि हँडसम दिसायचा. संयु त्याचं नाक अधून मधून चावायची म्हणायची खूप छान आहे रे नाक तुझं. फक्त नाकच छान का मी नाही छान वाटत तुला संयु. तू तर ऑसम आहेस. सो आय लव यु जान. ती असे बोलली की तो खूप खुश व्हायचा आणि मग तिला जवळ घेऊन आपल्या ओठाची मोहर तिच्या ओठांवर द्यायचा. ती शहारून जायची, त्याच्या तपकिरी गहिऱ्या डोळ्यात स्वतःला विसरून जायची. त्याला घट्ट मिठी मारायची. विक्रांतही खूप प्रेम करायचा तिच्यावर पण त्याच्या वागण्या बोलण्यात एक अधिकार हक्क असंच जास्त दिसून यायचं. प्रेम कधीही तो बोलून दाखवत नसे. लव यु बोलले म्हणजेच प्रेम असतं असे काही नसते म्हणायचा. संयुला हेही वागणं त्याचं आवडायचं. त्याचा तिच्यावर हक्क दाखवणे अधिकाराने तिला रागावणं सगळंच तिला आवडत होतं. पण त्याला न आवडणारी गोष्ट केली की जाम भडकायचा मग चार चार दिवस रुसून बसायचा. त्या दिवशीही काही कारणामुळे दोघांत वाद झाला मग चुकून रागात संयु बोलून गेली विक मला गरज आहे तुझी म्हणून मुद्दाम त्रास देतोस ना. बस्स त्याला अजून भडकायला हे कारण पुरेसे होते. म्हणजे संयु मी तुझी गरज भागवणारा वाटलो का तुला. माझ्या प्रेमाला इतकं चिप समजतेस तू? आय कान्ट बिलीव्ह. विक मला तसे नव्हते म्हणायचे तू का गैरसमज करून घेतोस. आय रियली सॉरी. बस्स संयु माझ्या प्रेमाची तू काय किंमत केलीस हे समजले मला. मी तुझी फक्त गरज होतो. तुझं मनोरंजन करणारा तुला खुश ठेवणारा असंच ना? प्लिज विक्रांत तू चुकीचे समजत आहेस. मी रागात बोलले पण माझा हेतू तुला हर्ट करायचा नव्हता. पण विक्रांतचा इगो दुखावला होता. तो संयुशी बोललाच नाही. संयुने खूप वेळा माफी मागितली पण नाही तो अडून राहिला कारण त्याचा रागीट स्वभाव! मग हळूहळू संयुनेही बोलणे कमी केले रादर तो तिला मेसेजला रिप्लायही देत नसायचा. मग कालांतराने त्यांचं नातंही संपुष्टात आलं.


आज हे सगळं आठवून विक्रांतला स्वतःचा राग आणि संयुबद्दल वाईट वाटत होतं. लग्नानंतर तो जरा निवळला होता अबीरच्या जन्मानंतर तर खूप सॉफ्ट झाला. पण गेलेली वेळ आणि आयुष्यातून गेलेली व्यक्ती पुन्हा माघारी येत नसते हेही तितकेच खरे! संयुवर जिवापाड प्रेम केले त्याने पण चुकीचा एक गैरसमज त्यांच्या नात्याला सुरुंग लावून गेला त्यात याचा मेल इगो आड आला. आता संयुला भेटून निदान तिची माफी मागावी असे विक्रांतला वाटू लागले. मग त्याने संयुला मेसेज टाकला की त्याला तिला भेटायचे आहे. प्लिज एकदा भेट. मग दुपारी झोप काढून तो संध्याकाळी मित्रांकडे गेला. बाहेरचं खाऊन आला. त्याने बऱ्याच वेळा मोबाईल चेक केला की संयुचा मेसेज आला का हे पाहण्यासाठी पण अजून तिने त्याचा मेसेज पाहिलाही नव्हता. मग घरी येऊन त्याने आर्याला कॉल लावला थोडं अबीरशी बोलला. पुन्हा त्याने एफबी ओपन केले आणि आश्चर्य त्याला संयुचा रिप्लाय आला होता. हॅलो विक्रांत कसा आहेस. आणि भेटू आपण असा मेसेज आला होता. विक्रांत खूप खुश झाला त्याने तिला रिप्लाय दिला उद्या भेटू आणि तिला वेळ आणि ऍड्रेस सेंड केला. तिने ओके असा मेसेज केला. सकाळी निवांत उठला आज सुट्टी रविवार! संयुक्ताला भेटायला जाणार म्हणून खुश होता. काहीही म्हणा, पहिले प्रेम अद्भुतच असते. पहला नशा पहला खुमार... असं काहीसं!! पण संयु मला माफ करेल का? हो तिच्या मनात राग असता तर मला भेटायला तयार झालीच नसती. असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. उठून आवरु लागला. लंचला दोघं भेटणार होते. मस्त विक्रांतने दाढ़ी केली. जेल लावून केस सेट केले. संयुला नेहमी आवडणारा ब्लू डेनिमचा शर्ट घातला. विक काय सेक्सी दिसतात रे तुझे बायसेफ़स मस्त.. जिममधल्या पोरी सॉलिड तुझ्यावर लाईन मारत असतील ना? हो खुप जणी मागे लागतात तू सोडून गेलीस ना तरी मला आहे भरपूर चॉइस डोन्ट वरि. हो का पण तुला सोडून मी कुठेही जाणार नाही समजलं. असे बोलून संयुचे डोळे भरून आले होते. अरे लगेच काय सेंटी होतेस गं. मी मस्करी केली सॉरी संयु. मग ती त्याच्या मिठीत शिरली. आता आरशात स्वतःला पाहताना विक्रांतला हे आठवले. खूप प्रेम करायची संयु वेड्यासारखी आपणच नाही समजून घेतले तिला. आपला इगो आड़ आला. ह्म्म्म आता तिची माफी मागून हे गिल्ट कमी होईल कदाचित!


