Raj Mohite

Comedy Drama Fantasy

3  

Raj Mohite

Comedy Drama Fantasy

बाप तसा बेटा

बाप तसा बेटा

4 mins
579


सारखी बायको टोमणा मारते बाप तसा बेटा. मी म्हणतो बेटा बापापेक्षा सरस. काही गुण मिळायचे माझ्याशी पण काही मिळत नव्हते त्याचे काय???

बायको ही उत्तर नाही देवू शकली.

त्याचे वय बस १० वर्ष पण अनुभव १०० वर्षाहून अधिक बोलण्यात तर बालपण आजिबात नाही. आणि म्हणे त्याला ही girl friend आहे.

सतत काही ना काही experiment करत. एकदा असेच experiment च्या चक्कर मधे शाळेची लॅब जाळली होती. एकदा चाळीतील पाइपलाइन तोडली होती. सर्व चाळ करी म्हणायचे कसली औलाद जन्माला घातली आहे देव जाणो. पण खरच ही माझी कोणती experiment नाही हो.

काही म्हणा बापाचे गुण मुलात उतरतात हे खरे आहे. माझ्या ही मुलात माझे सारे गुण जश्याच तसे. काही बाबतींत तर तो माझा मुलगा नाही बाप होता.

त्याचे पूर्ण कारनामे सांगायचे झाले तर एक महिना कमी पडेल तरीही एक कारनामा त्याचा सांगतो.

कारनामा कसला ??? त्याचा experiment लग्न माझे मोडता मोडता वाचले त्याच्या experiment मुळे.

कामाला निघालोच होतो इतक्यात " पप्पा तुम्हाला उद्या मॅडम ने बोलाविले आहे."""

का??? आता काय जाळलेस????

उद्या या मग कळेल??

बायकोला आवाज दिला " हा काय बोलतोय माहित आहे का ????

मला काही सांगून करतो का तो??

तुम्ही आणि तो काही सांगून करता का मला???

" बाप तो बाप बेटा तो बेटा???

आता तू ऑफीस ला जाताना तरी तोंड बंद करणार आहेस का???

इतकी वर्ष काय केले आहे ??? तोंड बंदच ना??

लग्न झाल्यावर तुम्ही आणि आता मुलगा सुखाने जगू देणार आहात का???

मी काय केले??

तुम्ही काय केले??? लिस्ट सांगू???

पूजा ते पल्लवी सांगू??

गप्प बस लहान मुला समोर काही बोलतेस??

” पप्पा मला माहित आहे ती लिस्ट ”

आणि आई तुझा अॅप अपडेट नाही आहे.

पल्लवी नाही माधवी???

" चला मला उशीर होतोय " म्हणत गुपचूप त्याच्या हातात २० ची नोट ठेवली. गप्प रहावं म्हणुन.

सिंगल तोडल्यावर कशी मामाच्या हातात १०० टेकवावी लागते?? तसाच हा जकात नाका.

कल्टी खाल्ली आणि ऑफीस मधी पोहचलो. पण सारखे डोक्यात यार ह्या वेळेला ह्याने काय नवा प्रताप केला असेल शाळेत तोच डोक्यात विचार आधीच शाळेचा लॅबचा हप्ता भरत होतो. आता नवीन काही भरायला आले तर ???

दिवस सरला कामात आधीच सांगितले उद्या उशीर होईल म्हणून.

घरी गेल्यावर आमचे सुपुत्र आधीच स्क्रू ड्रायव्हर घेवून music system ची काशी करण्यात व्यस्त.

त्याला पाहत म्हटले

” आरे ह्याचे आजुन हप्ते फेडायचे आहेत.

त्याला तरी सोड .....

" पप्पा तसेही ह्याचा काय फायदा तुमच्या मम्मीच्या भांडणात कधी लावतो का Music system????

तू आधी सोड तो system मला सोडून काही सोडले आहेस का बिघडवाचे ???

इतक्यात बायको

” तुम्ही आणि आजुन शाबित आहात बिघडायचे???

कोण घालणार बायको जवळ हुज्जत ???

दिले सोडून संध्याकाळी चेक केले तर

music system हिंदी साँग्ज पण अरबी मधी गात होता

आता हा आमच्या मुलाचा प्रताप ....

