Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Raj Mohite

Romance Tragedy


4  

Raj Mohite

Romance Tragedy


पैंजण - Love Is Poison

पैंजण - Love Is Poison

11 mins 186 11 mins 186

 इच्छा नसताना राजला आपल्या वडिलांच्या बिझनेसला जॉइंट करावे लागले होते. वडील विक्रम रॉय पुण्यातील प्रसिध्द बिझनेसमन म्हटल्यावर काही सांगायला नको. पिकनिक, मित्रान सोबत पार्टी आणि नको नको ती व्यसने.ही बाब ज्या वेळी वडील विक्रम रॉय यांच्या लक्षात आली त्यांनी ऑफिस जॉइंट करण्याचे बंधन घातले राजवर . राजच्या मते जगात जर कोणती बोरिंग जागा असेल तर ते वडिलांचे ऑफिस त्याला ऑफिस जॉइंट करणे मान्य नव्हते.

आई परिणीती रॉय ने ज्यावेळी त्याला शपथ घातली नाईलाजा खातर त्याला ऑफिस जॉइंट करावे लागले. काही म्हणा कुत्र्याचे शेपूट कधी सरळ होते का ??? इथे ही ऑफिस जॉइंट केले मात्र ना कामात ध्यान ना मन, राज च्या सोबत त्याच्या मित्राने शिवा ने सुध्दा ऑफिस जॉइंट केले. थोडक्यात शिवा बद्दल सांगायचे तर शिवा त्यांच्या ड्रायव्हर शंकर यांचा मुलगा लहानाचा मोठा तो विक्रम रॉय यांच्या घरीच झाला. त्या वेळी विक्रम रॉय यांना काही केल्या मूल झाले नव्हते त्यांनी शिवालाच आपला मुलगा मानला होता. त्याचे शिक्षण आणि सर्व जबाबदारी स्वीकारली होती. काही वर्षांनी मग त्यांना अपत्य झाले .

शिवा आणि राज यांनी त्यांचे ऑफिस मध्ये ही कारनामे सुरू केले मुलींची छेड, लपून छपून स्मोकिंग सर्व काही सुरूच होते. विक्रम रॉय यांना त्याची सर्व कल्पना होती पण ते खुश होते निदान राज आणि शिवाने ऑफिस तरी जॉइंट केले होते.

एके दिवशी शिवा आणि राज नेहमी प्रमाणे ऑफिसला जाण्यास निघाले त्यावेळी त्यांना रस्त्याच्या सिग्नल वर एक मुलगी दिसली ॲक्टिवावर त्या मुलीच्या सभोवती सर्व सिग्नल वरील मुले जमा होती ती मुलगी एक एक करून सर्वांना चॉकलेट वाटत होती. थोडे नवल वाटले त्यांना आजही अशी लोक आहेत समाजात म्हणून. त्या मुलीने ॲक्टिवावर असल्या कारणाने तोंडाला पूर्ण स्काफ बांधला होता त्यामुळे दोघेही तिचा चेहरा पाहू शकत नव्हते. पण त्या मुलीचा साधा आणि सुंदर पेहराव अनाथ मुलांसाठी प्रेम कुतूहल पाहून त्यांना तिचा चेहरा पाहण्याची इच्छा झाली. कित्येकदा ती मुलगी त्यांच्या वेळेनुसार सिग्नल वर यायची मुलांना चोकलेट देवून निघून जायची पण दुर्वव तिचा स्काफ मुळे त्यांना तिला पाहता येत नव्हते. राजला त्या स्काफच्या पलीकडील चेहरा पाहण्याची तीव्र इच्छा होती त्या खातर त्यांनी तिच्या ऑफिस चा ही पाठलाग केला मात्र शक्य झाले नाही उलट उशिरा ऑफिस मध्ये पोहचल्याने वडील विक्रम यांची बोलणी खावी लागली.

शिवाने एक दिवस राजला एक आयडिया सांगितली तिचा चेहरा पाहण्याची आयडिया तशी चांगली होती पण फुस झाली. एक मात्र अखेर त्या अनोळखी चेहऱ्याचे नाव तरी कळले त्यांना ...... काव्या सावंत.

आयडिया त्यांची म्हणजे तिच्या गाडीच्या नंबर ने ऑनलाईन सर्च करून तिचे नाव जाणून घ्यायचे मग सोशल मीडिया वर तिचे नाव सर्च करून चेहरा पाहण्याचे तिचे सोशल अकाउंट तर मिळालं पण त्यात तिचा चेहरा नव्हता. त्या सर्व अनाथ मुलांचे फोटो बरेच सुविचार आणि तिच्या कविता....

तसे पाहिले तर तिच्या कविता आणि सुविचार कुणालाही आवडतील असे होते. लागलीच राज ने तिला फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली आणि मेसेज ही " Hi" त्या Hi ला " hellow"

असा रिप्लाय आलाच नव्हता. शिवा त्या मुळे राजची नेहमीच मस्करी करायचा आणि एक दिवशी त्याची मस्करी बंद झाली. Hellow Who's this???????

काव्या कडून रिप्लाय आला होता पण चुकीच्या वेळी त्यावेळी राज शिवा आणि त्याचे वडील विक्रम रॉय क्लाएंट सोबत मोठ्या मीटिंग मध्ये होते. राज त्या मेसेज ने भान विसरला आणि त्या Hellow रिप्लाय वर चॅटिंग करू लागला. ही बाब वडील विक्रम ह्यांनी नोटीस केली एक दोनदा अटेंशन साठी त्यांनी राज ला मार्क सुध्दा केले पण राज त्या चॅटिंग मध्ये बुडाला होता.

राजचा Hi आणी काव्याच्या Hellow ने झालेली सुरुवात आता नेहमीच्या चॅटिंग वर येवून ठेपली होती. राज तिला चेहरा दाखवण्याचा खूप आग्रह करत होता पण काव्या त्याला तयार नव्हती. कित्येकदा राजने तिचा मोबाईल नंबर जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण असफल ठरला प्रयत्न. अखेर एक दिवशी रागाने राजने त्याचा मोबाईल नंबर सेंड केला आणि चॅटिंग बंद केली.

तीन ते चार दिवस काव्या कडून काहीच रिप्लाय आला नाही ना राज ने पुन्हा मेसेज करण्याचे धाडस केले. शिवा ह्या ही वेळेला राजची मस्करी करत होता. त्यांचे ह्याच विषयावर संभाषण चालू असताना राजचा मोबाईल वाजला.

समोर काव्या होती तिचा आवाज बोलण्याचा अंदाज सर्व काही ऐकून राज स्तब्ध झाला आणि जास्तच उस्ताहीत झाला त्या गोड आवाजाच्या मागील चेहरा जाणून घेण्या साठी. चॅटिंग वरून आता त्यांचे फोन वर नेहमीचे संभाषण सुरू झाले. राज तिला नेहमी भेटण्यासाठी आग्रह करत होता. पण तिचा कायमचा नकार.... राजने कधीच तिला त्याच्या श्रीमंती बद्दल सांगितले नाही. काव्या एक गरीब अनाथ मुलगी तिच्या आई वडिलांचे निधन ६ वर्षा आधी झाले होते. ती तिच्या आजी सोबत राहत होती जसे तसे नोकरी करून ती तिचा उदरनिर्वाह करत होती. अनाथ असल्या मुळेच तिला अनाथ मुलांचा लळा होता हे राजच्या लक्षात आले.

अखेर एक दिवस काव्याने त्याच्या सोबत कॉफी साठी होकार दिला. फोटो पाहण्यापेक्षा प्रत्येक्षात भेटणे तिने पसंत होते. तिने saturday ला भेटायचे ठरवले संध्याकाळी ५.३०. राज प्रचंड खुश झाला त्याने शिवाला सांगितले मला काहीतरी तिला गिफ्ट द्यायचे आहे पहिल्या भेटीसाठी. शिवा आणि राज दुसऱ्या दिवशी एका ज्वेलरी शॉप मध्ये गेले बरेच काही पाहिल्यावर त्यांना सुचत नव्हते काय नेमके गिफ्ट द्यावे. त्यांनी शॉप मधील एक सेल्स गर्ल ची मदत घेतली गिफ्ट साठी सेल्स गर्ल म्हणाली " जर तुम्ही एका मुलीला पैंजण गिफ्ट कराल आणि जर तिला तिला पायात घालताना प्रपोज केले तर ती नाही म्हणू शकत नाही. पाया जवळ राहणारा मुलगा कुठल्या मुलीला नाही आवडणार???

त्यांना पटले त्यांनी एक सुंदर अशी पैंजण विकत घेतली. दुसऱ्या दिवशी ठरल्या प्रमाणे राज कॉफी शॉप मध्ये पोहचला राज काव्याची वाट पाहत होता. ५.४५ झाले तरी काव्या आली नव्हती अखेर त्याने तिला कॉल केला काव्या " बस निघते आहे ऐनवेळी काम आले सॉरी ...पण निघते आहे मी बस १० मिनट"

राज ने पुन्हा कॉफी ऑर्डर केली आणि वाट पाहू लागला. ६.१५ झाले तरी काव्याचा पत्ता नव्हता. पुन्हा राजने नंबर ट्राय केला " currently switch off" ६.३० झाले तरी काव्याचा पत्ता नव्हता ना तिचा मोबाईल लागत होता. अखेर राज वाट पाहून घरी जाण्यास निघाला. सुसाट वारा सुटला होता आणि मुसळधार पाऊस राज त्या दिवशी हिरमुसून घरी परतला त्याच्या कारने.

शिवा मस्करी करेल म्हणून राजने त्याला खोटे सांगितले भेट झाली पण त्याच्या टाइपची नाही काव्या. राज शिवाच्या नकळत सतत तिचा नंबर डायल करत होता तो कधीच लागला नाही. ना काव्या पुन्हा त्याला त्या रस्त्यावर दिसली. राज ने घेतलेली पैंजण तो नेहमी पाहत असे स्वप्न रंगवत असे पण तो चेहरा त्याला सापडत नव्हता. नेहमी मजा मस्ती करणारा राज आजकाल कामात लक्ष घालू लागला होता. त्यात बराच बदल घडला होता. अनेकदा शिवा आणि विक्रम रॉय ह्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण काही साध्य नाही झाले. राज त्यांना उडवा उडविची उत्तरे देत होता.

विक्रम रॉय शेवटी एक बिझनेसमन त्यांनी त्यांच्या बिझनेस डील साठी राजचा विवाह पूजा अग्रवाल सोबत करण्याचा बेत आखला पूजा अग्रवालचे वडील मोहन अग्रवाल ह्यांनी स्वतः ह्या बाबत विक्रम रॉय सोबत बोलणे केले. पूजा अग्रवाल राजला खूप लाईक करायची एकदा त्यांची भेट एका पार्टी मध्ये झाली होती. पूजा दिसायला सुंदर एका मोठ्या बिझनेसमन ची मुलगी. राज आणि त्याच्या फामिलीने त्या लग्नास संमती दिली. खरा फायदा होणार होता विक्रम रॉय ह्यांना कारण तो विवाह म्हणजे एक बिझनेस डील होती.

एक दिवस निवडला त्यांच्या engagement साठी सर्व तयारी झाली. थोडा का होईना राज नाखूष होताच पण त्याचे कारण कुणालाच सापडले नाही. Engagement च्या दिवशी राजच्या मोबाईल वर काव्याचा फोन आला. राज शॉक झाला. त्याने हवे नको ते तिला सुनावले. काव्या गप्प ऐकून घेत होती

अखेर काव्याने त्याला एकदा भेटायचे सांगितले राज तयार झाला.

Saturday ५.३० पुन्हा. ......

राजने विचार केला तिला घेतलेले गिफ्ट देवून त्याच्या लग्नाचे इंविटेशन कार्ड देण्याचे. कार्ड आणि पैंजण घेवून राज काव्या ला भेटण्यास निघाला. कॉफी शॉप मध्ये काव्या आधीच येवून बसली होती. तिच्या सोबत तिची मैत्रीण आराध्या पण होती. काव्याला पाहिल्यावर राज भान विसरला मन मोहक सौंदर्य एक भलतेच तेज तिच्या चेहऱ्यावर. ज्यावेळी त्यांची भेट झाली राज सर्व काही राग विसरून गेला. तिने त्याच्या सोबत केलेल्या गप्पा तिचे बोलणे तिचा निरागस चेहरा आणि सौंदर्य राज वर भुरळ पाडून गेला. तरीही राजने तिला एक मित्र म्हणून विनंती केली तिला त्याच्या हाताने पैंजण घालण्याचे तिने इतक्या महागड्या गिफ्टला नकार दिला. तरीही राज ऐकायला तयार नव्हता. तो लागलीच पैंजण घेवून तिच्या पाया जवळ बसला.

ज्यावेळी त्याने काव्याच्या चेहऱ्याकडे पाहिले तिचे अश्रू आनावर झालेले. एक हसता खेळता चेहरा अश्रू बरसवत होता. राज ही थोडा भावूक झाला. ज्यावेळी राज तिच्या पायात पैंजण घालण्यास गेला त्यावेळी त्याच्या लक्षात आले ती दोन्ही पायाने अपंग आहे. त्या पैंजणला चेहरा सापडला होता पण पाय नाही.

आराध्या काव्याची मैत्रीण त्यावेळी राजला सांगू लागली काव्या भेटण्यासाठी निघाली होती त्या वेळी तिची स्कूटी पावसात भिजल्या कारणाने सुरू होत नव्हती अखेर आरध्याची स्कूटी घेवून निघाली अचानक आलेल्या पावसामुळे तिचा मोबाईल ही बंद झाला होता. मुसळधार पावसात ज्यावेळी ती कॅफे कडे येत होती भरपूर ट्रॅफिक होते राजला भेटण्यासाठी तिने wrong side घेतला अचानक एक कारने तिला धडक दिली आणि कार काव्याच्या पायावरून गेली. राज आता पहिल्या पेक्षा मोठ्या संकटात होता त्याला तो दिवस आठवू लागला त्या दिवशी ज्या वेळी तो घरी निघाला मुसळधार पाऊस होता आणि त्या पावसात अचानक समोरून आलेल्या स्कूटीला राजने धडक दिली होती. पोलिस केस आणि कंप्लेंट पासून वाचाण्यासाठी त्याने पळ काढला होता. काव्या खूपच आक्साबोकसी रडत होती ती रडत त्याला म्हणाली " चुकी माझी होती तुला भेटण्यासाठी मी wrong side होती पण तो जर थांबला असता तर निदान मला अपंगत्व तरी आले नसते"

राजला काहीच सुचत नव्हते जर सांगितले तर कायमची मैत्रीण ही गमावेन ह्या भीतीने त्याने ते रहस्य त्याच्या मनातच पुरून ठेवले. तो भावूक झाला आणि त्याने काव्याला काही विचार न करता प्रपोज केला तिला लग्नाची मागणी घातली. काव्याने ती मागणी मान्य नाही केली कारण तिला त्याच्या आयुष्यात ओझं नव्हते व्हायचे. बराच आग्रह करूनही तो काव्याला तयार करू शकला नाही.

ज्या वेळी राज घरी परतला त्याला रात्र भर झोप नाही लागली. त्याच्या कडून नकळत झालेल्या अपराधाची एक गरीब मुलगी शिकार झाली होती. तो काही करून काव्याला लग्नास तयार करण्याचा प्रयत्न करत होता. पण काव्या तयार नव्हती. अखेर राजने काव्याच्या घरी जाऊन तिच्या आजीची भेट घेतली. काव्याला सर्व एश आराम देण्याचे आश्वासन दिले. आजी तयार होती कारण तिला पण कुणी तरी असाच हवा होता काव्यासाठी पण काव्या आजुन तयार नव्हती.

तिच्या मनात राहिलेला एक प्रश्न ????

राजचे कुटुंब तिला स्वीकारतील की नाही ????

राजने ज्यावेळी त्याच्या आई वडिलांसोबत विचार मांडला त्यावेळी घरात एक मोठा संघर्ष झाला वडील त्याच्या प्रेमाला मूर्खपणा म्हणू लागले. आई त्याची हतबल होती. अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलले तो सर्व सोडून निघाला काव्याकडे ह्या वेळी त्याचा नेहमीचा मित्र - भाऊ शिवा ही हतबल होता.

काव्या राजला खूप समजावू लागली कारण अश्या नात्याला राजची फॅमिली कधीच मान्य करणार नाही. अखेर जिद्दी राजने तिला लग्ना साठी तयार केले आणि लग्न केले.

ही गोष्ट ज्या वेळी विक्रम रॉय यांना कळली त्यांचा रागाचा पारा चढला. लग्ना आधी राजने पूजा अग्रवाल ची भेट घेतली तिला सर्व प्रकार सांगितला. पूजा ही राज वर खूप प्रेम करत होती. तिने राज साठी त्याच्या निर्णयावर संमती दर्शवली.

पण पुजाचे वडील मोहन अग्रवाल ह्यांच्या मनात एक ठिणगी पेटत राहिली.

कुणाची दृष्ट लागेल असा दोघांचा संसार चालला होता. खूपच रोमँटिक कपल होते दोघे. जरी काव्या अपंग असली तरी राजने कधीच भासू दिले नाही. तिला नेहमी व्हील चेयर वर पूर्ण शहर फिरवत असे जेणे करून तिला घरी कोंडल्या सारखे वाटू नये. खूप आनंदी आणि सुखी होते दोघे.

पूजा अग्रवाल आतल्या आत खूप दुःखी होती ही बाब ज्या वेळी तिचे वडील मोहन अगरवाल ह्यांनी हेरली त्यांनी विक्रम रॉय ह्यांची भेट घेतली. विक्रम रॉय ह्यांना आधीच काव्या मुळे एक मोठ्या बिझनेस डील ला मुकावे लागले होते. दुसरी कडे काव्या मुळे पूजा अत्यंत दुःखी होती. तिने परिस्थिती सोबत आपली समजूत करून घेतली होती. विक्रम रॉय आणि मोहन अग्रवाल दोघांनी एक बेत आखला आणि तो बेत म्हणजे अपंग काव्याचा खात्मा. त्या साठी त्यांनी बऱ्याच वेळा काव्याला मारण्यासाठी मारेकरी पाठविले. पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी ..

राजने त्याच्या सामर्थ्याने प्रतेक तिच्या वरच्या संकटाला स्वतः प्रतिउत्तर दिले . राज समजला होता हल्ल्या मागे कुणाचा हात असू शकतो पण तो साध्य करू शकत नव्हता.

ज्या वेळी सर्व काही करून पाहिले विक्रम रॉय आणि मोहन अग्रवाल ह्यांनी काटा काट्याने काढायचा बेत आखला. राजची आई परिणीती ह्यांना राज आणि काव्याला घरी आणण्यासाठी पाठविले. परिणीती विक्रम रॉय ह्यांच्या खेळीला समजली नाही. ती आणि शिवा भोळ्या भाबड्या पणाने राज आणि तिच्या सुनेला आणण्या साठी काव्याच्या घरी पोहचली. राज जाण्यासाठी तयार नव्हता पण ज्या वेळी त्याला शिवाने त्याच्या पश्चात झालेली वडिलांची दशा सांगितली तो तयार झाला. काव्याची आजी मात्र ते घर सोडण्यास तयार नव्हती. अखेर तिची जबाबदारी शिवा वर सोडून राज काव्या सहित त्याच्या घरी परतला.

काव्या घरी आल्यावर तिचे स्वागत जल्लोषात झाले. सर्व काही प्रेम आणि आदर पाहून तीही भारावून गेली. खरेतर हा एक देखावा होता जो ना ती समजली ना राज. विक्रम ह्यांनी त्यांना हनिमून साठी बाहेरगावी पाठविले. त्यांनी ह्या ट्रीप मध्ये खूप एन्जॉय केला. त्यांचा हनिमून खूपच रोमँटिक होता.

हनिमून हून परतल्यावर राजवर पुन्हा ऑफिस ची जबाबदारी सोपविण्यात आली आणि राज ह्या ही वेळी ती जबाबदारी चोख पणे सांभाळत होता. सकाळी ऑफिस आणि रात्री वेळेवर घरी. जवळ पास ३ महिन्यानंतर राजला एकदा ऑफिसच्या कामानिमित्त ३ दिवसा करिता मुंबई मध्ये जावे लागले.

एक दिवस ज्या वेळी परिणीती घरी नव्हत्या. विक्रम रॉय ह्यांनी त्यांची खेळी केली. काव्या व्हील चेअर वर असताना त्यांनी नोकराला आवाज दिला पाण्या साठी खरेतर त्यांनी आधीच नोकराला घरा बाहेर पाठविले होते. त्यांच्या आवाजाला ऐकून काव्या व्हील चेअर वरून त्यांना पाण्याचे ग्लास घेवून येत असताना तिच्या हातून काचेच ग्लास सुटले.

विक्रम रॉय ह्यांनी त्यावेळी तिला सांगितले

" जसे हे ग्लास तुटले दिसते आणि ऐकू आले तसे माझ्या मुलाचे राजचे मन नेहमी तुटते पण ते तिला ऐकू येत नाही दिसत नाही. मी एक बाप म्हणून ते जाणवू शकतो तो एकट्यात किती रडतो दुःखी असतो तुला नाही दिसत.

पतीची सेवा हे तुझ्या नशिबी नाही उलट पती ला तुझी सेवा करावी लागत आहे. एक मेहरबानी कर माझ्या मुलाला तुझ्या पासून मुक्त कर सोड त्याला त्याने जोशात घेतलेल्या निर्णयाला तो खूप पश्चावत आहे. जर त्याच्या वर खरे तुझे प्रेम असले तर त्याला त्याचे आयुष्य पहिल्या सारखे आनंदी जगू दे.......

विक्रम रॉय ह्यांच्या बोलण्याचा काव्या वर खूप परिणाम झाला ती पूर्ण रात्र भर विचार करत राहिली. अखेर एक चिठ्ठी लिहून काव्याने स्वतः व्हील चेअर वरून घराच्या स्विमिंग पुल मध्ये उडी मारली. राज साठी त्याच्या भविष्या साठी काव्याने स्वतः ला संपविले. विक्रम रॉय आणि मोहन अग्रवाल ह्यांच्या कटात काव्या कायमची हरपली. ज्या वेळी राज घरी पोहचला त्याला मोठा धक्का बसला कारण काव्याच्या पोस्ट मोटर्म नुसार ती प्रेग्नंट होती. काव्याची हत्या होती की आत्महत्या काहीच राजला कळत नव्हते. काव्याची चिठ्ठी राजला मिळाली नाही ना पोलिसांना. विक्रम रॉय ह्यांनी राजला सावरण्या साठी पूजाचे आणि राजची पुन्हा लग्नाची बोलणी केली. कारण एक बिजनेस मन काही केल्या धंदा सोडत नाही. ह्याच डील मुळे काव्या संपली होती.

राज आणि पूजाच्या लग्ना नंतर एक दिवस ती काव्याची चिठ्ठी पूजाच्या हाती लागली.

राज मला माफ कर तुला अर्धवट आयुष्यात सोडून जात आहे. तसेच जसे तू मला कारने उडवून निघून गेला होतास त्यावेळी मी पाहिले होते तुला ... कधी सांगायचे धाडस नाही केले कारण .. तू खूपच जीव लावला होतास माझ्यावर ... तू अपंग करण्यापेक्षा मला ठार करून गेला असता ना तर तुझी ऋणी असती.. माझ्या पेक्षा समाज अपंग आहे त्यांच्या बुद्धिम्तेच्या बाबतीत ...तू त्या समाजात मोडत नाहीस . हरले रे मी पण पुढील जन्मास तुला नक्की साथ देईन... आणि तुझे पैंजण माझ्या कडून पूजाला दे तिच्या जवळ लग्न कर सुखी रहा... काव्या ............

ती चिठ्ठी राजच्या हाती लागू नये म्हणून पूजा त्या चिठ्ठी ला गॅस वर जाळते. पैंजण कडे पाहत राहते.... जी काव्या सोडून गेली होती तिच्या साठी.


Rate this content
Log in

More marathi story from Raj Mohite

Similar marathi story from Romance