विक्रांत निघाला संयुही निघाली होती. वेळेवर हॉटेलला पोहोचले ते. संयु विक्रांतकड़े एकटक भान हरपुन पाहत होती. दोन वर्षांनी त्याला बघत होती. जसा पूर्वी होता तसाच विक्रांत आजही दिसत होता. तिच्या समोर बसत त्याने चुटकी वाजवली कुठे हरवलीस संयु?


अरे काही नाही बस तू आणि कसा आहेस?


मी मजेत तू कशी आहेस. मीही छान आहे. बोल आज का भेटायचे होते तुला विक्रांत?


आधी आपण ऑर्डर देऊ चालेल.


हो सांग. मग तिच्या आवडीचे पदार्थ त्याने ऑर्डर केले.


बोल विक्रांत आज दोन वर्षांनी माझ्याशी बोलावेसे का वाटले? याआधी माझी जरासुद्धा आठवण नाही आली का रे? खरंच मी त्यावेळी इतके चुकीचे वागले होते का?


संयु प्लीज त्यासाठीच मी आज आलो तुला भेटायला. मला माहित आहे तुला माझा राग येणं साहजिकच आहे. आता समजतंय मला की मी किती चुकीचा वागलो गं. मला खरंच माफ कर संयु. आय एम रियली सॉरी. तेव्हा मला बोलण्याचं काहीच भान नसायचं त्यात माझा तापट स्वभाव आणि माझा इगोसुद्धा याला कारणीभूत आहे.


पण विक्रांत आता त्या गोष्टी बोलून किंवा त्याबद्दल माफी मागून गेलेले दिवस परत नाही येणार ना?


हो नाही येणार ते दिवस परत पण माझ्या मनात आले की तुझी माफी मागावी. माझे लग्न झाले त्यानंतर हळूहळू माझा तापट स्वभावात फरक पडू लागला आणि मला मुलगा झाला त्यानंतर तर मी खुपच सॉफ्ट झालो. तेव्हा मला नाते काय आणि त्यांचे महत्त्व काय समजले.


जाऊ दे विक्रांत झालं गेला तो विषय मागे पडला. पण मला हे कधीच नाही समजले की मी फ़क्त इतकेच बोलले होते तुला की मला तुझी गरज आहे या एका वाक्याचा तू किती वेगळा अर्थ घेतलास? नको ते बोललास मी काय तुझ्या गरजा पूर्ण करणारा प्लेबॉय वाटलो का आणि असं बरंच काही बोललास.


हो संयु रागात मी नको ते बोलून तुला हर्ट केले. म्हणून तुझी माफी मागणे गरजेचे होते. आपण जे बोलतो ते विचार करून बोलले पाहिजे हे खूप उशीरा समजले गं. आय एम एक्सट्रीमली सॉरी.


विक्रांत माझ्या मनात तुझ्याबदल काही कडवटपणा नाही. मी विसरले सगळे तूही काही मनात ठेवू नको. पण तुला समजले ना की समोरच्याला बोलायचे असते वेगळे पण आपण आपल्या पद्धतीने त्याचा अर्थ लावत असतो.


हो संयु यामुळेच मी तुला गमवून बसलो.


इट्स ओके आपण दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे निघुन गेलो आहोत. ती एक फेज होती असे समज आणि विसरून जा. मग दोघांनी जेवण केले आणि पुन्हा भेटू म्हणत एकमेकांचा निरोप घेतला. विक्रांतला आता खूप हलकं आणि मोकळे वाटत होते त्याच्याबद्दल संयुच्या मनात काही अढी नव्हती म्हणून तो खुश झाला. आणि त्याने आर्याला कॉल लावला उद्या मी तुला घ्यायला येतो असे सांगितले. 


एका अनुभवावरुन हे लिहावेसे वाटले. कसे असते ना आपण रागात समोरच्याला बोलून जातो काही बाही पण नंतर विचार करतो की मी असे का बोललो किंवा बोलले. समोरच्याला आपल्याला काही वेगळंच सांगायचे असते आपण त्याचा चुकीचा अर्थ घेतो. पण जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा समोरच्याला सॉरी म्हणा. कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि ती व्यक्ती पण!


समाप्त...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama