Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Raj Mohite

Tragedy


4.5  

Raj Mohite

Tragedy


वाट पाहतोय तुझ्या उत्तराची

वाट पाहतोय तुझ्या उत्तराची

3 mins 199 3 mins 199

तुला आठवतेय का???

आपले लहानपण त्या आठवणी ते दिवस ????

खरेच धमाल होती ना आपली

हवे ते मिळत होते घरच्यांकडून खाऊ नवे नवे कपडे खेळणी बाहुली

बाहुली वरून आठविले तुला आठवतेय ???? बाहुली बाहुल्याचं लग्न ??

माझा बाहुला आणि तुझी बाहुली आपण बऱ्याचदा त्यांचं लग्न लावून द्यायचो आणि लग्न विधीत काही अडथळा तर भांडायचो... आपले भांडण सोडवता सोडवता घरचे भांडायला लागायचे.

कळतं न्हवते हे सोडायला आले की भांडायला

आपण मात्र दुसऱ्या दिवशी शाळेतून येताना चिंच अंबा बोरे खात खात घरी

कधीच कळाले नाही

आपण का भांडायचो आणि कसे एकत्र यायचो ???

तुला आठवते तू मला काय बोलून चिडवायची

आणि मी तुला काय चिडवायचो तुला रडताना पाहून खरेच मी ही हवालदिल व्हायचो

कधी लपाछपी कधी रस्सीखेच कधी लंगडी बरेच खेळ होते आपले

आजच्या पिढीला मोबाईल व्हिडिओ गेम मधे बघून त्या वेळेची आठवण येते

कधी बालपण संपले आणि कधी खोड्या काढत आपण मोठे झालो काहीच कळाले न्हवते पण वयानुसार आपल्यात आलेले एक शहाणपण म्हणजे मी तुला आवडू लागलो होतो आणि तू ही मला.

आठवतोय तुला मी केलेला तुला प्रपोज ??? नाही ना मला ही नाही आठवत

खरेच गरजच भासली न्हवती.

वय वाढले तसे तू माझी बाहुली आणि मी तुझा बाहुला

पण हे लग्न घरच्यांना पसंत न्हवते माहित नाही का?? कारण आपल्या भिन्न जाती आणि रुढी

तरीही आपण न जुमानता केलेले धाडस आठवते तुला ???

पळून केलेले लग्न आधी भले न्हवते मान्य पण हळू हळू माझ्या ही घरच्यांना पसंत पडलीस आणि मीही जावई म्हणून पसंत झालो तुझ्या फॅमिलीला.

तुला आठवतेय आपला पहिला हनिमून शिमल्याची थंडी आणि ती घोडेस्वारी ???? खूप लाजली होतीस आणि खूप घाबरली होतीस

आयुष्यात मी तुला माझ्या सोबत पहिल्यांदा लाजताना आणि घबरताना पाहिले होते.

एक स्पर्श होताच तुझी भिती दूर झाली होती. आणि त्या रात्री तू सांगितलेले स्वप्न आठविते तुला ??? काय म्हणाली होतीस ???

माझ्या सोबत आयुष्यभर साथ देण्याच स्वप्न.. आपले एक घर घेण्याचं स्वप्न !

तुझं वचन आठविते तुला काय वचन दिले होतेस ????

आयुष्यभर माझ्या संसारात साथ देण्याचं

फारच बदलीस ग तू वचन केलेस ही आणि मोडलेस ही

तुला आठवते ज्यावेळी तू आई होणार होतीस काय म्हणाली होतीस??? मुलगी होणार म्हणून मी काय म्हणालो होतो आठवीते तुला??? नक्की मुलगा होणार

मी पैज जिंकलो खरा

पण हरलो ग तुझ्या जाण्याने

तुला आठवते ??? काय नाव suggest केलेस ते???

मला तुझ्या कडून इतकेच उत्तर हवे आहे जन्मभराची साथ देण्याचं वचन केले असताना मला आणि माझ्या बाळाला एकदम सोडून कसे काय जाते आले तुला ???

त्याच्या किंकाळीने ही तुला जाग आली नाही

इतक्या वर्षाची माझी सोबती तू आज तुला धाडस कसे झाले जाण्याचे.

मला सांग तुला बाळाची ईच्छा होती तुला त्याला खेळविण्याची इच्छा होती.

तो आई म्हणून रडतोय तरीही तू कवेत घ्यायला तयार नाहीस मला उत्तर दे हे अर्धवट सोडून मी कसा जगू ??

तुझ्या साठी जगाशी लढलो आता ह्या चिमुकल्याने हरविले ग मला

तू इतकी कशी निष्टुर झालीस???

माझी इतकी तुला काळजी असताना कुणाच्या भरवश्यावर सोडून गेलीस ??

मला उत्तर हवे आहे तुझ्या कडून मला पुढील जन्मी तूच हवीच

तेच बालपण आणि तोच बाहुली बाहुला आणि लग्न

वचन करतो तुला खरेच मी चिडवणार नाही

भांडणार हि नाही आणि तुला माहीत आहे

मी वचनाचा कायम आहे

बस तू इतके उत्तर दे तुला आवडेल पुन्हा मी तुझा सोबती???

वाट पाहतोय तुझ्या उत्तराचीRate this content
Log in

More marathi story from Raj Mohite

Similar marathi story from Tragedy