Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Raj Mohite

Drama Tragedy Others


3  

Raj Mohite

Drama Tragedy Others


लग्नाचा वाढदिवस

लग्नाचा वाढदिवस

2 mins 274 2 mins 274


घाई गडबडीत कामात पोहचलो. ठरल्याप्रमाणे साहेबाने उशीर का झाला म्हणून खडसावले. काम पूर्ण करून देण्याचा तगादा लावला. चिडलो पण नोकरी शेवटी काम पूर्ण करायला घेतले. कामाच्या गडबडीत जेवणाची वेळ तशी टळून गेली होती भुक तशी लागलीच होती डबा उघडला चपाती बघून भुक मेली तरी ही एक तुकडा खाल्ला आणि तोही थुंकला डबा बंद करून काम पूर्ण केले

घरी निघालो एकच विचार भाजी अळणी चपाती करपलेली

आज बायकोचा समाचार घ्यायचा. रिक्षा पकडली आणि घरचा रस्ता धरला सिग्नल वर रिक्षा थांबल्यावर

एक बाई गजरा विकणारी स्वस्तात गजरा विकत होती

मी घ्यावे म्हणून खूप खटपट करत होती अखेर सिग्नल सुटला. घरी पोहचे पर्यंत मुलगी झोपली होती घरात आलो तरी ही उशीरा पर्यंत तिचे फोनवर बोलणे चालू होते रागाणे डबा फेकला फोन बंद करून तिने डबा उचलला.

गप्प बेडरूम मधे बसुन रडू लागली. पुन्हा तिचा फोन वाजला.

मेसेज वाचला आणि बेडरूम मधे गेलो रडू जास्तच आले तिला माझी चूक मला कळाली. हात जोडण्या पेक्षा हात हातात घेतले.

तिच्या हाता वरील भाजलेल्याचा डाग बघुन करपलेल्या चपाती चा विसर पडला. माझे मुलांचे उरकता उरकता काय धावपळ होते समजलो. तारेवरची कसरत करून अपेक्षा आज एवढीच होती तिची मी वेळेवर घरी यावे.

आज तरी मी वचन पाळेण पण कामाच्या घोळात पैश्याच्या लोभात सारे विसरलो

आज लग्नाचा वाढदिवस होता

मी प्रोमिस केले होते तिचा आवडता गजरा गिफ्ट देण्याच. ती नको म्हणत असताना मी तिला बाहेर जावून हॉटेल मध्ये पार्टी देण्याचं प्रॉमिस केले होते. ती नको म्हणत होती कारण खर्च होईल आणि तसे ही तिला हे सर्व पसंत नव्हते. मी बाहेर घेवून जाणार म्हणून आजूबाजूला सर्वांना सांगितले होते माहेरात ही फोन करून आमच्या हॉटेल पार्टी बद्दल कल्पना दिली होती. जेवण बाहेर करणार म्हणून काहीच घरी बनविले नव्हते तिने.

तिची आसवे पुसत जवळ घेतले. माफी मागितली आता रुसवा घालवतात कसा सांगायला नको मला. ???

बरेच वेळ एकांतात घालवून भूक लागली मग ऑफीस मधून परत आणलेला तोच डबा तिच्या सोबत चवीने खाल्ला.

परत फोन वाजला मेसेज आला

सासूबाई ( मग झाली का ताज हॉटेलची पार्टी????? )


Rate this content
Log in

More marathi story from Raj Mohite

Similar marathi story from Drama