Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Raj Mohite

Comedy Drama Others


3  

Raj Mohite

Comedy Drama Others


आई अडाणी बायको अतिशहाणी

आई अडाणी बायको अतिशहाणी

3 mins 310 3 mins 310

लग्न सध्यासोप्या पद्धतीने केले पण घरात मात्र कायम स्वरूपात धूमधडाका सुरू राहिला. एकी कडे बायको आणि एकी कडे आईच सारखे भांडण. त्यात फसलो मी आणि माझे बाबा.

त्याचे कारण पण तसे आहे माझी आई म्हणजे कमी शिक्षण अडाणी म्हणा???

बायको जास्त शिक्षण म्हणजे अती शहाणी म्हणा???? शाकाहारी माझी आई आणि मांसाहारी बायको.

आता आईला तशी ती आधीच पसंत नव्हती. मी एकुलता एक म्हणजे माझी बायको तिला सून म्हणून पसंत नसताना खपवून घ्यायची होती.

तिला खपवून घ्यायचे सोडा बाप लेक खपायला आलो त्यांच्या भांडणात. नेहमी कसला ना कसला वाद. एखादे संसद भवन लाजेल इतका राडा घरात.

कसे काय ते तिच्या सोबत प्रेम जुळले?? कॅथलिक बायको आणि महाराष्ट्रीयन शुद्ध शाकाहारी आई.

आई बायकोच्या हातची चहा जाऊद्या पाणी पण नव्हती घेत. घरात घेतले तिला पण देव घरात काय बिशाद आहे तिची जाण्याची.

तिची तर जाऊद्या मला पण एन्ट्री नाही. मी पण म्हणे बाट लोय. आमच्या घरात ही नवीन कसोटी सुरू झाली होती पंच बाबा त्यांचे ऐकतोय कोण???

त्यांची हाताची घडी तोंडावर बोट. आता तशी माझी बायको तरी कुठे एकत होती माझे. आमचा एकच सिध्दांत बाप बेट्याने त्यांच्या भांडणात पडायचे नाही. पडला तो उपाशी असतो.

एकदा बायकोने घरात बिर्याणी ऑर्डर केली त्यात चिकन बिर्याणी. त्या बिर्यानिने माझी आणि बाबांची हाडे खिळखिळी करून सोडली.

बाबा नेहमी म्हणतात तू लग्न नसते केलेस तर चार दिवस जास्त जगलो असतो. तुझ्या कोर्ट मेरिज ने घरात कौटुंबिक न्यायालय उभे केले.

आईला बायको पसंत नाही कारण नॉन वेज. बायकोला आई पसंत नाही कारण धार्मिक आणि अंधश्रद्धाळू.

इतके चांगले माझ्या बायकोचे नाव हेझल आई तिला हडळ शिवाय काही बोलतच नाही.

घर एक पण घरात चुली दोन झाल्या. बायकोच्या हातचे खाल्ले नाही तर ती हातातून जाणार. आईच्या हातचे नाही खाल्ले तर मी तिच्या हातातून जाणार.

आईची पहिल्या पासून दहशत तशी बाबांना चिकन खूप आवडते पण कधी चुकून त्यांनी माझ्या बायकोच्या हातचे खाल्लेले आईला कळाले तर त्या दिवशी त्यांचा कोंबडा.

आई दिवस भर देव पुजे मधे व्यस्त तिच्या पूजेने बहुतेक देव पण झाला असेल त्रस्त. घरात ३३ कोटी देवांची आरास.

काय माहित इतके काय बिघडवले होते तिचे देवांनी सकाळ संध्यकाळ हात धुवून पाठी त्यांच्या.

मला तर सवय झाली होती. अंगारा काय विभूती काय ?? नको नको ते टीले आणि गोंडे लहान पासून लावायची आता खरेच का ती शिकलेली बायको माझी इतके सहन करेल???

इतके ३३ कोटी देव होते घरात फक्त बायकोने तिच्या देवाचा फोटो बेडरूम मध्ये लावला. आरे देवा काय भांडण केले??? आता तुम्ही सांगा देव पण आपापसात भांडणार आहेत का?? एका घरात??? एक फोटो घ्यायचा चालवून पण नाही ???

त्या दिवशी त्यांच्या भांडणात मी आणि बाबा देवा देवा करत बसलो. बायको पण माझी कमी नाही तिने तर चक्क

हातावरच देवाचा टॅट्टयू काढून घेतला.

परवा आनंदाचा क्षण त्यातही त्यांचे इतके मोठे भांडण झाले की विचारू नका???

आनंद म्हणजे तिला दिवस गेले तिने लाडाने माझ्या जवळ सांगितले

मुलगा झाला तर नाव जोसेफ मुलगी झाली तर मॅरी.

आईने इतकेच ऐकले बस घेतले घर डोक्यावर तिच्या नातवंडांचे नाव आधीच तिने जोतिष कडे पाहिले आहे.

एक महिन्या आधी मुलगा झाला तर पांडुरंग मुलगी झाली तर रुक्मिणी आता सांगा ???? बायकोला दिवस गेल्या हप्त्यात गेले आणि हिने महिना भर आधी काय म्हणून जोतिष पहिला????

म्हणे ती जी देवपूजा करत आहे उपासना करत आहे त्याचे फळ ???

मग मी काय करत होतो??????

माझे प्रयत्न वायफळ?????

आता मुल होण्या आधी त्यांचे भांडण. बाबांनी दिला सल्ला पण त्यांचा त्या दिवशी कडक उपवास झाला.

त्यांचा सल्ला काय ??? टॉस नाही तर चिठ्ठी.

त्यांचा सल्ला ऐकला तर बायको मला सोडचिठ्ठी देईल.

खरेच प्रत्येक दिवशी त्यांना भांडण केल्याशिवाय राहता येत नाही. त्यांचे असे भांडण चालूच राहणार आहे.


Rate this content
Log in

More marathi story from Raj Mohite

Similar marathi story from Comedy