एकदा शेजारच्या बंडू सोबत मिळून त्याने त्यांच्या घरातील वॉशिंग मशीन चे भाजी कापण्याचे मशीन बनविले. केले काही नाही फक्त मिक्सर चे ब्लेड वॉशिंग मशीन ला लावले. आयडिया एक नंबर भाजी कापायला पण चुकून शेवंता वाहिनीने शांताराम चे कपडे त्यात टाकले. झाली आमटी.

शांताराम ला शांत करताना मला राम राम म्हणायची वेळ आली.

आता उद्या माहिती पडेल राम राम करायचे की हरी हरी. सकाळ झाली शाळेत पोहचलो. प्रत्येक वर्गातली मूल मला आश्चर्याने पाहत होती. मी त्याच्या वर्गा पर्यंत पोहचलो. त्याची नवी साएन्स टीचर पहिली

श्रेया कुलकर्णी.

मॅडमनी विचारले " कुणाचे पालक तुम्ही???

मुलगा मी उत्तर देणार इतक्यात

" मॅडम माझे "

मॅडमनी मला त्यांच्या केबिन मधे बसण्यास सांगितले.

थोडा वेळ वाट पाहिली मग मॅडम आल्या..

आणि बोलल्या....

तुझा मुलगा तो म्हटल्यावर आजुन काय???

जसा बाप तसा बेटा??

ती मॅडम म्हणजे माझी शाळेतील गर्ल फ्रेंड.

काय केले त्याने माहित आहे ???

क्लास मधील विधीचे आणि त्याचे नाव बोर्ड वर लिहिले आणि तिच्या वही वर ही. विधीच्या आईने तक्रार केली आहे.

बोल काय करू???

तिच्या कडे पाहत बोललो

आठवतेय तुला ??? हाच प्रकार आधी घडला होता ???

त्यावेळी तुझे नाव आणि माझे नाव मी बोर्ड वर लिहिले होते. तुझ्या आईने तक्रार केली होती

आणि काय म्हणाले होते माझे वडील आठवतेय????

तुमच्या मुलीला आधी विचारा

तुला आठवतेय तू काय म्हणाली होतीस ?????

मला आवडतो तो खूप ???

तक्रार तुझ्या आईने गप्प मागे घेतली आणि तुझी समजुत काढली. माझ्या बद्दल मनात हवे तितके विष कालवले तुझ्या मनात.

आता हाच सल्ला दे त्या मुलीच्या आईला.

ती इतकेच म्हणाली .

" बाप तसा बेटा??

तिने सर्व प्रकरण हॅण्डल केले. साजविले त्या मुलीच्या आईला.

बाहेर बसून आमचे सुपुत्र सर्व ऐकत होते. बाहेर आल्यावर

" पप्पा टीचर तरी सोडायची ??

” गप्प बस हरामखोर ह्याच्या साठी शाळेत येतोस???

हा प्रश्न तुम्हाला विचारला होता का ?? आजोबांनी कधी ??? मी सर्व ऐकले आहे श्रेया मॅडम आणि तुमचं

परत २० ची नोट काढली.

" गप्प बस"

" २० माधवी मावशी साठी

आता श्रेया मॅडम आहेत ५० काढा."

माझा मुलगा म्हणून श्रेया त्याच्याकडे जास्त लक्ष देत होती. त्याचे साएन्स सुधारत होती.

आणि आमचे सुपुत्र आमचे अर्थशास्त्र बिघडवत होते. दया पन्नास...

एकदा वाटले तिची माफी मागावी आणि आभार म्हणून सुपुत्र जवळ एक चिठ्ठी पाठवायचे ठरविले लिहिले त्याला घुस ही दिली. आणि कामाला गेलो.

तो त्याच्या experiment मधे व्यस्त झाला ती चिठ्ठी बायकोच्या हाथी लागली. आता लागली कि त्याने दिली मला कधीच नाही कळाले.

रात्री घरी आलो काहीच बोलली नाहीं फक्त दोन दिवस चपाती नाही मिळाली खायला.

कशी मिळणार लाटणे तुटल्यावर???

तुम्ही गैरसमज करून घेवून नका

ती खूप प्रेम करते काही बोलली नाही काही घडले नाही.

हवे तर माझ्या सूपुत्रास विचारा .......

आणि मला सांगा

बाप तसा बेटा ???

की बेटा सव्वाशेर?????


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy