स्माईल प्लीज
स्माईल प्लीज
कार्यक्रम कोणता ही असो??? बायकांना मेकअप साठी अर्धा दिवस कमी. आज काय तर तिच्या मैत्रिणी चे लग्न म्हटल्यावर तिला सांगायला नको.???
दोन तास झाले तरी...बस एक मिनिट करत ताटकळत ठेवले होते मला.
एक कळत नाही?? मना सारखा म्हणा नाही तर मना विरूध्द
आता आहे ना नवरा मग येवढं साज शृंगार कशाला...???
इतका मेकअप तोंडाला विचारू नका ??? कधी कधी माझी फसवणूक होते..??
हीच का ती आपली बायको.??
थोडे होते हो दचकायला ??
पण जिथे तोंड उघडते आपोआप कळते हीच ती महा माया...
बरे झाले का??? तुझे ??
बस आजुन एक मिनिट ...
आता इतकी नटली तरी एक मिनिट???
अच्छा ऐका ना ???
हे मंगळसूत्र मॅच नाही होत हो साडी वर???
मायला तिच्या मंगळसूत्र बद्दल जरा तरी विचार काही???
आता सांगा मंगळसूत्र म्हणे मॅच नाही होत..
मी कसा होईन मग ....???
अच्छा आता सांगा कशी दिसते मी ????
आता काही म्हणा स्तुती खरी असोवा खोटी केली पाहिजे...
हे काय तुम्हाला ना जरा पण अक्कल नाही ??
रिक्षा कशाला बोलवायची ????
ह्या गर्मी मधून माझा मेकअप खराब झाला मग???
ओला करायचा ना??
घ्या मेकअप, साडी नवी दागिने मैत्रिणीला महाग आहेर घेवून मला सुका केला तिने ... आता म्हणे ओला करा...
ते पण केले ओला कॅब बुक केली ... बरे रस्त्यात नुसती बडबड... आणि एकसारखी आरश्यात पाहत..
मी मनात म्हणालो
हिला चोरून पाहण्याच्या नादात ड्रायव्हर गाडी ठोकायचा कुठे तरी ???...
त्याची तरी काय चुकी???
आता मला माहित आहे .. बाहेरून कशीही असली तरी आतून चायना ... कसलीच गॅरंटी नाही???
तोंड म्हणजे ऑडियो सिस्टिम आणि मेमरी लॉस...
देव जाणो इतके जिबी कुठे लोड आहेत...??
अगदी वेळेवर पोहचलो लग्नाला सुरवातीलाच प्लेट हातात दिले माझ्या लागलो लाईन मध्ये... ??
तिला म्हटले तू ये मैत्रिणीला भेटून ....
काही महत्त्वाचा सल्ला असला तर दे एकांत मधे तिला..
प्लेट घेवून पुढे पुढे सरकत होतो. दुरून पाहिले बहुतेक पनीर संपणार माझा नंबर येई पर्यंत तसे पण बायकोच्या सोबत आलोय काही तरी वाईट घडायला नको...
वाचलो पनीर शाबित होते .. पनीर आणि पुरी गुलाब जाम प्लेट मध्ये घेतले. तसा पापड पण होता घेतलेला
एका मूर्ख माणसाने पंखा माझ्या कडे फिरवला पापड तो शेवटी उडाला ....
आता तिळपापड होण्यापेक्षा कुठे तरी बसून खाल्ले ले बरे ....
इतक्यात एक लहान कार्टे धावत आले झाली फजिती ...
सर्व पनीर गुलाब जाम गायब ...
खरे गायब मला व्हायला पाहिजे होते....
कारण ती प्लेट एका बाईच्या साडी वर पडली...
ज्या पद्धतीने पनीर खाणार होतो पोटभरून
तितक्या शिव्या खाल्ल्या...
आता परत इच्छा नाही झाली जेवणाची ...
बाई साहेब
आहो तिकडे काय करताय??? या ना तुमची ओळख करून देते ...
दक्षा हे बघ माझे मिस्टर ... तिची मैत्रीण म्हणजे तीच जिच्या वर पनीर अटॅक् झाला होता...
बायको तिला पाहून ....
कुठल्या गाढवाने केले हे???? ती गप्प हसत होती कुणी नाही म्हणाली.. नशीब वाचलो मी ....
चिज झाले ... जरी पनीर सांडले असले तरी...
बँकेत जॉब ला आहेत हे ??
आयाला तिला सांगून आजुन कशाला माझे सिबिल बिघडवत होती ???
बायकोने नाही पण तिने विचारले झाले का मग जेवण तुमचे ??? आता नाही म्हणू शकत नाही आणि हो म्हणालो तर आहे उपवास आधीच आमच्या मॅडमला तयार होण्यासाठी दिवस कमी पडला तर घरी काही केले नाही..
तिच्या मैत्रिणीने बायकोला सांगितले चल आपण आईस क्रीम खावू...
मी हो म्हणालो इतक्यात बायको...
काय हो ??? सर्दी होते तुम्हाला माहीत आहे ना??
नको त्यांना अलर्जी आहे चल आपण ......
झाले म्हणजे आईस क्रीम पण गेले....
गप्प एका कोपऱ्यात बसून राहिलो. बघा ना अशावेलेला बरोबर सर्व माझ्या समोर येवून खात पित होते...
आता तसे पण सर्वांसाठी अनोळखी मी काय करणार ??
इतक्यात एक चेहरा ओळखीचा दिसला ..
खात्री होत नव्हती. तरी मुद्दाम जवळ जाऊन पाहिले
माझी एक्स गौरी ... तिने ही पाहिले मला ..
मी विचारणार इतक्यात तीच
तू हिथे कसा???
माझ्या बायकोची मैत्रीण आहे नवरी..
आणि तू ?? नवरा माझ्या दूरच्या नात्यात आहे??
मग बायको कुठे आहे ?? भेट नाही करून देणार???
असेल इथेच आता तिच्या मैत्रिणीचा विवाह मग तिला तरी कुठे आहे फुरसत??
चल नंतर भेटू?? तू जेवलास ???
नाही नंतर ????
चल माझ्या सोबत आपण जेवूया??
हो चल
पुन्हा लाईन मधे उभा राहिलो..
मग तू कधी केलेस लग्न ??? मी तिला विचारले ..
ज्या वेळी कळाले तू केलेस ??
नाराज आहेस माझ्या वर???
खुश होण्या सारखे कधी काही केले आहेस का???
आता हीथे तरी तक्रारी नको हवे तर नंतर भेटू आपण ??
गौरीने प्लेट भरून घेतले
ह्या ही वेळेला माझा नंबर आला आणि पनीर संपले .....
आचारी ...
पुरी आणि पनीरचा रस्सा उरला आहे देवू???
नको म्हणू तरी कसा सकाळ पासून उपाशी होतो...
जेवण करता करता बऱ्याच गप्पा केल्या... जुन्या नव्या
पनीर नाही मिळाले म्हणून काय झालं ...
नशिबात परत ... बिर्याणी आली होती...
जेवण करून झाल्यावर ... तिने परत विचारले
आईस क्रीम खावूया ???
मी म्हणालो तुला आठवते ते दिवस तू मी आणि आईस क्रीम???
लाजली ... आईस क्रीम खाताना मी तिचा नंबर घेतला तिने माझा .. माझ्या ओठावर थोडे लागलेले आईस क्रीम तिने तिच्या रुमालाने पुसले आणि जुनी आठवण झाली....
इतक्यात पाय आपटत बायको आली..
तुमची चोरी पकडली ??? तुम्हाला काय वाटले मला उल्लू बनवाल?? माझं कधी पासून लक्ष होते तुमच्या वर???
माझ्या चेहऱ्यावर घाम फुटला ...
तुला म्हणायचे काय आहे ???
हेच माझ्या पासून लपून तुम्ही आईसक्रीम खाल गुपचूप??
एकदा सांगितले ना अलर्जिी आहे ??
मग का घेतले ??
अच्छा तू आईस क्रीम बद्दल बोलतेस??
मग तुम्हाला काय वाटले ??
नशीब तिने गौरीला नाही पाहिले माझ्या तोंडचे आईस क्रीम पुसताना ..... नाही तर माझा मुडदा पाडून स्वतः च्या हातून कपाळाचे कुंकू पुसले असते ....
आईस क्रीम बद्दल बोलली राबडीदेवी
GF बद्दल कळाले असते तर घरी माझा लालुच झाला असता.
तरी गौरी आणि तिची भेट करून दिली..
तिला सांगितले क्लास फ्रेंड म्हणून
अशी फ्रेंड जिच्या साठी क्लास चुकवायचो
तिला काय माहित त्या बद्दल
एक बरे झाले इतक्यात कुणी तरी आले सांगत नवरीने तिला बोलाविले आहे म्हणून ....
मग मी गौरी आणि बायको गेलो नवऱ्या नवरी सोबत फोटो काढायला.
फोटो काढायला उभा होतो इतक्यात एक मुलगी तिच्या मैत्रिणीला म्हणाली. माझ्या कडे बोट दाखवत.
ये गौरीचा एक्स बघ ????
बायकोने ऐकले आणि रागात माझ्या कडे पाहत होती
मी रडकुंडीला आलो होतो.
फोटोग्राफर
Smile Please .....

