Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Raj Mohite

Tragedy


4.0  

Raj Mohite

Tragedy


कधी तरी सांग

कधी तरी सांग

1 min 255 1 min 255

माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी सांगता न येणाऱ्या आहेत

आणि मला त्या सांगायचे धाडस हि नाही.

जिच्या वर लहानपणा पासून प्रेम करतो तिला सांगता आले नाही आणि आता सांगू शकत नाही कदाचित तिला हि त्याची जाणीव आहे आता तर म्हणा तिचे लग्न झाले आहे तर आपल प्रेम फक्त गुलदस्त्यातच

आठवतेय. तिने बऱ्याचदा मला बोलायची संधी दिली पण मला विषय बदलून भलतेच आणि बरेच बोलता आले ते नाही बोललो ज्याच्या साठी ती आतुरलेली होती.

जाणून बुझुन माझ्या मनातच मी सार दडवून ठेवले हिम्मत होती पण बोलता नं येण्याचं कारण इतके की माझा आजार... एका कॅन्सर पेशंट ने किती आणि कसे प्रेम जाहीर करावे

तिला हेही सांगता येत न्हवते की मला आजार आहे आणि हेही नाही की माझ्या आजारच थोडे का होईना तू औषध आहेस आयुष्य बराच खेळ खेळून गेला.

हार मला पचवून घ्यायची त्यामुळेच हिम्मत आली होती.

काही असो ती खुश आहे ना आणि समाधानी आहे ना तेच माझ्या साठी खूप आहे

परवा भेटली देव जाणो कुणी सांगितले तिला माझ्या बद्दल! बराच वेळ बोलली भरपूर बोलली

एक फक्त तीच वाक्य माझ्या आजारापेक्षा जास्त घाव करून गेले

तुला न सांगता येणाऱ्या गोष्टी मला समजल्या होत्या. आता उशीर झालाय पण पुन्हा आयुष्य लाभले तर उशीर करू नकोस.

आता मला सांगता येत नाही पण इतके सांगेन मला नेहमी तुझ्या कडून काही ऐकायचे होते. अपेक्षा आहे देवाने पुन्हा जन्म दिला तर नक्की ऐकवशिलRate this content
Log in

More marathi story from Raj Mohite

Similar marathi story from Tragedy